घोडबंदर : शहरातील वाहतूककोंडी सोडवण्यासाठी शासनाने मंजूर केलेल्या रस्त्यांच्या विकास आराखड्याला गती देण्याच्या हालचाली ठाणे महापालिकेने सुरु केल्या आहेत. यात शहराबाहेरून जाणारा महत्त्वाचा असलेला आणि गेली अनेक वर्षे रखडलेला श्रीनगर गायमुख या रस्त्याच्या सर्वेक्षण कामाचा श्री गणेशा आयुक्त संजीव जयस्वाल यांनी केला आहे. त्यांच्या सूचनेनुसार या रस्त्याचा प्लनटेबल सर्वे व कंटूर सर्वेक्षणाला शुक्र वारी सुरु वात केली जाणार आहे. हे काम महापालिकेच्या पॅनलवर असलेली आकार अभिनव संस्था करणार आहे. कैलासनगर, रामनगर परिसरासह रामबाग आणि येऊर हद्दीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून जाणाऱ्या रस्त्याच्या जागेचे मोजमाप होणार आहे. हा अहवाल आठ दिवसांत आयुक्तांना सादर करण्यात यईल.७ एप्रिल २०१६ रोजी आयुक्तांनी प्रत्यक्ष पाहणी करून श्रीनगर ते गायमुख बाह्यवळण रस्त्याच्या सर्वेक्षणाच्या कामासाठी शहर विकास विभाग अधिकाऱ्यांना सूचना दिल्या होत्या. मुलुंड चेकनाका वैशालीनगर येथून एल आकार घेऊन हा रस्ता वारलीपाडा येथे जोडणार असून मुंबई महापालिका त्यांच्या हद्दीतील रस्त्याचे काम सुरु करणार आहे. ठाणे मनपाचे माजी आयुक्त आर. ए. राजीव यांच्या कार्यकाळात या रस्त्याच्या कामासाठी निधी ठेवण्यात आला होता. तसेच महासभेने या रस्त्याला मंजुरी दिलेली आहे. शहर विकास विभागाने या रस्त्याच्या मार्गात येणारे अडथळे समोर आणले होते. वन जमीन आणि रस्त्याच्या मार्गात बाधित होणाऱ्या बांधकामांची संख्या मोठी असल्याने त्या कामाला हात लागला गेला नव्हता. (प्रतिनिधी)
श्रीनगर-गायमुखचे सर्वेक्षण
By admin | Updated: April 29, 2016 04:13 IST