शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

एसटी अधिकारी पुन्हा ‘परदेशी’

By admin | Updated: October 23, 2014 04:23 IST

आर्थिक संकटातील एसटीला बाहेर काढण्यासाठी अधिका-यांचे दौ-यावर दौरे होत असून आता पुन्हा एकदा परदेश दौ-याऱ्याचे वेध अधिका-यांना लागले आहेत

मुंबई : आर्थिक संकटातील एसटीला बाहेर काढण्यासाठी अधिका-यांचे दौऱ्यावर दौरे होत असून आता पुन्हा एकदा परदेश दौऱ्याचे वेध अधिका-यांना लागले आहेत. एसटीचे पाच अधिकारी केंद्राच्या एसआरटीयूतर्फे (असोसिएशन आॅफ स्टेट रोड ट्रान्सपोर्ट अंडरटेकिंग) अभ्यास दौऱ्यासाठी ब्राझीलला जाण्याचे निश्चित झाले असून या दौऱ्यातून मुळात साध्य होणार तरी काय, असा सवाल उपस्थित होत आहे. या वर्षातील हा दुसरा परदेश दौरा आहे. केंद्राच्या एसआरटीयूतर्फे (असोसिएशन आॅफ स्टेट रोड ट्रान्सपोर्ट अंडरटेकिंग) प्रत्येक राज्यातील एसटी महामंडळासाठी परदेशात अभ्यास दौरा आखला जातो. २0१४ मध्ये २८ मार्च ते ७ एप्रिलपर्यंत मॅक्सिको आणि सॅन फ्रॅन्सिस्को येथे अभ्यास दौरा काढला होता. त्या वेळी एसटीचे अध्यक्ष जीवनराव गोरे, राज्याचे तत्कालीन परिवहन आयुक्त व्ही.एन. मोरे तसेच राज्याचे परिवहन सचिव शैलेश कुमार शर्मा, एसटीचे वाहतूक महाव्यवस्थापक राहिलेले आणि आता नियोजन व पणनचे महाव्यवस्थापक असलेले सूर्यकांत अंबाडेकर, एसटीच्या माहिती आणि तंत्रज्ञान विभागाचे उपमहाव्यवस्थापक जयंत बामणे आणि मुख्य सांख्यिकी संजय गांजवे यांचा समावेश होता. हा दौरा झाल्यानंतर आता नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात पाच अधिकारी ब्राझीलच्या अभ्यास दौऱ्यावर जाणार आहेत. यात वित्तीय सल्लागार आणि मुख्य लेखाधिकारी एकनाथ मोरे, वाहतूक - महाव्यवस्थापक विनोद रत्नपारखी, वरिष्ठ प्रोग्रामर- ईडीपी वीरेंद्र कदम, उपमहाव्यवस्थापक -प्रशिक्षण- (भोसरी) मिशा बंड, मुख्य अभियंता चालक आर.एम. पवनिकर यांचा समावेश आहे. महामंडळाला २0१२-१३ मध्ये २९२ कोटी तर २0१३-१४ मध्ये ४२८ कोटी आणि २0१४-१५ मध्ये ४५0 कोटी तोटा झाला आहे. तो वाढताना अभ्यास दौऱ्यातून आतापर्यंत महामंडळाने काय साध्य केले हा प्रश्न उपस्थित होत आहे. (प्रतिनिधी)