शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
4
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
5
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
6
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
7
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
8
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
9
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
10
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
11
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
12
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
13
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
14
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
15
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
16
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
17
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
18
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
19
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
20
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
Daily Top 2Weekly Top 5

एसटीत प्रवाशांची मोबाईलवर होणार करमणूक

By admin | Updated: May 6, 2015 03:59 IST

५ हजार गाणी, ५0 चित्रपट आणि ५0 मालिका... हा आकडा आहे एसटीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी उपलब्ध केल्या जाणाऱ्या करमणुकीचा.

सुशांत मोरे,  मुंबई५ हजार गाणी, ५0 चित्रपट आणि ५0 मालिका... हा आकडा आहे एसटीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी उपलब्ध केल्या जाणाऱ्या करमणुकीचा. प्रवाशांचा लांब पल्ल्याचा प्रवास कंटाळवाणा होऊ नये, यासाठी एसटी महामंडळाने प्रवासात मोबाइलवर मोफत करमणूक उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. यावर महामंडळाकडून कामही सुरू आहे.खासगी बस कंपन्यांकडून प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी कमी भाडे आकारणी करतानाच अनेक सोयीसुविधा बसमध्ये दिल्या जात आहेत. त्यामुळे महागड्या एसटीकडे जाण्यापेक्षा प्रवासी खासगी बसकडेही वळताना दिसतात. त्यामुळे प्रवासी टिकविण्यासाठी महामंडळाकडून पुरेपूर प्रयत्न केले जात आहेत. नवीन आणि आरामदायी बसेस आणण्याबरोबरच प्रवाशांना बसमध्येच आणखी काही सुविधा देता येईल का याची चाचपणी केली जात आहे. सध्या स्मार्ट फोनचा काळ असून अनेक प्रवाशांच्या हातात नवनवीन फोन पाहण्यास मिळतात. मात्र स्मार्ट फोन सोबत असूनही एसटीतून लांब पल्ल्याचा प्रवास करताना अनेक प्रवाशांचा प्रवास कंटाळवाणाच होतो. एकूणच प्रवाशांचा हा कंटाळा घालविण्यासाठी एसटी महामंडळाने प्रवासातच प्रवाशांची करमणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी मोबाइलमधील हॉटस्पॉट (अ‍ॅप) तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार असल्याचे एसटीतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले. एसटीच्या बसमध्ये सेट टॉप बॉक्ससारखे यंत्र बसविण्यात येणार आहे. अशी असेल नवी योजना> हॉटस्पॉट हे अ‍ॅप असून, ते प्रवाशांना स्मार्ट फोनवर मोफत उपलब्ध आहे. > यामुळे प्रवाशांना निवडक चित्रपट, मालिका व गाणी बघता येतील.> यासाठी सेवा पुरवठादाराची गरज नसल्याने एसटीला कुठलाही करार करावा लागणार नाही. तसेच त्यांना मोठा खर्चही येणार नाही. एसटीच्या सर्व बसेसमध्ये ही सेवा टप्प्याटप्प्याने बसविण्यात येईल.> पाच हजार गाणी, ५0 चित्रपट, ५0 मालिका, चित्रपट तसेच मालिकांतील विनोदी दृश्य असतील. प्रवाशांना करताना हॉटस्पॉट यंत्रणेद्वारे प्रवासी या करमणुकीचा लाभ उठवतील, असे या अधिकाऱ्याने सांगितले. ही सेवा प्रवाशांना मोफत उपलब्ध होईल. येत्या चार ते पाच महिन्यांत करमणुकीची सुविधा एसटीत उपलब्ध होईल, असेही सांगितले.