शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

एसटी बस व ट्रकची अमोरासमोर धडक; २७ प्रवासी जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2020 11:29 IST

टेंभूर्णा फाट्याजवळ सकाळी दहा वाजता झालेल्या या अपघातात बसमधील २७ प्रवासी जखमी झाले.

ठळक मुद्देजालना जिल्ह्यातील शिंदखेडा आगाराची बस अकोला येथून शिंदखेडाकडे जात होती.या बसमध्ये ४५ प्रवासी होते.ही धडक एवढी जोरदार होती की बस आणि ट्रकच्या दर्शनी भागाचा यामध्ये चुराडा झाला.

खामगाव: अकोला-सिंदखेडा (धुळे) बस व ट्रकमध्ये अपघात झाल्याची घटना राष्ट्रीय महामार्गावर टेंभूर्णाफाट्याजवळील जय भवानी पेट्रोलपंपासमोर सकाळी ९.५० वाजेदरम्यान घडली. या अपघातात बसमधील २७ प्रवाशी जखमी झाले असून त्यापैकी २२ सामान्य रुग्णालयात तर ५ शासकीय रुग्णालयात उपचार घेत आहेत. अकोलावरून खामगावकडे अकोला- सिंदखेडा ही बस येत होती. दरम्यान जय भवानी पेट्रोलपंपाजवळ एक कार ओव्हरटेक करत होती. यामुळे ट्रकची धडक बसला लागली. यामध्ये २७ प्रवाशी जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी प्रवाशांना तातडीने सामान्य रुग्णालयात उपचारासाठी नेण्यासाठी धावपळ केली. खामगाव ग्रामिण पोलिसांनी धाव घेत वाहतूक सुरळीत केली. जखमींमध्ये कमल लक्ष्मणराव बोदडे (वय ६७) रा. यवतमाळ, विमल गजानन पानझोडे (वय ४०) रा. पळशी बु, लिना मधुकर बाळापूरे (वय ६०) रा. खानापूर पातूर, प्रभाकर बजरंग बोदडे (वय ७०) रा. अकोला, अनिल कुमार नंदणेराय (वय ६५) रा. नागपूर, प्रमिला शांतीलाल (वय ८) रा. सेंधवा, निलेश शांतीलाल (वय ४) रा. सेंधवा, अमिता शांतीलाल (वय ३५) रा. सेंधवा, प्रार्थना भिमराव साघरे (वय ३८) रा. अकोला, रविंद्र रमेश पाटील (वय ३९) रा. धुळे, विनोद रतन सटाले (वय ४८) रा. अकोला, उमाजी बाळू वडिले, मुडावत जि. धुळे, गजानन प्रभाकर बोदडे (वय ५७) रा. पळशी, मतुथवार खाटी (वय ६३) रा.निजाळा, रमाबाई बब्बू रब्टी (वय ५५) रा. कटळ, शुभम गाडेकर (वय २०) रा. संबापूर, चंद्रकांत रामकृष्ण डांगे (वय ५०) रा. अकोला, विमल प्रभाकर बोदडे (वय ६२) रा. अकोला सफर अंसारी (वय २०) रा. शहादा, विष्णू अरविंद गावंडे (वय ३३) रा. अकोला व नुरजहॉ सादिक अंसारी (वय २५) रा. शहादा यांचा समावेश आहे. या जखमींवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत तर उर्वरीत ५ प्रवाशांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. एका कारला वाचवण्याचा हा प्रयत्नात अपघात झाल्याची माहिती प्रवाशांनी दिली.

टॅग्स :khamgaonखामगावAccidentअपघात