शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

शरद पोंक्षे शिवसेनेचे स्टार प्रचारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2017 20:22 IST

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी शिवसेना, मनसे व रासपच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे

ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. 24 - राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी शिवसेना, मनसे व रासपच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासह ४० जणांचा यादीत समावेश आहे. विशेष म्हणजे  हे राम नथुराम या नाटकामुळे वादात सापडलेल्या शरद पोंक्षे यांनादेखील पक्षाने  स्टार प्रचारक केले आहे. नागपुरात पोंक्षे यांचा जोरदार विरोध झाला. त्या पार्श्वभूमीवर प्रचारादरम्यानदेखील त्यांना विरोध होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.राज्यात फेब्रुवारी महिन्यात १० महानगरपालिका, २५ जिल्हापरिषदा व २८३ पंचायत समितीच्या निवडणूका होणार आहेत. सर्वच पक्षांकडून प्रचाराचा धुरळा उडणार आहे. प्रत्येकच पक्षाने  स्टार प्रचारकांची यादी तयार केली असून ती निवडणूक आयोगाकडे पाठविली आहे.शिवसेनेच्या स्टार प्रचारकांच्या यादीत माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी, विद्यमान उद्योगमंत्री सुभाष देसाई, परिवहनमंत्री दिवाकर रावते, वनमंत्री रामदास कदम यांच्यासह विविध आमदार व खासदारांचा समावेश आहे. आदेश बांदेकर, अमोल कोल्हे या मराठी चित्रपटसृष्टीतील नामवंतांनादेखील ह्यस्टार प्रचारकह्ण करण्यात आले आहे.दुसरीकडे मनसेतर्फेदेखील ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर झाली आहे. या पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह नितीन सरदेसाई, बाळा नांदगावकर यांचा प्रामुख्याने समावेश आहे. सहकारमंत्री महादेव जानकर हे रासपचे ह्यस्टार प्रचारकह्ण राहणार आहेत. ह्यरासपह्णतर्फे १४ जणांची यादी देण्यात आली आहे.