शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

आंदोलन केल्यास कारवाई एसटी कामगारांना इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2023 05:20 IST

सेवाशक्ती संघर्ष एसटी कामगार संघाने मुख्यमंत्र्यांना दि. २२ फेब्रुवारी रोजी पत्र पाठवून दि. २८ फेब्रुवारीपासून आत्मक्लेश आंदोलन सुरू केले जाणार असल्याचे कळविले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या आत्मक्लेश आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महामंडळाने कठोर भूमिका घेण्याचा निर्णय घेतला आहे. आंदोलनात सहभागी झाल्यास शिस्तभंगाची कारवाई केली जाणार आहे. तसे परिपत्रक काढून महामंडळाच्या राज्यातील सर्व विभागांना रवाना करण्यात आले आहे. 

सेवाशक्ती संघर्ष एसटी कामगार संघाने मुख्यमंत्र्यांना दि. २२ फेब्रुवारी रोजी पत्र पाठवून दि. २८ फेब्रुवारीपासून आत्मक्लेश आंदोलन सुरू केले जाणार असल्याचे कळविले आहे. शासनाने मान्य केलेल्या १६ मागण्यांची पूर्तता तातडीने करावी, अशी या संघटनेची मागणी आहे. आत्मक्लेश आंदोलनकाळात कर्मचारी अन्न, पाणी न घेता कामगिरी करतील. अंगात त्राण असेपर्यंत आंदोलन सुरू राहील, असे संघटनेने पत्रात नमूद केले आहे. या आंदोलनामुळे वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेता महामंडळाने खबरदारी घेतली आहे.

प्रवाशांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची दक्षता घेतली जाईल. सर्व कामगार आत्मक्लेश आंदोलनात सहभागी होतील. सोमवारी राज्यातील सर्व आगार पातळीवर संबंधित तहसीलदारांना निवेदन दिले जाईल. - सतीश मेटकरी, सरचिटणीस, सेवाशक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघ

टॅग्स :ST Strikeएसटी संप