शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

मद्यधुंद पित्याने चिमुकल्याला दिले चटके

By admin | Updated: August 30, 2016 06:13 IST

तालुक्यातील निमखेड येथील एका मद्यधुंद पित्याने दारूच्या नशेत आपल्या अडीच वर्षीय चिमुकल्याला बेदम मारहाण करून त्याला चुलीतील पेटत्या लाकडाचे चटके दिले.

सुमित हरकुट, चांदूरबाजार (अमरावती)तालुक्यातील निमखेड येथील एका मद्यधुंद पित्याने दारूच्या नशेत आपल्या अडीच वर्षीय चिमुकल्याला बेदम मारहाण करून त्याला चुलीतील पेटत्या लाकडाचे चटके दिले. या क्रूरतेला जीवाच्या आकांताने विरोध करणाऱ्या पत्नीलाही त्याने मारहाण केली. मुलाच्या वेदनांनी गलबललेल्या मातेने दुसऱ्या दिवशी नवऱ्याची नजर चुकवून मुलाला खासगी दवाखान्यात नेले असता हा सर्व प्रकार उघडकीस आला.नीलेश खाडे असे या क्रूर पित्याचे नाव असून तो मजुरीचे काम करतो. दारूचे व्यसन जडल्याने तो पत्नी किरण व अडीच वर्षांचा मुलगा नैतिक याला रोज मारहाण करायचा. शनिवारी रात्री मद्यधुंद अवस्थेतील नीलेशने मुलाला पाणी आणण्यास सांगितले. घाबरलेल्या मुलाच्या हातून पाण्याचा ग्लास खाली पडला. या क्षुल्लक कारणावरून नीलेशने त्याला जबर मारहाण केली व चुलीवरील गरम भाजी त्याच्या अंगावर फेकली. इतक्यावरच त्याचे समाधान झाले नाही तर त्याने त्याला चुलीतील जळत्या लाकडाचे चटकेदेखील दिले. या कृत्याचा विरोध करणाऱ्या पत्नीलाही त्याने बेदम मारहाण केली. मुलाच्या वेदना पाहावत नसल्याने रविवारी दुपारी नीलेशची नजर चुकवून किरणने नैतिकला खासगी रुग्णालयात नेले. तिच्या मागावर असलेला नीलेशसुद्धा रुग्णालयात पोहोचला. उपचार करताना डॉक्टरांना संशय आल्याने त्यांनी विचारपूस केली असता त्याने दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, डॉक्टरांनी मुलाच्या आईला वारंवार विचारणा केली असता ती ढसाढसा रडू लागली आणि तिने सर्व हकीकत डॉक्टरांसमोर कथन केली. हा अमानवीय प्रकार पाहून डॉक्टरदेखील हादरून गेले. त्यांनी तत्काळ स्थानिक पोलीस स्टेशनला फोनवरून हकीकत सांगितली. माहिती मिळताच स्थानिक पोलीस रुग्णालयात धडकले व नीलेशला ताब्यात घेतले. ही घटना ब्राह्मणवाडा थडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने डॉक्टरांनी किरण व चिमुरड्याला घेऊन ब्राह्मणवाडा पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. (प्रतिनिधी)