शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

एसटी संप : उच्च न्यायालयात दोन याचिक दाखल, याचिकेवर शुक्रवारी सुनावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2017 05:28 IST

एसटीच्या कर्मचा-यांच्या बेमुदत संपाविरुद्ध दोन याचिक दाखल करण्यात आल्या आहेत. या दाखल याचिकांवर उच्च न्यायालयाने शुक्रवारी सुनावणी ठेवली आहे.

मुंबई : एसटीच्या कर्मचा-यांच्या बेमुदत संपाविरुद्ध दोन याचिक दाखल करण्यात आल्या आहेत. या दाखल याचिकांवर उच्च न्यायालयाने शुक्रवारी सुनावणी ठेवली आहे.दिवाळीची सुटी असल्याने लोक मुंबईबाहेर जाणार आहेत तर काही बाहेरून मुंबईत येणार आहेत. मात्र, संपामुळे लोकांना हाल सहन करावे लागत आहेत. त्यामुळे हा संप बेकायदा असल्याचे जाहीर करावे, अशी विनंती करणारी जनहित याचिका पत्रकार जयंत साटम यांच्याकडून उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.एसटी संपामुळे प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होतात. त्यामुळे हा संप चुकीचा असून तो ऐन सणासुदीच्या दिवशी करून प्रवाशांना वेठीस धरू नये असे मत प्रवाशांकडून व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे साटम यांच्याप्रमाणेच एसटी संपासंदर्भातील आणखी एक याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.न्या. संदीप शिंदे यांनी या दोन्ही याचिकांवरील सुनावणी शुक्रवारी ठेवली आहे.एसटी कर्मचाºयांच्या मागण्या योग्य असल्या, तरी सणाच्या आदल्या दिवशीच संपावर जाऊन प्रवाशांना वेठीस धरणे हे योग्य नाही, असे अ‍ॅड. पूजा थोरात व अ‍ॅड. माधव थोरात यांनी म्हटले आहे. त्यावर उच्च न्यायालयाने यासंबंधी एका समितीची नियुक्ती करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले आहे.एसटी कर्मचाºयांच्या सर्व तक्रारी सविस्तरपणे ऐकून त्या सोडविण्यासाठी एखादी समिती असायला हवी. त्यांनी याबाबत थोडे संशोधन करून काय प्रस्ताव ठेवणे योग्य ठरेल, हेही पाहायला हवे, असे मत न्या. शिंदे यांनी व्यक्त केले. प्रवाशांना नाहक त्रासदिवाळीची सुटी असल्याने लोक मुंबईबाहेर जाणार आहेत तर काही बाहेरून मुंबईत येणार आहेत. मात्र, संपामुळे लोकांना हाल सहन करावे लागत आहेत. त्यामुळे हा संप बेकायदा असल्याचे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे.

टॅग्स :ST Strikeएसटी संपCourtन्यायालय