शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
3
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
4
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
5
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
6
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
7
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
8
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
9
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
10
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
11
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
12
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
13
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
14
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
15
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
16
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
17
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
18
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
19
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?

शुक्रावर करणार सजीवसृष्टीचे ‘बीजारोपण’!

By admin | Updated: July 3, 2017 11:31 IST

भविष्यात गरज पडली तर मानवाला ‘सेकंड होम’ म्हणून शुक्र ग्रहावर जाऊन राहणे शक्य व्हावे या कल्पनेने पृथ्वीवरील जीवाणू शुक्राच्या वातावरणात

अजित गोगटे/ लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : भविष्यात गरज पडली तर मानवाला ‘सेकंड होम’ म्हणून शुक्र ग्रहावर जाऊन राहणे शक्य व्हावे या कल्पनेने पृथ्वीवरील जीवाणू शुक्राच्या वातावरणात नेऊन सोडून ते कालांतराने मानवी वस्तीसाठी अनुकूल करण्याची सुरुवात आतापासून सुरू करण्याची एक अभिनव आणि धाडसी योजना मुंबईतील एका स्वयंसेवी संस्थेने आखली आहे.नफा कमावणे हा उद्देश नसलेल्या ‘इंडियन अ‍ॅस्ट्रोबायोलॉजी रीसर्च फाउंडेशन’ (आयएआरएफ) या स्वयंसेवी संस्थेने सूरत येथे भरलेल्या जागतिक खगोल जीवशास्त्र परिषदेत या योजनेची रूपरेषा शनिवारी औपचारिकपणे जाहीर केली. संस्थेने त्यांच्या या प्रस्तावित योजनेला ‘बीजायन मिशन’ असे नाव दिले आहे. ‘बीजायन’ हा ‘बीज’ आणि ‘आयन’ या दोन संस्कृत शब्दांचा संयोग असून त्याचा अर्थ ‘बीजाचा अज्ञातातील प्रवास’ असा होतो.या मिशनचे मुख्य वैज्ञानिक व ‘आयएआरएफ’चे संचालक पुष्कर गणेश वैद्य यांनी सूरत येथील परिषदेत व नंतर ‘लोकमत’ने ई-मेलने पाठविलेल्या प्रश्नांना उत्तरे देऊन या मिशनविषयी सविस्तर माहिती दिली. शुक्र हा आपल्या ग्रहमालेतील सूर्यापासूनचा दुसरा ग्रह असून रात्रीच्या व पहाटेच्या आकाशात तो तेजस्वीपण दिसतो म्हणून त्याला बोली भाषेत ‘शुक्रतारा’ असे म्हटले जाते. कक्षेतील प्रदक्षिणेनुसार शुक्र पृथ्वीपासून जवळात जवळ ३.८० कोटी किमी तर दूरात दूर २६.१ कोटी किमी अंतरावर आहे. ग्रहमालेतील इतर ग्रहांहून उलट्या दिशेने म्हणजे पूर्वेकडून पश्चिमेकडे असा तो स्वत:भोवती फिरत असतो.अशा या ग्रहावर एक छोटेखानी यान पाठवून शुक्र पृथ्वीसारखा करण्यासाठी ‘टेराफॉर्मिंग’ करण्याची प्रक्रिया सुरु करणे ही आमच्या ‘बिजायन’ मिशनमागची मुख्य कल्पना आहे, असे वैद्य यांनी सांगितले. अधिक स्पष्टिकरण देताना वैद्य म्हणाले की, ‘टेराफॉर्मिंग’ म्हणजे एखाद्या ग्रहाच्या वातावरणात ठराविक अतिसुक्ष्मजीव मुद्दाम नेऊन सोडून ते वातावरण मानवी वस्तीसाठी अनुकूल बनविण्याची प्रक्रिया सुरु करणे. त्यानुसार ‘बिजायन’ मिशनमध्ये ज्यांच्यामुळे मानवाला कोणत्याही रोगराईची लागण होत नाही अशाव अत्यंत प्रतिकूल वातावरणातही जिवंत राहून फोफावू शकणाऱ्याअशा अतिसुक्ष्म जिवाणूंना पृथ्वीवरून नेऊन शुक्राच्या वातावरणात मुद्दाम सोडले जाईल. अशा अतिसूक्ष्म जिवाणूंना वैज्ञानिक परिभाषेत ‘नॉन पॅथोजेनिक एक्स्ट्रिमोफिर मायक्रोआॅग्रॅनिझम्स’ असे म्हटले जाते.अशा प्रकारे पृथ्वीवरून नेऊन सोडलेले सुक्ष्मजिवाणू शुक्राच्या वातावरणात जिवंत राहून फोफावू शकण्याची शक्यता कितपतआहे, असे विचारता ६० ते ७०टक्के असे उत्तर देऊन वैद्य म्हणाले की, अशा प्रकारचे सुक्ष्मजिवाणू पृथ्वीवर आणि अंतराळातहीअत्यंत प्रतिकूल परिस्थितीत टिकाव धरू शकतात, हे सप्रमाण सिद्ध झाले आहे. सुक्ष्मजिवाणूंची जनुकीय ओळखआता शुक्राच्या वातावरणात सोडल्या जाणाऱ्या सुक्ष्मजिवाणूंचे नेमके काय झाले, याचा भविष्यात धांडोळा घेताना हे सुक्ष्मजिवाणू पृथ्वीवरून पाठविलेलेच आहेत हे नेमके ओळखता यावे यासाठी प्रत्यक्ष मिशनपूर्वी या सुक्ष्मजिवाणूंची नेमकी जनुकीय वर्गवारी करून त्यांची पक्की ओळख निश्चित केली जाईल.या मिशनसाठी ‘थर्मोफिल’ व ‘अ‍ॅसिडोफिल’ या वर्गात मोडणारे सुक्ष्मजिवाणू वापरले जाऊ शकतात. ‘थर्मोफिल’ जिवाणू १०० अंशाहून जास्त तापमानातही सुखेनैव राहू शकतात व ‘अ‍ॅसिडोफिल’ वर्गातील ‘फेरोप्लाझमा अ‍ॅसिडीफिलम’ सल्फ्युरिक आम्लातच राहणे पसंत करतात. ‘टार्डिग्रेड््स’ प्रवर्गातील सुक्ष्मजिवाणू उणे २०० अंश ते ३०० अंश सेल्सियस अशा अतिटोकाच्या तापमानात, उकळत्या द्रवात, समुद्राच्या तळाशी असते त्याच्या सहापट दबावाखाली आणि अंतराळासारख्या निर्वात पोकळीतही जिवंत राहू शकतात, असे वैज्ञानिक प्रयोगांवरून सिद्ध झाले आहे.४६० अंश सेल्सिअस तापमान, ९५% कार्बन डायआॅक्साइडप्रेमीजिवांचा लाडका शुक्र प्रत्यक्षात सजीवसृष्टीसाठी अत्यंत प्रतिकूल आहे. शुक्राच्या पृष्ठभागाचे तापमान सुमारे ४६० अंश सेल्सिअस आहे.त्याच्या वातावरणाची घनता पृथ्वीच्या वातावरणाहून शतपटीने अधिक आहे, वातावरणात ९५ टक्के कार्बन डायआॅक्साइड आहे व तेथे सल्फ्युरिक आम्लाचा पाऊस पडत असतो! शुक्रावर भूतकाळात  सजीव नांदून गेल्याची, सध्या असण्याची किंवा भविष्यात उत्क्रांत होण्याची शक्यता नाही, यावर वैज्ञानिकांचे एकमत आहे.सूक्ष्म जीवाणूंच्या माध्यमातून एखाद्या ग्रहाच्या वातावरणात बदल घडवून आणण्याची कल्पना वैज्ञानिकांमध्ये फार वर्षांपासून चर्चेत आहे. परंतु प्रत्यक्ष अंतराळ मिशन पाठवून ही कल्पना कोणीही प्रत्यक्षात उतरविली नव्हती. ‘बीजायन’ने नेमके तेच करण्याची आमची योजना आहे.

- पुष्कर गणेश वैद्य, वैज्ञानिक

पुष्कर गणेश वैद्य यांच्याशी ‘लोकमत’ने ई-मेलव्दारे केलेल्या संवादाचा गोषवारा असा-

प्रश्न-तुमच्या प्रस्तावित यानाला शुक्रापर्यंत पोहोचायला किती काळ लागेल?

वैद्य- साधारणपणे १५० दिवस. नक्की वेळ कोणती कक्षा निवडू त्यावर ठरेल.

 

प्रश्न- शुक्राच्या वातावरणात हे सुक्ष्मजिवाणू किती अंतरावरून फवारले जातील?

वैद्य- शुक्राच्या ‘हिल स्पियर’मध्ये पाच ते १० लाख किमी अंतरावरून.

 

प्रश्न- यासाठी लागणारे विशिष्ठ प्रकारचे सुक्ष्मजिवाणू कुठून आणणार? ते सहज उपलब्ध आहेत की प्रयोगशाळेत मुद्दाम

तयार करावे लागतील ?

वैद्य- हे जिवाणू मानवाला रोगराईची लागण न करणारे असल्याने ते प्रयोगशाळांमधून विकत घेण्यात काही अडचण नाही. शिवाय निसर्गातूनही ते सहजपणे उपलब्ध होऊ शकतात.

 

प्रश्न- अशा प्रकारचे खासगी अंतराळ मिशन व संशोधन करायला भारतात कायद्याची आडकाठी आहे की कसे?

वैद्य- ग्रहताऱ्यांच्या शोधासाठी प्रयोग करण्यास कायदेशीर प्र्रतिबंध नाही. आंतरराष्ट्रीय पातळीवरही कायदा नसला तरी पृथ्वीवरील सुक्ष्मजिवांनी अन्य ग्रह प्रदूषित न करण्यासंबंधीची मार्गदर्शिका

आहे. त्यातही शुक्र हा मंगळाच्या तुलनेत खालच्या आणि वेगळ््या वर्गात असल्याने

त्याच्या बाबतीत फारशी कडक बंधने नाहीत.

 

प्रश्न- शुक्राचे वातावरण अशा बीजारोपणाने मानवी वस्तीसाठी अनुकूल होईपर्यंत किती काळ लागेल? तोपर्यंत इकडे पृथ्वीचे

काय झालेले असेल? या संभाव्य ‘सेकंड होम’मध्ये जायला पृथ्वीवर मानवी वंश शिल्लक राहिलेला असेल का?

 

वैद्य- आपण पृथ्वीवासी राहिलो नाही तराही सजीवसृष्टी सजीवसृष्टी तग धरून राहावी, हाच तर या मिशनचा हेतू आहे. काही हजार किंवा दहाच्या पटीत काही हजार वर्षात शुक्राचे अनुकूलन व्हावे, अशी अपेक्षा आहे.तोपर्यंत आपण पृथ्वीवर नक्कीच असू.