शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेवर संकट! उन्हाळी कँपिंगला गेलेल्या, २८ लहान मुली बुडाल्या; ४५ मिनिटांत २६ फूट पाणी वाढले...
2
"आता जगायचंच नाही! मी बायकोला त्रासलोय"; तरुणाची थेट राष्ट्रपतींकडे धाव! म्हणाला...
3
चांगली बातमी! राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस; कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागात जाेरदार जलधारा
4
Horoscope Today: आजचे राशीभविष्य- ०८ जुलै २०२५, मनासारखे यश मिळेल, अपूर्ण कामे पूर्ण होतील!
5
रशियाचा युक्रेनवर पुन्हा मोठा हल्ला, ११ ठार, ८० हून अधिक जखमी; रशियन मंत्र्याचाही मृत्यू
6
"महाराष्ट्राला आम्ही पोसतोय" म्हणणाऱ्या निशिकांत दुबेंना चिन्मयी सुमीतचं हिंदीतून सडेतोड उत्तर, म्हणाली- "त्या खासदाराला..."
7
मनसेचे नेते अविनाश जाधव यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, पहाटे ३ वाजता कारवाई
8
मराठी माणसांना आम्ही पोसतोय, महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो; भाजपा खासदारानं उधळली मुक्ताफळे
9
देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रीय भाषा, प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच हवे; संघाची भूमिका
10
२५ कोटी कर्मचारी करणार उद्या देशव्यापी संप; सरकारी धोरणांचा विरोध करण्यासाठी भारत बंदची हाक
11
ऑफिसच्या वेळा बदला, लोकलची गर्दी कमी करा; ८००  कार्यालयांना मध्य रेल्वेचे विनंतीपत्र
12
कोर्लई समुद्रात संशयित बोट?; कोस्ट गार्ड, नेव्हीच्या हेलिकॉप्टरने घेतला शोध, हाती काही नाही
13
कुजबुज: महायुतीच्या चर्चेचे किलकिले दार; शिंदेसेनेची भूमिका अन् राज ठाकरेंचे 'ते' आदेश
14
डॉ. नरेंद्र जाधव समिती रद्द करा, दादा भुसेंना हटवा; शालेय शिक्षण अभ्यास व कृती समितीची मागणी
15
पर्यूषण काळात कत्तलखान्यांना बंदी घातली तर इतर समुदायांचाही मार्ग मोकळा होईल? - उच्च न्यायालय
16
वर्सोवा-घाटकोपर मेट्रोवर लवकरच ६ डब्यांची गाडी?; अतिरिक्त डबे खरेदीसाठी मागितली परवानगी
17
मुंबई विमानतळावर गांजा, सोने, प्राण्यांच्या तस्करीचा पर्दाफाश; आतापर्यंत ४ जणांना अटक
18
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
19
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
20
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन

कास पठारावर फुलांच्या बहराला प्रारंभ !

By admin | Updated: August 1, 2016 18:11 IST

सातारा शहराच्या पश्चिमेस असणारे व जिल्ह्यातील पर्यटनस्थळ म्हणून ओळखले जाणारे कास पठार फुलांनी बहरण्यास सुरुवात झाली आहे. पठारावरील नयनरम्य सुंदर फुलांना

ऑनलाइन लोकमतपेट्री ( सातारा ), दि. १ - सातारा शहराच्या पश्चिमेस असणारे व जिल्ह्यातील पर्यटनस्थळ म्हणून ओळखले जाणारे कास पठार फुलांनी बहरण्यास सुरुवात झाली आहे. पठारावरील नयनरम्य सुंदर फुलांना पाहण्यासाठी जिल्ह्याबरोबरच परराज्यातून पर्यटकांची गर्दी होऊ लागली आहे.जिल्ह्यातील कास पठार हे मोठ्या प्रमाणावर जैवविविधता असलेले ठिकाण आहे. पठारावरील मनाला मोहून टाकणारे निसर्गरम्य दृश्य पाहण्यासाठी या परिसरात पर्यटकांची सतत गर्दी होत असते. या पठाराचे प्रमुख वैशिष्ट्ये म्हणजे जून ते आॅक्टोबर महिन्यादरम्यान तृण, कंद, वेली तसेच वृक्ष, झुडपे, आर्किड व डबक्यातील वनस्पतींना अत्यंत आकर्षक अशा निळ्या, जांभळ्या, लाल, पांढऱ्या रंगांची फुले येतात. मध्य आॅगस्ट ते सप्टेंबर महिन्यात विविधरंगी दुर्मीळ फुलांचे गालिचे पर्यटकांना आकर्षित करतात. या पठारावरील सुंदर अशा विविधरंगी फुलांचा कालावधी आठ ते पंधरा दिवसांचा असतो. या काळात कास पठाराचे रूप सतत बदलत असते. सध्या पांढऱ्या रंगांची फुले तुरळक स्वरूपात येण्यास सुरुवात झाली असल्याने अनेक पर्यटक आपल्या कुटुंबासमवेत दाट धुक्यांसह पावसाळा ऋतूचा आनंद घेत या मनमोहक सुंदर अशा फुलांना आपल्या कॅमे-यात टिपताना दिसत आहेत. शनिवार, रविवारी पर्यटक, महाविद्यालयीन तरुणाईची मोठ्या प्रमाणावर कास पठारावर गर्दी होऊ लागली आहे. सह्याद्री पर्वत रांगेतील निसर्गात कास पठार येथे जून ते आॅक्टोबर महिन्यात विविध रंगांची फुले फुलण्यास सुरुवात होते. रंगबिरंगी फुलांचे गालिचे मध्य आॅगस्ट ते सप्टेंबर महिन्यात पाहावयास मिळतात. यामध्ये झाडांवरील आर्किड, गजरा, अमरी, गुलाब दानी, जमिनीवरील आर्किड, भूईचक्र, आर्किड तसेच इतर लहान वनस्पती, झाडे येतात. सध्या पांढ-या फुलांनी पठार बहरण्यास सुरुवात झाली आहे.आंतरराष्ट्रीय जैवविविधता असणाऱ्या कास पठारावर काही ठिकाणी दुर्मीळ वनस्पती आलेल्या दिसत असून, या पठार परिसरात फिरावयास येणाऱ्या पर्यटकांनी ही फुले पाहताना आपल्या पायदळी तुडवली जाऊ नयेत, याची काळजी घेणे आवश्यक आहे.- गणेश मोहिते, पर्यटक (मुंबई)