शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

गणेशोत्सवासाठी एसटी प्रशासन सज्ज; सिंधुदुर्गात 350 गाड्या येणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2017 15:21 IST

कोकणातील महत्वपूर्ण अशा गणेशोत्सवासाठी एसटी प्रशासन सज्ज झालं आहे.

ठळक मुद्देकोकणातील महत्वपूर्ण अशा गणेशोत्सवासाठी एसटी प्रशासन सज्ज झालं आहे. मुंबईतून रायगड,रत्नागिरी तसंच सिंधुदुर्ग जिल्ह्यात 2216 गाड्या येणार असून त्यापैकी सुमारे 350 गाड्या सिंधुदुर्गात दाखल होतील.

- सुधीर राणे

कणकवली, दि. 18- कोकणातील महत्वपूर्ण अशा गणेशोत्सवासाठी एसटी प्रशासन सज्ज झालं आहे. मुंबईतून रायगड,रत्नागिरी तसंच सिंधुदुर्ग जिल्ह्यात 2216 गाड्या येणार असून त्यापैकी सुमारे 350 गाड्या सिंधुदुर्गात दाखल होतील. तर भाविकांच्या परतीच्या प्रवासासाठीही व्यवस्था करण्यात आली असून गाडयांचे ऑनलाइन बुकिंग सुरु झालं आहे.

रेल्वे स्थानक ते बसस्थानक अशा ही गाड्या सोडण्यात येणार असून  रेल्वे स्थानकात एसटीसाठी वाहतूक नियंत्रण कक्ष सुरु होणार आहे. भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी दक्षता घेण्यात येत असल्याचं एसटीच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं.गणेशोत्सवात मुंबई तसंच पुणे स्थित अनेक नागरिक आपल्या मूळ गावी येत असतात. त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी एसटीने नियोजन केलं आहे. मुंबईच्या विविध भागातून सुमारे 350 गाड्या सिंधुदुर्गात गणेशोत्सवाच्या कालावधीत येतील. त्यांचे ऑनलाइन बुकिंग तिकडेच होत असल्याने त्याबाबत अधिक माहिती गाड्या सिंधुदुर्गात दाखल झाल्यानंतरच मिळत असते. तरीही दरवर्षी येणाऱ्या गाड्या लक्षात घेऊन नियोजन करण्यात आलं आहे.

भाविकांच्या परतीच्या प्रवासासाठी सिंधुदुर्ग विभाग पातळीवर नियोजन करण्यात आलं आहे. सिंधुदुर्गात आलेल्या भाविकांच्या परतीच्या प्रवासासाठी मागणीनुसार गाडयांचे आरक्षण करून त्या सोडण्यात येतील. ऑनलाइन आरक्षणा बरोबरच तत्काळ आरक्षणाची सोय ही उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

रेल्वेस्थानकावरुन बसस्थानक किंवा प्रवासी उपलब्धतेनुसार गावपातळीवर त्यांना पोहचविण्याच्या व्यवस्थेबाबत नियोजन करण्यात येणार आहे. कणकवली, कुडाळ,सावंतवाडी या रेल्वेस्थानकात एसटीचा वाहतूक नियंत्रण कक्ष सुरु करण्यात येणार आहे. याठिकाणी असलेले वाहतूक नियंत्रक रेल्वेबाबत घोषणा झाल्यावर बसस्थानकात दूरध्वनीद्वारे संपर्क करून आवश्यकतेनुसार गाड्या मागविणार आहेत. अवघ्या 10 मिनिटांत या गाड्या रेल्वे स्थानकात पोहचतील, असं नियोजन करण्यात आलं आहे. परतीच्या प्रवासासाठी निघणाऱ्या गाड्या साधारणतः दुपारनंतर मुंबईच्या दिशेने रवाना होतील. मुंबई सेंट्रल,ठाणे,बोरीवली या भागातून जास्त गाडयांचे आरक्षण झाले आहे.गणेशोत्सवाच्या कालावधीत प्रवाशांना चांगल्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी प्रयत्न सुरु आहेत. बसस्थानकांबरोबरच स्वच्छतागृहे स्वच्छ ठेवण्याकड़े कटाक्ष ठेवण्यात येणार आहे. बंद पडलेल्या गाड्या तत्काळ दुरुस्त करण्यासाठी दुरुस्ती पथके ही सज्ज ठेवण्यात येणार आहेत.मुंबई गोवा महामार्गावरील कणकवली तालुक्यातील तळेरे येथे एस.टी.चे चेकपोस्ट 22 ते 25 ऑगस्ट या कालावधीत 24 तास सुरु असणार आहे. त्याचप्रमाणे राजापुर ते बांदा या परिसरात फिरते दुरुस्ती पथक कार्यान्वित असणार आहे. क्रेनही उपलब्ध रहाणार आहे. दिवसरात्र मार्ग तपासणी पथक कार्यरत असणार असून ते फक्त टिकट तपासणी न करता प्रवाशांना मार्गदर्शन करणार आहे. 21 ते 25 ऑगस्ट या कालावधीत मुंबईच्या विविध भागातून सिंधुदुर्गात प्रवाशांना येता यावे यासाठी हंगामी गाड्या सुरु करण्यात आल्या आहेत. प्रवाशांच्या मागणी नुसार या गाड्याचा कालावधी पुढे वाढविण्यात येणार आहे. कणकवली, मालवण, कुडाळ, सावंतवाड़ी, पणजी याठिकाणी प्रवाशांना एस.टी.चे तिकीट बुकिंग करताना स्वाईप मशीनद्वारे तिकीटाची किंमत जमा करता येणार आहे.गणेशोत्सवासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणाऱ्या भाविकांच्या परतीच्या प्रवासासाठी सावंतवाड़ी ते बोरीवली, मुंबई, कुडाळ ते बोरीवली, कणकवली ते ठाणे, मुंबई, बोरीवली, फोंडा ते बोरीवली, देवगड ते ठाणे मार्गे कुर्ला, देवगड नाटे मार्गे मुंबई, विजयदुर्ग बोरीवली, मालवण ते पुणे- निगडी, अर्नाळा , ठाणे,कल्याण अशा एस.टी.च्या गाड्या सोडण्यात येणार असून प्रवाशांचा ओघ बघुन इतर एस.टी.आगारातूनहि गाड्या सोडण्यात येणार आहेत. त्याशिवाय विजयदुर्ग मुंबई, कणकवली बोरीवली, देवगड बोरीवली, मालवण मुंबई अशा नियमित गाड्याही सुरु आहेत.त्यामुळे भाविकाना त्याचा लाभ घेता येणार आहे. गणेशोत्सवाच्या कालावधीत जिल्ह्यातर्गत वाहतुकीसाठीही एसटी प्रशासनाकडून नियोजन करण्यात आलं असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं.

23 ऑगस्ट रोजी कोकणात सर्वाधिक गाड्या!श्री गणेश चतुर्थी 25 ऑगस्ट रोजी असून त्यानिमित्ताने  मुंबईच्या विविध भागातून कोकणात 23 ऑगस्ट रोजी सर्वाधिक म्हणजे 1242 गाड्या भाविकाना घेवून येणार आहेत. 

टॅग्स :Ganeshotsavगणेशोत्सव