विलास गावंडे - यवतमाळ महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन (एसटी) महामंडळाला ६६ वर्षांत पहिल्यांदाच भरघोस उत्पन्न देणार्या मे महिन्यात तोटा झाला आहे. मार्च ते मे हे तीन महिने एसटीसाठी उत्पन्नाच्या बाबतीत सुगीचे मानले जातात. मात्र याच तीन महिन्यात तब्बल ४00 कोटींचा फटका बसला आहे. गतवर्षी केवळ मे महिना नफ्याचा राहिला. दोन महिने तोट्यात राहिल्यानंतरही महामंडळाने बोध घेतला नाही. परिणामी यावर्षी मे महिनाही हातचा गेला. गेली काही वर्षांपासून एसटी महामंडळाला नफ्याचे दिवस स्वप्नातही नाहीत. सन २0१२-१३ या आर्थिक वर्षात ७२२ कोटीने तोट्यात राहिलेल्या एसटीने नफा वाढविण्यासाठी किंवा तोटा कमी करण्यासाठी कुठल्याही ठोस उपाययोजना आखल्या नाहीत. परिणामी तोट्याचा आकडा फुगत चालला आहे. मार्च, एप्रिल, मे या तीन महिन्यात लग्नाचा ठोक अधिक राहात असल्याने बसेस प्रवाशांनी खचाखच भरून धावतात. पण, यावर्षी एसटी महामंडळाला ही गर्दी एसटी महामंडळाच्या स्थापनेला येत्या १ जून रोजी ६६ वर्षे पूर्ण होत आहेत.
‘एसटी’ महामंडळ ६६ वर्षांत पहिल्यांदाच ‘मे’मध्ये तोट्यात
By admin | Updated: May 28, 2014 00:55 IST