शहरं
Join us  
Trending Stories
1
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
2
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
3
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
4
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
5
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
6
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
7
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
8
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
9
प्रशांत किशोर यांच्या जन सुराज पक्षाला मिळाला राष्ट्रीय अध्यक्ष; या व्यक्तीवर जबाबदारी...
10
प्लेऑफ्सआधी RCB ची मोठी चाल! रोहित, शुबमनवर भारी पडलेल्या झिम्बाब्वेच्या गड्यावर खेळला डाव
11
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले
12
'कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठोस उपाययोजना राबवा', डॉ.दीपक सावंत यांचे उपमुख्यमंत्री शिंदेंना पत्र
13
IPL 2025: एकच नंबर..!! प्रिती झिंटा स्वत: जाऊन वैभव सूर्यवंशीला भेटली, केलं खास कौतुक (Video)
14
हृदयद्रावक! बहिणीच्या मुलावर आईसारखी केली माया अन् रागाच्या भरात त्यालाच संपवलं, कारण...
15
आठवड्यातून नेमका किती वेळा रेफ्रिजरेटर बंद करावा, कशामुळे होऊ शकतो लवकर खराब?
16
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
17
चाळीशी ओलांडली तरी मुक्ता बर्वे का आहे सिंगल? या विवाहित दिग्दर्शकावर होतं अभिनेत्रीचं क्रश
18
"बाई आणि बाटली..." शरद पोंक्षेंकडून मुलाला दोन महत्त्वाचे सल्ले, म्हणाले "नाहीतर करिअरची वाट"
19
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
20
भारताचा संघ Asia Cup 2025 मध्ये सहभागी होणार? BCCI ने दिली महत्त्वाची ताजी अपडेट

नारळाची होळी पेटवून सैलानी यात्रेला प्रारंभ

By admin | Updated: March 24, 2016 02:07 IST

लाखो भाविकांची उपस्थिती; जादूटोणा विरोधी कायद्याचे सर्रास उल्लंघन.

विठ्ठल सोनुने / पिंपळगाव सैलानी (जि. बुलडाणा) सर्व धर्मियांचे ङ्म्रध्दास्थान असलेल्या सैलानी दर्गा परिसरात बुधवारी दुपारी ३ वाजता कपड्याची व नारळाची होळी करून लाखो भाविकांच्या उपस्थितीत सैलानी बाबाच्या यात्रेस सुरूवात झाली. जादूटोण्यासाठी वापरण्यात येणार्‍या सुया, बिबे, काळ्या बाहुल्या यावेळी परिसरात दिसून आल्या. येथे जादूटोणा विरोधी कायद्याचे सर्रास उल्लघन होताना दिसून आले.सैलानी बाबा दर्गाचे मुजावर शेख रफिक मुजावर, हाजी शेख हाशम मुजावर, शे.नजीर मुजावर, शेख चाँद मुजावर, जिल्हा पोलिस अधिक्षक संजयकुमार बाविस्कर, अप्पर पोलिस अधिक्षक श्‍वेता खेडकर यांच्या हस्ते होळीची पुजा करुन, नैवेद्य दाखवून पेटविण्यात आली. होळीचे भाविकांना चांगल्या प्रकारे दर्शन घेता यावे, यासाठी होळीभोवती पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता. या यात्रेसाठी राज्य तसेच राज्याबाहेरील भाविक मोठय़ा प्रमाणात दाखल झाल्यामुळे होळीत टाकण्यासाठी नारळाची प्रचंड विक्री झाली. अनेक भाविकांनी सुकलेल्या नारळाला बिबे, गोटे, निंबू, खिळे ठोकून ते नारळ दहा रुपयात विकले. तर उपस्थितांनी आपल्या सोबत असलेल्या मनोरुग्णांच्या अंगावरुन गोटे, बिबे, टोचलेले नारळ व मनोरुग्णाच्या अंगावरील जुने कपडे या होळीत टाकले. त्यामुळे परिसरात प्रचंड धूर झाला होता. या धूरामुळे मोठय़ा प्रमाणात प्रदुषण होत असून होळीत कपड्याऐवजी फक्त नारळ टाकण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी अनेकांनी केली.