शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

घटस्थापनेच्या मुहूर्तावर घरपोच कनेक्टचा प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2020 11:59 IST

navratri, industry, mumbai लॉकडाउनमुळे घरीच बंदिस्त झालेले जनजीवन, व्यावसायिक, दुकानदार, उद्योजक आर्थिक संकटात सापडले असताना स्वदेशी वस्तू थेट घरीच पोहोच करण्याचा घरपोच कनेक्ट या नव्या उपक्रमाला घटस्थापनेच्या मुहूर्तावर प्रारंभ होत आहे.

ठळक मुद्देघटस्थापनेच्या मुहूर्तावर घरपोच कनेक्टचा प्रारंभई बाजारपेठेद्वारे घरपोच मिळणार आता स्वदेशी वस्तू

मुंबई : लॉकडाउनमुळे घरीच बंदिस्त झालेले जनजीवन, व्यावसायिक, दुकानदार, उद्योजक आर्थिक संकटात सापडले असताना स्वदेशी वस्तू थेट घरीच पोहोच करण्याचा घरपोच कनेक्ट या नव्या उपक्रमाला घटस्थापनेच्या मुहूर्तावर प्रारंभ होत आहे.ई कॉमर्सच्या माध्यमातून स्वदेशी वस्तू घरपोच कनेक्टच्या माध्यमातून ग्राहकांना मिळणार आहेत. यामध्ये चारशेहून अधिक उत्पादकांच्या सुमारे पाच हजाराहून अधिक स्वदेशी उत्पादनांचा समावेश आहे. यात निम्म्याहून अधिक छोटे उत्पादक आहेत.घरपोच कनेक्ट हे एक अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप असून केवळ नोंदविलेल्या व्यक्तींना या वस्तू घरपोच मिळणार आहेत. छोट्या उत्पादकांना एक व्यासपीठ मिळावे यासाठी हा अनोखा प्रयोग करण्यात आला आहे. यामध्ये कुटिरोद्योग, गृह उद्योग, महिला उत्पादक, महिलांचे बचत गट यांच्या राज्यातील प्रत्येक भौगोलिक विभागाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या उत्पादनांचा समावेश आहे. विविध प्रकारचे मसाले, तळणीचे पदार्थ, पीठ, गोड पदार्थ, बेकरी उत्पादने, चटण्या, लोणची, जॅम, सुका मेवा, सरबत असे विविध विभागातील वस्तू उपलब्ध आहेत.या ई बाजारपेठेच्या अ‍ॅपवरुन निवड आणि खरेदी केल्यानंतर ग्राहकांपर्यंत या वस्तू कुरियरमार्फत न पाठवता ग्राहक राहतात, त्या परिसरातील प्रतिनिधीमार्फत म्हणजे संवादकामार्फत त्या पोहोचवल्या जात आहेत. सुमारे ५0 वितरक, ५0 जिल्हा संयोजक आणि शेवटच्या ३000 उंबरठ्याच्या वस्तेत घरपोच कनेक्टचा चेहरा असणारे ७५00 संवादक असे वितरणाचे जाळे सज्ज झाले आहे. आतापर्यंत पाच लाखांहून अधिक लोकांनी हे अ‍ॅप डाउनलोड करुन घेतले आहे.विविध समाजमाध्यमांवरही हे अ‍ॅप उपलब्ध आहे.घटस्थापनेपासून विक्री सेवेस प्रारंभघरपोच कनेक्टच्या उत्पादनांची शुभारंभपूर्व विक्री सेवा घटस्थापनेच्या मुहूर्तावर म्हणजे उद्या, दि. १७ ऑक्टोबर रोजी सुरु होत आहे. शनिवार आणि रविवार, दि. १८ ऑक्टोबर रोजी घरपोच कनेक्टच्या अ‍ॅपवरुन वस्तूंची ऑर्डर घेण्यात येत आहे. या वस्तू स्थानिक संवादकांच्यामार्फत सात दिवसांत घरपोच देण्यात येणार आहेत. यानंतर पुढील आठवड्याच्या ऑर्डर्स शुक्रवार, दि २३ आॅक्टोबर, शनिवार, दि. २४ ऑक्टोबर आणि रविवार,दि. २५ ऑक्टोबर या दसऱ्याच्या दिवशीही नोंदविण्यात येणार आहेत. या ऑर्डर्स पुढील सात दिवसांत घरपोच देण्यात येतील.

  • Gharpoch Connect चे Android ॲप डाऊनलोड करण्यासाठी लिंक. 
  • https://play.google.com/store/apps/details?id=com.gharpoch.online 
  • आजवर ५ लाखाहून अधिक डाउनलोड 
  • वेबसाईट: www.gharpoch-connect.com   
  • फेसबुक पेज लाइक करा: https://www.facebook.com/GharpochConnect
  • इन्स्टाग्राम वर फॉलो करा: https://www.instagram.com/GharpochConnect
टॅग्स :Navratriनवरात्रीMumbaiमुंबई