शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

बालेवाडीतील क्रीडासंकुल लवकरच स्वायत्त

By admin | Updated: April 7, 2017 05:53 IST

म्हाळुंगे-बालेवाडी (पुणे) येथे शिवछत्रपती क्रीडापीठाला यशदा व पोलीस अकादमीच्या धर्तीवर जून २०१७पर्यंत स्वायत्तता देण्यात येईल

मुंबई : म्हाळुंगे-बालेवाडी (पुणे) येथे शिवछत्रपती क्रीडापीठाला यशदा व पोलीस अकादमीच्या धर्तीवर जून २०१७पर्यंत स्वायत्तता देण्यात येईल, अशी माहिती क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी आज विधानसभेत दिली.क्रीडा विभागासाठी सनदी लेखापालाची नियुक्ती केली असून, दरवर्षी जमा-खर्चाची तपासणी केली जाते. क्रीडाक्षेत्र व क्रीडापटूंना न्याय देण्यासाठी या क्रीडापीठाला स्वायत्तता देण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. विवाह सोहळ्यांसाठी क्रीडा संकुलाची जागा देण्यात येणार नाही. या क्रीडापीठामध्ये अनेक वर्षे एकाच पदावर कार्यरत असणाऱ्या अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली असून, ते बदलीच्या जागी हजर न झाल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असेही तावडे यांनी सांगितले. मेधा कुलकर्णी यांनी यासंदर्भात प्रश्न विचारला होता.सात एमआयडीसींमध्ये सांडपाणी प्रक्रिया केंद्रराज्यातील सात औद्योगिक विकास महामंडळांच्या ठिकाणी सामूहिक सांडपाणी प्रक्रिया केंद्र चालविण्यासाठी देण्यात आले असून, भविष्यात औद्योगिक प्रदूषणाच्या तक्रारी आल्यास या औद्योगिक विकास महामंडळांवर कारवाई करण्यात येईल, असे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी विधानसभेत सांगितले.डॉ. मिलिंद माने यांनी बुटीबोरी येथील इंडोरामा पॉवर प्लांट व शिल्पा रोलिंग मिलमुळे होणाऱ्या प्रदूषणाबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. या कंपन्यांद्वारे प्रक्रिया केंद्र सुरू नसेल तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असेही कदम यांनी या वेळी सांगितले. (विशेष प्रतिनिधी) अन्न व औषधी कायद्यात आमूलाग्र बदल करणारअन्न व औषध प्रशासन कायद्याच्या नियमांचे उल्लंघन करून बनावट सौंदर्य प्रसाधने व औषध कंपन्यांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आली आहे. यासंदर्भातील कायदा केंद्र शासनाचा असून, त्यात आमूलाग्र बदल आवश्यक आहे. त्यासाठी केंद्र व राज्य शासनाने आवश्यक ती पावले उचलली असून, यासंदर्भातील गुन्हा अजामीनपात्र होण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे अन्न व प्रशासन मंत्री गिरीश बापट यांनी सांगितले.सदस्य योगेश सागर यांनी ठाणे आणि भिवंडी येथे अन्न व औषध प्रशासनाने औषधांचा साठा जप्त केल्याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. चर्चेत सदस्य राजेंद्र पटणी, हरीश पिंपळे यांनी भाग घेतला.पाड्याला मिळाला गावाचा दर्जाचोपडा तालुक्यातील उत्तमनगर पाड्याला गावाचा दर्जा देण्यासाठी ग्रामविकास वने व महसूल व पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाची बैठक घेण्यात येईल, असे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी सांगितले.धान साठवणुकीसाठी आदिवासी भागात गोदामेराज्यातील आदिवासी भागात धान साठवणुकीसाठी पीपीपी तत्त्वावरील गोदामे बांधण्यात येतील, असे अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी सांगितले. सरदार तारासिंह यांनी धान खरेदी केंद्रांतर्गत खरेदी केलेले धान मिल मालक उचलत नसल्याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता.शाळांचे बांधकाम १५ जूनपूर्वी लातूर जिल्ह्यातील मोटेगाव व सत्तरधरवाडी या दोन्ही गावांतल्या शाळा १५ जूनपूर्वी पूर्णपणे बांधण्यात येतील, असे शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी सांगितले. योगेश सागर यांनी मोटेगाव सत्तरधरवाडी येथील जि. प. शाळा इमारतींच्या झालेल्या दुरवस्थेबद्दल प्रश्न विचारला होता.