शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
3
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
4
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
5
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
6
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
7
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
8
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
9
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
10
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
11
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
12
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
13
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
14
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
15
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
16
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
17
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
18
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
19
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
20
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
Daily Top 2Weekly Top 5

‘स्वराज्य’ सिंहगर्जनेचे शतक!

By admin | Updated: May 31, 2016 06:39 IST

‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच,’ अशी सिंहगर्जना करून टिळकांनी जुलमी ब्रिटिश राजवटीने पिचलेल्या भारतीयांच्या मनात स्वातंत्र्याचे स्फूलिंग चेतविले त्याची शतकपूर्ती होत आहे.

योगेश गुंड,  अहमदनगर ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच,’ अशी सिंहगर्जना करून लोकमान्य टिळकांनी जुलमी ब्रिटिश राजवटीने पिचलेल्या भारतीयांच्या मनात स्वातंत्र्याचे स्फूलिंग चेतविले त्या घटनेची मंगळवारी शतकपूर्ती होत आहे.३१ मे १९१६ रोजी भारताच्या स्वातंत्र्य लढ्याला बळ देण्यासाठी अहमदनगरमध्ये घेतलेल्या सभेत लोकमान्यांनी ही सिंहगर्जना केली होती. लोकमान्य टिळकांनी ‘स्वराज्य’ऐवजी ‘होमरूल’ (स्वशासन) हा शब्दप्रयोग करण्याचे ठरवले होते. या चळवळीचा प्रचार व जनजागृतीसाठी टिळकांनी ३१ मे १९१६ रोजी येथील कापड बाजारातील ‘इमारत कंपनी’च्या वसाहतीच्या मैदानावर ही ऐतिहासिक सभा घेतली. नगरमधील सभेचा उत्साह पाहून टिळकांनी या सभेत स्वराज्याची हाक दिली. तेव्हा टिळक युग ऐन भरात असल्याने त्यांच्याविषयी नगरकरांना मोठे आकर्षण होते. त्यामुळे सभेला नगरकरांनी प्रचंड गर्दी केली होती. त्यानंतर हीच घोषणा टिळकांची सिंहगर्जना बनली. १०० वर्षांपूर्वी मैदानात झालेल्या या सभेच्या ठिकाणी मोठ्या इमारती उभ्या राहिल्या आहेत. मात्र वसाहतीच्या प्रशासनाने टिळकांच्या सभेची स्मृती जतन राहावी म्हणून येथील कापड दुकानाच्या मागील बाजूस लोकमान्यांचा अर्धाकृती पुतळा उभारला आहे. त्यामुळे टिळकांच्या आठवणी आजही नगरकरांच्या मनात घर करून आहेत.