शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात बाप्पांना भावपूर्ण निरोप

By admin | Updated: September 2, 2014 23:14 IST

ठाण्यासह पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सुमारे 52 हजार 795 बाप्पांना विधिवत व ढोलताशांच्या गजरात आणि गुलाल उधळून भर पावसात निरोप देण्यात आला.

ठाणो : पाच दिवस गणरायाची सेवा केल्यानंतर मंगळवारी ठाण्यासह पालघर जिल्ह्याच्या  ग्रामीण भागात सुमारे 52 हजार 795 बाप्पांना विधिवत व ढोलताशांच्या गजरात आणि गुलाल उधळून भर पावसात निरोप देण्यात आला. यासाठी ठिकठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तसेच ठाण्यासह, कल्याण, डोंबिवली, मिरा भाईंदर, भिवंडी महापालिका, उल्हासनगर महापालिका सुध्दा यासाठी सज्ज होती.  अनेक ठिकाणी अनुचित घटना टिपण्यासाठी सीसी टिव्ही कॅमेरेही लावण्यात आले होत़े तर पाऊस असून भक्तांचा उत्साह शिगेला पोहचला होता़
ठाणो पोलीस आयुक्तालायासह, ठाणो शहरात मंगळवारी पाच दिवसांच्या बाप्पांना जल्लोषात निरोप देण्यात आला. ठाणो महापालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या कृत्रिम तलावांसह विसजर्न घाटावर खाजगी सुरक्षा रक्षकांसह, महापालिकेचे कर्मचारी तैनात होते. तसेच या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये म्हणून सीसीटीव्ही कॅमे:यांचा वॉच ठेवण्यात आला होता. 
सायंकाळी चार वाजल्यापासून येथे गणराला ढोल ताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतषबाजीत आणि गुलाल उधळीत गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर याचा नारा देऊन गणरायाला विधिवत निरोप देण्यात आला. पालिकेने पारसिक रेतीबंदर, कोलशेत रेतीबंदर आणि कोपरी येथे विसजर्न महाघाट तयार केले आहेत. या ठिकाणी छोटय़ा गणोश मूर्तीबरोबरच पाच फुट आणि त्यापेक्षा मोठय़ा आकाराच्या गणोश मुर्तीचे विसजर्न करण्याची व्यवस्था करण्यात आली होती. याशिवाय रायलादेवी येथे दोन कृत्रीम तलावांची, तर उपवन निळकंठ वुड्स - टिकुजिनीवाडी, बाळकुम - रेवाळे तलाव, खारेगांव येथेही कृत्रीम तलावांची निर्मिती करुन त्याठिकाणी पालिकेने कर्मचा:यांसह खाजगी संस्थांच्या मदतनीस तैनात ठेवले होते. तसेच विसजर्न घाट अथवा कृत्रीम तलावांच्या ठिकाणी श्रींच्या मूर्तीचे विसजर्न करता येणो शक्य नाही. त्यांच्यासाठी पालिकेने मडवी हाऊस, वर्तकनगरमध्ये व्यंकटेश मंदिर, चिंरजीवी हॉस्पीटल, पोखरण रोड नं.2, वागळे इस्टेट रोड नं.16, मासुंदा तलाव, जेल तलाव परिसर, पाईप लाईन ब्रीज, खिडकाळी, उपवन, खारीगाव, मॉडेला चेकनाका आदी ठिकाणी श्रींच्या मुर्ती स्वीकार केंद्रे उभारली होती. 
दरम्यान ठाणो पोलीस आयुक्तालयातील ठाणो परिमंडळात सुमारे सार्वजनिक 11, खाजगी 5841, भिवंडी सार्वजनिक 19, खाजगी 3495, कल्याण सार्वजनिक 48, खाजगी 9275, उल्हासनगर सार्वजनिक 18, खाजगी 7क्65 आणि वागळे परिमंडळात सार्वजनिक 28, खाजगी 7523 बाप्पांना निरोप देण्यात आला.  (प्रतिनिधी)
 
4मीरा-भाईंदर शहरातील पाच दिवसांच्या सुमारे साडेपाच हजार गणोशमूर्तीचे मंगळवारी विसर्जन करण्यात आले. त्यात सुमारे साडेचार हजार घरगुती व सार्वजनिक मंडळांच्या सुमारे 1 हजार गणोश मूर्तीचा समावेश होता. मागील दीड व दोन दिवसांच्या गणोश मूर्तीच्या विसर्जनावेळी सुरुवात झालेल्या पावसाचे आगमन पाचव्या दिवशीही झाल्याने विसर्जनावर विरजण आले होते. परंतु, आपल्या लाडक्या गणोशाला निरोप देताना पावसाची तमा न बाळगता भक्तांनी वाजत-गाजत गणरायाला भक्तीभावाने निरोप दिला. विसर्जनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार होऊ नये, यासाठी पोलिसांनी विसर्जन घाटासह विसर्जनाच्या मार्गावर पोलिस बंदोबस्त ठेवला होता. 
 
7 हजार गणपतीना निरोप
उल्हासनगर परिमंडळात पाच दिवसाच्या 7 हजार 84  घरगुती तर सार्वजनिक मंडळाच्या 18  गणपती बाप्पान्ां भावपूर्ण निरोप देण्यात आला होता.  विसजर्नस्थळी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
 
रेल्वे स्टेशनजवळील कृत्रिम तलाव, बोटक्लबच्या तलावासह हिराघाट येथील वालधुनीनदीसह, अंबरनाथचे शिवमंदिर, शहाड येथील उल्हासनदीत बाप्पांना भावपूर्ण निरोप देण्यात आला आहे. 
 
महापालिकेने गणोश मंडळाबाहेर कचरा कुंडीत टाका, घंटागाडीची वाट पाहा आदी बॅनर्सद्बारे जनजागृती केल्याची माहिती उपायुक्त देविदास पवार यांनी दिली़