शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

खर्चाअभावी योजना वादात

By admin | Updated: July 23, 2016 01:48 IST

पुरंदर हा दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो. या भागाचा कायापालट करण्यासाठी शासनाने जनतेचे कोट्यवधी रुपये खर्च करून पुरंदर उपसा जलसिंचन योजना तयार केली

सासवड : पुरंदर हा दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो. या भागाचा कायापालट करण्यासाठी शासनाने जनतेचे कोट्यवधी रुपये खर्च करून पुरंदर उपसा जलसिंचन योजना तयार केली असून, गेल्या काही वर्षांपासून योजना कार्यान्वित आहे. मात्र थकीत वीजबिल, दुरुस्ती-देखभालीच्या खर्चाअभावी ही योजना कायम वादात असून बदनाम होत आहे. शासन पुरंदरसाठी गुंजवणी तसेच रायता हे नवीन प्रकल्प राबविण्याची तयारी करीत आहे, परंतु पुरंदर उपसाही पूर्ण झालेली आणि सुरू असलेली योजना पूर्ण क्षमतेने चालविण्यास असमर्थता का दाखवते, असा सवाल पुरंदरच्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना पडला आहे. गुंजवणी आणि रायता हे प्रकल्प झाले तरी याचा शेतकऱ्यांना लाभ होणार आहे का, याचे उत्तर देणे गरजेचे आहे. पुरंदर उपसा जलसिंचन योजना पुरंदर तालुक्याचा बहुतांशी जिरायती भाग व दौंड आणि बारामती तालुक्याच्या काही भागांसाठी करण्यात आली होती. यापूर्वी ही योजना थकीत वीजबिल आणि दुरुस्ती-देखभाल खर्चाअभावी अनेक वेळा बंदच होती. वास्तविक ही योजना शेतकऱ्यांनी ताब्यात घेऊन गावोगावी पाणी वापर सोसायट्या तयार करून चालवाव्यात, असा शासनाचा उद्देश असताना शेतकरीही मात्र सोसायट्या तयार करण्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. तीन वर्षांपूर्वी अशीच दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असताना योजना थकीत वीजबिल आणि दुरुस्ती-देखभाल खर्चाअभावी बंद होती. त्या वेळी जानेवारी २०१२ मध्ये शेतकऱ्यांच्या वतीने पुढाकार घेऊन युवानेते संजय जगताप यांनी वाघापूर चौफुला येथे आंदोलन करून थकीत वीज बिल आणि दुरुस्ती खर्चासाठी साठ लाख रुपये भरले होते. गावोगावी शेतकऱ्यांच्या बैठका घेऊन पाणी वापर सोसायट्या उभ्या करण्यासाठी जनजागृती केली होती, परंतु शेतकऱ्यांनी अजूनही या सोसायट्या उभ्या करण्याकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे आजही योजनेचे नियोजन होत नाही. त्याचा फटका शेतकऱ्यांनाच बसत आहे. >अधिकाऱ्यांचे कायमच दुर्लक्ष...पुरंदर उपसा जलसिंचन योजनेचा प्रतिदशलक्ष घनफूट (एमसीएफटी) पाण्याचा दर तब्बल ५१ हजार रुपये आहे. शेतकरी पाणी घेण्यापूर्वीच पाण्याची रक्कम रोख स्वरूपात देतात, तरीही योजना अनेक वेळा थकीत वीजबिल तसेच दुरुस्ती-देखभाल खर्चाअभावी बंद असते. अनेक वेळा एकच पंप सुरू असतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी पैसे भरूनही वीजबिल थकीत कसे राहते आणि नादुरुस्त पंप का दुरुस्त होत नाहीत, असा प्रश्न शेतकरीवर्गाला नेहमीच पडतो.