शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मनमोकळेपणाने बोलले, तरी राष्ट्रद्रोहाचे आरोप : कोत्तापल्ले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2016 01:42 IST

देशात मनमोकळेपणाने बोलाल, तर राष्ट्रदोहाचे आरोप लावले जात आहेत. त्यामुळे समाजाला नवे भान येण्यासाठी युक्रांदची आवश्यकता असल्याचे सांगून ज्येष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी

पुणे : देशात मनमोकळेपणाने बोलाल, तर राष्ट्रदोहाचे आरोप लावले जात आहेत. त्यामुळे समाजाला नवे भान येण्यासाठी युक्रांदची आवश्यकता असल्याचे सांगून ज्येष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी बदलत्या काळाच्या ओघात युक्रांदच नव्हे, तर अनेक सामाजिक चळवळी निस्तेज झाल्या आहेत. या सर्वाचा शोध घेण्याची आवश्यकता आहे. आता केवळ समाजवादी नेते राहिले असून त्यांचे अनुयायी आहेत तरी कुठे, असा सवालही उपस्थित केला. प्रा. विजय दर्प यांनी लिहिलेल्या ‘युक्रांदचे दिवस’ पुस्तकाचे प्रकाशन डॉ. कोत्तापल्ले यांच्या हस्ते करण्यात आले, त्या वेळी ते बोलत होते. युक्रांदचे संस्थापक डॉ. कुमार सप्तर्षी, कॉँग्रेसचे प्रवक्ते डॉ. रत्नाकर महाजन, डॉ. अंजली सोमण, पद्मगंधा प्रकाशनाचे अरुण जाखडे उपस्थित होते.डॉ. कोत्तापल्ले म्हणाले, ‘‘युक्रांदने राज्यात जाती-धर्माच्या पलीकडे जाऊन सामाजिक परिवनार्चे काम केले आहे. युक्रांदने युवक-युवतींमध्ये मोठ्या प्रमाणात सामाजिक परिवर्तन केले आहे. आंदोलने उभारून नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळवून दिला आहे. मात्र, कालांतराने युक्रांदच नव्हे, तर अनेक चळवळी नाहीशा झाल्या. त्यामुळे सध्या या चळवळींचा शोध घेतला पाहिजे. देशातील सध्याच्या परिस्थितीचा विचार केल्यास देशात मनमोकळेपणाने बोलाल, तर राष्ट्रद्रोहाचे आरोप लावले जात आहेत. त्यामुळे समाजाला नवे भान येण्यासाठी युक्रांदसारख्या चळवळीची आवश्यकता आहे. त्यातून येणाऱ्या पिढीला नैतिकतेच्या पायावर उभे राहण्यासाठी मदत होईल. तसेच त्यातून नव्या सामाजिक चळवळी उभ्या राहण्यासाठी उपयोग होईल.’’डॉ. सोमण यांनी पुस्तकाबद्दल माहिती सांगितली. प्रा. दर्प यांनी प्रास्ताविक केले. (प्रतिनिधी)> सध्या देशात मोठ्या प्रमाणात जातीयता आहे. त्याला कारणीभूत माणसाच्या विचारातील तीव्र स्मृतिघटक आहेत. हिंदुत्ववादी आणि हिंदू धर्म यांत संबंध नाही. या दोन्ही गोष्टींना एकत्रित करणे हा काही लोकांसाठी सत्ता मिळविण्याचा मार्ग झाला आहे. सत्ताधारी राजकीय पक्षांच्या नेत्यांना हिंदू धर्म माहीत नसून, ते आणि त्यांच्याशी संबंधित राजकीय संस्था केवळ सत्ता हाती असल्याने सामाजात धिंगाणा घालत असतात.- डॉ. कुमार सप्तर्षी