शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
5
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
6
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
7
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
8
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
9
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
10
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
11
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
12
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
13
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
14
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
15
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
16
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
17
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
18
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
19
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
20
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

एसआरए घरे हस्तांतरण प्रमाणपत्र ऑनलाइन; गृहनिर्माणमंत्री अतुल सावे यांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2024 06:17 IST

झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील घरे विकण्यासाठी लागणाऱ्या ना हरकत प्रमाणपत्राबाबत भाजपचे आमदार विजय गिरकर यांनी विधानपरिषदेत प्रश्न मांडला होता

मुंबई - झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील घरांच्या खरेदी-विक्रीसाठी ना हरकत प्रमाणपत्र बंधनकारक आहे. मात्र, त्यासाठी नागरीकांची होणारी धावपळ आता थांबणार आहे. एसआरएतील घरांच्या हस्तांतरासाठी आता ऑनलाइन पद्धतीने प्रमाणपत्र मिळणार आहे. एक महिन्याच्या आत याची कार्यवाही होणार असून अर्ज केल्यापासून ४५ दिवसांच्या आत प्रमाणपत्र मिळणार, अशी घोषणा गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी गुरुवारी विधानपरिषदेत केली.

झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील घरे विकण्यासाठी लागणाऱ्या ना हरकत प्रमाणपत्राबाबत भाजपचे आमदार विजय गिरकर यांनी विधानपरिषदेत प्रश्न मांडला होता. एसआरएची योजना १९९५ साली सुरू झाली असून या योजनेला ३० वर्षे झाली. मधल्या काळात अनेकांनी एसआरएतील घरांची खरेदी-विक्री केली आहे. या खरेदी-विक्रीची कागदपत्रे एसआरएतून नव्हे तर कोर्टाच्या माध्यमातून केली गेली आहेत. आता ना हरकत प्रमाणपत्र मागविण्यात येत आहे. पण अनेक मूळ मालकांचे निधन झाले असल्याने ही अट शिथिल करावी, अशी मागणी गिरकर यांनी केली. यावर गृहनिर्माण मंत्री सावे म्हणाले, पूर्वी हस्तांतरणाची अट दहा वर्षे होती, ती अट शिथिल करून पाच वर्षे केली. तसेच हस्तांतर शुल्क एक लाखावरून ५० हजार रुपये केले. एवढेच नव्हे तर रक्ताच्या नात्यामध्ये सदनिका हस्तांतर करायची झाल्यास त्यासाठी २०० रूपये आकारले जातात.

वारसांनाही दिले जाते प्रमाणपत्रएसआरए योजनेतील घरे हस्तांतरणासाठी लागणारे ‘ना हरकत प्रमाणपत्र’ ऑनलाइन पद्धतीने देण्याचा निर्णय घेतला असून एक महिन्यात याची कार्यवाही सुरू होईल, असे सावे यांनी सांगितले. तसेच झोपडपट्टी धारक मृत असल्यास त्याच्या वारसाने वारसा प्रमाणपत्र सादर केल्यास त्यांनाही ना हरकत प्रमाणपत्र देण्यात येत असल्याची माहितीही यावेळी मंत्री सावे यांनी दिली. या प्रश्नाच्या चर्चेत प्रवीण दरेकर, कपिल पाटील, जयंत पाटील यांनीही सहभाग घेतला.

टॅग्स :Atul Saaveअतुल सावेVidhan Parishadविधान परिषद