शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

एसटीचे डेपो ९८ वर्षांच्या भाडेपट्ट्यावर देणार...; सुधारित धोरणास मंत्रिमंडळाने दिली मंजुरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2025 12:29 IST

या कालावधीवाढीमुळे महामंडळाच्या प्रस्तावित प्रकल्पांच्या विकासाला गती लाभेल, असा विश्वास सरकारला आहे. या धोरणानुसार खासगी भागीदारांना बसस्थानकांच्या पुनर्विकासाचे हक्क दिले जातील.

मुंबई : एसटी महामंडळाला आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी एसटी डेपो भाडेपट्ट्यावर देण्याच्या सुधारित धोरणाला राज्य मंत्रिमंडळाने मंगळवारी मान्यता दिली. सुधारित धोरणानुसार महामंडळाच्या जमिनींच्या भाडेपट्टा कराराचा कालावधी आता ६० वर्षांऐवजी ४९ वर्षांच्या दोन टप्प्यात मिळून ९८ वर्षे करण्यात आला आहे. या कालावधीवाढीमुळे महामंडळाच्या प्रस्तावित प्रकल्पांच्या विकासाला गती लाभेल, असा विश्वास सरकारला आहे. या धोरणानुसार खासगी भागीदारांना बसस्थानकांच्या पुनर्विकासाचे हक्क दिले जातील. त्या बदल्यात त्यांच्याकडून प्रीमियम आकारण्याऐवजी विकसित करण्यात आलेल्या व्यापारी जागेतील हिस्सा घेतला जाईल. ही जागा भाड्याने देऊन महामंडळाला सातत्याने उत्पन्न मिळेल. आर्थिक गर्तेत असलेल्या महामंडळाचा तोटा तब्बल १०,३०० कोटींवर गेल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

७२ बस स्थानकांच्या विकासाचा निर्णय महामंडळाने ५९८ बसस्थानके आणि २५१ आगारांपैकी काही ठिकाणे पीपीपी मॉडेलवर भाडेपट्ट्याने देण्याची प्रक्रिया २० वर्षांपूर्वी सुरू केली होती. त्यावेळी ३० वर्षांसाठी भाडेपट्टा दिला गेला, त्यात  ४५ बसस्थानकांचा पुनर्विकास झाला.ऑक्टोबर २०२४ मध्ये हा कालावधी ६० वर्षांपर्यंत वाढवून आणखी ७२ बसस्थानकांचा कास करण्याचा निर्णय घेतला. मात्र आता हा प्रस्ताव सरकारने थांबवून नव्याने ९८ वर्षांच्या भाडेपट्ट्यासाठी निविदा काढण्याची तयारी सुरू केली आहे. ६० वर्षांचा कालावधी निश्चित करून अवघ्या आठ महिन्यांत तो ९८ वर्षांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतल्यामुळे अनेकांचे भुवया उंचावल्या आहेत. 

कालावधी का वाढवताय...  उपमुख्यमंत्र्यांचा आक्षेप मंत्रिमंडळ बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या निर्णयाला आक्षेप घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. ६० वर्ष भाडेपट्ट्याने देण्याचे धोरण तयार केले असताना आता एवढा कालावधी वाढवण्याची गरज आहे का? असा सवाल त्यांनी केल्याचे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :State Governmentराज्य सरकार