शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs AUS: रोहितच्या सेंच्युरीसह किंग कोहलीची फिफ्टी; ऑस्ट्रेलिया विरुद्ध अखेरच्या वनडेत अविस्मरणीय शो!
2
पश्चिम सीमेवर भारताचे तिन्ही सैन्य दल पाकिस्तानची झोप उडवणार; NOTAM जारी, १२ दिवस काय घडणार?
3
SBI ठरली 'वर्ल्ड्स बेस्ट कन्झुमर बँक'; दोन मोठ्या पुरस्कांनी सन्मान, पाहा कोणी दिला?
4
Rohit Sharma Century: रोहितचा मोठा धमाका! सिडनीच्या मैदानात साजरं केलं शतकांचं 'अर्धशतक'
5
VIDEO: तरूणी बनली 'स्पायडर वूमन'! कशाचाही आधार न घेता झपाझप भिंतींवर चढली अन्...
6
ठाणे: पाच पिढ्यांची साक्षीदार ‘विठाबाई’! महाराष्ट्रातील ज्येष्ठ आजीबाईचे ११४व्या वर्षी निधन
7
मोठी बातमी! मोदींच्या हत्येचा कट रशियाने उधळला? अमेरिकेचा एजंट ढाक्यामध्ये मारला गेला, चर्चांना उधाण...
8
'या' देशाचा झेंडा आहे जगातील सगळ्यात जुना ध्वज! गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्येही नोंदवलं गेलंय नाव
9
छत्तीसगडमध्ये पुन्हा नक्षल हिंसाचार; बीजापूरमध्ये दोन ग्रामस्थांची निर्घृण हत्या, परिसरात दहशत
10
IND vs AUS : हिटमॅन रोहितचा आणखी एक हिट शो! सचिन तेंडुलकरनंतर असा पराक्रम करणारा ठरला दुसरा भारतीय
11
Virat Kohli: ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर कोहलीचा मोठा पराक्रम, इयान बॉथमचा महारेकॉर्ड मोडला!
12
Viral Video : आई रॉक्ड अन् लेकी शॉक्ड! सकाळी उशीरापर्यंत झोपून राहणाऱ्या मुलींना उठवण्यासाठी आईनं काय केलं बघाच!
13
धक्कादायक!! २ ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटरशी भारतात भरदिवसा घाणेरडे कृत्य, एकीच्या तर थेट...
14
पुढील वर्षी असं काही होईल, जे यापूर्वी कधीच झालं नाही, बाबा वेंगाची सोन्याबाबत मोठी भविष्यवाणी
15
महिला डॉक्टरने प्रशांत बनकरला प्रपोज केलेला, त्याने...; बहिणीचा धक्कादायक गौप्यस्फोट
16
Virat Kohli Celebration : चेहऱ्यावर हसू अन् खातं उघडल्याचा 'विराट' आनंद! व्हिडिओ बघाच
17
Crime: एकेकाळी 'राज्यस्तरीय पैलवान', लग्नानंतर ड्रग्जचं व्यसन जडलं, पैशांसाठी मुलाला विकले!
18
अफगाणिस्तानातून कोणकोणत्या नद्या पाकिस्तानच्या दिशेने वाहतात? तालिबानने प्रवाहच रोखला तर काय होईल?
19
भारतीय नर्सला सिंगापूरमध्ये १४ महिन्यांचा कारावास अन् २ चाबकाचे फटके; असं नेमकं काय घडलं?
20
IND vs AUS 3rd ODI : 'या' पठ्ठ्यानं कोच गंभीरचा विश्वास ठरवला सार्थ! ऑस्ट्रेलियनं संघ २३६ धावांवर ऑलआउट

Maharashtra Politics: कर्जत- जामखेडसह अहिल्यानगर जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2025 17:43 IST

Rajendra Phalke: शरद पवार गटातील माजी जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके महाराष्ट्र विधानपरिषद सभापती राम शिंदे यांची आज भेट झाली.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) गटाचे अहिल्यानगर जिल्ह्याचे माजी जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांच्या कर्जत येथील निवासस्थानी आज महाराष्ट्र विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे यांनी अनपेक्षितपणे सदिच्छा भेट दिली. राजेंद्र फाळके यांनी नुकताच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार) गटाच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला आहे. त्यांच्या या निर्णयानंतर लगेचच प्रा. राम शिंदे यांनी दिलेल्या या सदिच्छा भेटीला विशेष राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे.

या भेटीदरम्यान प्रा. शिंदे आणि फाळके यांच्यात काही काळ चर्चा झाली. भेट सौहार्दपूर्ण वातावरणात पार पडली असून, राजकारणातील विविध विषयांवरही दोघांमध्ये अनौपचारिक संवाद झाला असल्याचे सूत्रांनी सांगितले. विशेष म्हणजे, या भेटीच्या वेळी कोरेगावचे माजी सरपंच  शिवाजी आप्पा फाळके, तसेच फाळके परिवारातील इतर सदस्यही उपस्थित होते. प्रा. राम शिंदे यांनी फाळके परिवाराशी सविस्तर संवाद साधत त्यांच्या कार्याची प्रशंसा केली.

या सदिच्छा भेटीमुळे केवळ कर्जत-जामखेडच नव्हे, तर संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ माजली आहे. राजकीय जाणकार आणि कार्यकर्त्यांमध्ये विविध तर्क-वितर्क सुरू झाले असून, या भेटीचा पुढील राजकीय समीकरणांवर काय परिणाम होईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कर्जत-जामखेड परिसरात ही भेट चर्चेचा प्रमुख विषय ठरली असून, दोन्ही नेत्यांमधील संवाद भविष्यातील राजकीय घडामोडींना दिशा देणारा ठरू शकतो, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : A Nagar Politics Stir: Ram Shinde's Visit Sparks Speculation

Web Summary : Ram Shinde's visit to Rajendra Phalke, who recently resigned from NCP, has triggered political buzz in Nagar district. Discussions occurred, raising speculation about future political alignments in Karjat-Jamkhed.
टॅग्स :PoliticsराजकारणAhilyanagarअहिल्यानगरSharad Pawarशरद पवार