शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

एसटीची ‘प्रवासी सुरक्षितता’ मोहीम सुसाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2017 04:58 IST

खेडोपाडी सुविधा देणाºया एसटी बसच्या अपघातांत घट झाली आहे. एप्रिल २०१६ ते मे २०१७ या कालावधीत सुमारे ३५ कोटींहून अधिक प्रवाशांची एसटीने वाहतूक केली.

मुंबई : खेडोपाडी सुविधा देणाºया एसटी बसच्या अपघातांत घट झाली आहे. एप्रिल २०१६ ते मे २०१७ या कालावधीत सुमारे ३५ कोटींहून अधिक प्रवाशांची एसटीने वाहतूक केली. या प्रवासात ४७३ अपघात घडले; यात सुमारे ६० प्रवाशांचा मृत्यू झाला. गतवर्षी याच कालावधीत सुमारे ८० प्रवाशांना प्राणास मुकावे लागले होते. दरम्यान, प्रवासी अपघात निधीसाठीची १५० कोटींची रक्कम एसटी प्रशासनाकडे शिल्लक असून, ७४ कोटी निधीपोटी वितरित करण्यात आले आहेत.राज्यात एसटी प्रशासनाच्या वतीने चालक-वाहकांसाठी विभागस्तरीय शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरांत वाहकांना रोजच्या सुरक्षिततेसह बसची निगा कशी राखावी, याबाबत माहिती देण्यात आली. एप्रिल १६ ते मे १७ या कालावधीत १७ हजारांहून जास्त एसटी बसमधून ३५ कोटींपेक्षा जास्त प्रवाशांनी प्रवास केला. या कालावधीत गंभीर आणि किरकोळ स्वरूपाचे ४७३ अपघात झाले. यात सुमारे ६० प्रवासी मरण पावले तर ७५०पेक्षा जास्त प्रवासी जखमी झाले. गतवर्षी या कालावधीत झालेल्या ४८४ अपघातांत सुमारे ८० प्रवाशांचा मृत्यू झाला. यंदा अपघातांचे प्रमाण घटले आहे. भविष्यात एसटी प्रशासन ‘शून्य अपघात’ मोहीम राबवणार असल्याची माहिती एसटीच्या वरिष्ठ अधिकाºयांनी दिली.