शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर राहुल गांधी दुसरे आंबेडकर सिद्ध होतील", ओबीसी समाजाला आवाहन करत काँग्रेसच्या मोठ्या नेत्याचं विधान
2
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
3
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
4
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
5
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...
6
अंगावर धावून गेली, चप्पल फेकून मारली अन्...; रुची गुज्जरची निर्मात्याला मारहाण, व्हिडीओ व्हायरल
7
कॉलेजला जाण्यापूर्वी हवी होती लीन बॉडी; ऑनलाईन ट्रेंड, लिक्विड डाएट बेतलं जीवावर, मुलाचा मृत्यू
8
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
9
अरेरे! 'सैयारा' पाहून तुफान राडा; गर्लफ्रेंडसाठी थिएटरबाहेर भिडले २ तरुण, लाथा-बुक्क्यांनी मारहाण
10
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
11
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
12
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
13
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
14
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी
15
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
16
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
17
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
18
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."
19
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
20
धक्कादायक घटना! एक वर्षाच्या मुलाने नागाचा चावा घेतला, कोब्राचा मृत्यू झाला; पण मुलगाही...

पाणीपुरी टोळीने लावला साखर व्यापार्‍याचा स्पॉट

By admin | Updated: May 22, 2014 02:14 IST

गुपचूप (पाणीपुरी) विकणार्‍या टोळीने लकडगंजमधील साखर व्यापार्‍याचा स्पॉट लावला होता.

नागपूर : गुपचूप (पाणीपुरी) विकणार्‍या टोळीने लकडगंजमधील साखर व्यापार्‍याचा स्पॉट लावला होता. या टोळीला रोकड लुटण्यात तर यश आले. मात्र, घोडा (पिस्तूल) अडल्याने (जाम झाल्याने) व्यापार्‍याचा जीव बचावला. शिवाय जमावाच्या हाती एक आरोपी लागला. त्याच्या जबानीतून या लुटमारीच्या घटनेचा उलगडा झाला.

छापरू नगरातील हरीश रोचीराम फुलवानी (वय ५७) यांची इतवारीतील मस्कासाथमध्ये रोचीराम लीलाराम फर्म आहे. ते साखर, तेल, मैद्याचा व्यापार करतात. मंगळवारी रात्री ११ वाजता दुकान बंद करून ते कपिल नामक मुलासह अँक्टीव्हाने घरी परत येत होते. बोंदरे हॉस्पिटलसमोर दोन मोटरसायकलस्वारांनी फुलवानीच्या दुचाकीला कट मारून खाली पाडले. लुटारूंनी डोळ्यात मिरची पावडर फेकल्यामुळे हरीश आणि कपिल हतबल झाले. ती संधी साधून फुलवानींच्या दुचाकीला अडकवलेली १२ लाख रुपये असलेली पिशवी हिसकावून घेतली. ती ताब्यात घेण्यासाठी फुलवानी धावले. ते प्रतिकार करीत असल्याचे पाहून लुटारूपैकी एकाने हवेत गोळीबार केला. फुलवानींचा आरडाओरड ऐकून मोठय़ा संख्येत परिसरातील लोक धावून आले. त्यांना ‘आगे मत बढना‘ म्हणत आरोपींनी दुसरी गोळी झाडण्याचा प्रयत्न केला. मात्र, ही गोळी पिस्तुलातच फसल्याने पुढचा अनर्थ टळला. घाईगडबडीत एका मोटरसायकलवरचे लुटारू रोकड घेऊन पळून गेले. परंतु दुसरी मोटरसायकल घसरून खाली पडल्यामुळे आरोपी राजेश राजन तोमर (रा. छावणी रेल्वे फाटक , बाडा, जि. ग्वाल्हेर) हा बाजूच्या झोपड्यात जाऊन लपला. संतप्त जमावाने तोमरला बाहेर खेचून बेदम चोप दिला. दरम्यान, या घटनेची माहिती कळताच लकडगंज पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. पोलिसांनी तोमरला ताब्यात घेतले. (प्रतिनिधी)