शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

चालकांपुढे एसटी महामंडळ हतबल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 04:16 IST

एसटी महामंडळाच्या वातानुकूलित ‘शिवशाहीच्या वाढत्या तक्रारी’ सध्या राज्यातील प्रवाशांच्या चर्चेचा विषय आहे. कंत्राटी शिवशाहीवरील चालक हा कंत्राटदाराचा असून

महेश चेमटेमुंबई : एसटी महामंडळाच्या वातानुकूलित ‘शिवशाहीच्या वाढत्या तक्रारी’ सध्या राज्यातील प्रवाशांच्या चर्चेचा विषय आहे. कंत्राटी शिवशाहीवरील चालक हा कंत्राटदाराचा असून, वाहक महामंडळाचा आहे. ‘खासगी’ चालकांकडून बेदरकारपणे आणि दारू पिऊन बस चालवण्याचा प्रकार घडतात. अशा चालकवर्गाच्या प्रवाशांच्या तक्रारी आल्यानंतर महामंडळाला थेट कारवाई करण्याचे अधिकार नाही. यामुळे महामंडळाला केवळ बघ्याची भूमिका घ्यावी लागते. परिणामी, महामंडळ कंत्राटदाराच्या चालकांसमोर हतबल झाले असल्याचे चित्र आहे.राज्यातील शिवशाहीचालक दारूच्या नशेत बस चालवत असल्याचे अनेक प्रकार प्रवाशांनी उघडकीस आणले आहेत. औरंगाबाद-चंद्रपूर शिवशाहीचा चालक दारूच्या नशेत बस चालवत असल्याचे प्रवाशांनी निदर्शनास आणून दिले, यावर महामंडळाने चालकाला ५० हजारांचा दंड आकारला. खासगी कंपनीने संबंधित चालकाला अन्य आगारात नियुक्त केले. तसेच ठाणे-दापोली शिवशाहीच्या मद्यधुंद चालकाला प्रवाशांनी हाकलवून लावले. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) भाडेतत्त्वावरील खासगी वातानुकूलित शिवशाही राज्यभर धावत आहेत. कंत्राटी शिवशाही बसमध्ये चालक हा कंत्राटदारांचा असून, वाहक हा महामंडळाचा आहे. यामुळे चालकांच्या अरेरावीपुढे महामंडळ हतबल झाले आहे.पुणे-नाशिक, औरंगाबाद-चांदूर, सावंतवाडी-पुणे, लातूर-औरंगाबाद, पुणे-अंबेजोगाई (टायर फुटून), नांदेड-लोहा शिवशाही थेट बसस्थानकावरील फलाटावर चढवल्यामुळे शिवशाहीला नुकसान, कोल्हापूर-स्वारगेट शिवशाही अपघातानंतर चालक बस घेऊन फरार, अशा प्रकारे राज्यातील बहुतांशी मार्गावरील शिवशाही काही महिन्यांच्या काळातच अपघातग्रस्त झाल्या आहेत.मुख्यालयात माहिती उपलब्ध नाहीशिवशाहीबाबत तक्रार आल्यास संबंधित कंत्राटदारांवर योग्य ती कारवाई करण्याची मुभा आगार व्यवस्थापकांना देण्यात आली आहे. प्रवाशांच्या तक्रारीनुसार आगार व्यवस्थापक कारवाई करत आहेत. कारवाईबाबत करारात योग्य तरतूद आहे. खासगी चालकाबाबत तक्रार आल्यास संबंधित चालकाला आगारातून काढण्याची कारवाई करण्यात येते. आगारातून कारवाई होत असल्यामुळे मुख्यालयाकडे केलेल्या कारवाईची कोणतीही माहिती उपलब्ध नाही.- श्रीनिवास जोशी,विभाग नियंत्रक, शिवशाहीप्रवासी ‘अ’सुरक्षिततेसाठी!प्रवासी तक्रारीनुसार महामंडळ संबंधित कंत्राटदाराला केवळ नोटीस बजावते. नोटीस प्राप्त झाल्यानंतर, संबंधित चालकांची बदली या आगारातून त्या आगारात केली जाते. यामुळे महामंडळाच्या ‘प्रवासी सेवेसाठी’ या ब्रीदवाक्याला धक्का लागल्याचे महामंडळातील ‘जुने-जाणते’ अधिकारी खासगीत मान्य करतात.