शहरं
Join us  
Trending Stories
1
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
5
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
6
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
7
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
8
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
9
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
10
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
11
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
12
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
13
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
14
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
15
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
16
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
17
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
18
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
19
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
20
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
Daily Top 2Weekly Top 5

‘साऊथ नवी मुंबई’ ठरणार देशातील पहिली स्मार्ट सिटी - मुख्यमंत्र्यांची घोषणा

By admin | Updated: December 5, 2015 09:09 IST

देशातील पहिली स्मार्ट सिटी होण्याचा बहुमान सिडको उभारत असलेल्या साऊथ नवी मुंबईला मिळणार आहे. या परिसरात ५३ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होत असून तब्बल ९ लाख

नवी मुंबई : देशातील पहिली स्मार्ट सिटी होण्याचा बहुमान सिडको उभारत असलेल्या साऊथ नवी मुंबईला मिळणार आहे. या परिसरात ५३ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होत असून तब्बल ९ लाख रोजगारनिर्मिती होणार आहे. सामान्य नागरिकांसाठी ५५ हजार घरे बांधली जाणार असून स्मार्ट सिटी कशी असते याचे आदर्श मॉडेल या परिसरात उभे राहील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. देशातील पहिली स्मार्ट सिटी- साऊथ नवी मुंबईच्या उभारणीस शुक्रवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रारंभ झाला. पंतप्रधानांच्या संकल्पनेतील पहिली स्मार्ट सिटी महाराष्ट्रात उभी राहात आहे, ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट असल्याचे ते म्हणाले. सिडकोने शासनाचा कोणताही निधी न घेता या परिसराचा विकास करण्याचा निर्णय घेतला आहे. जमिनीची सर्व माहिती संकेतस्थळावर देऊन व माहिती अधिकारासाठीही आॅनलाइन सुविधा देऊन या संस्थेने खऱ्या अर्थाने सेवा हमी योजनेची अंमलबजावणी केली आहे. याच धर्तीवर राज्यातील सर्व २८५ सुविधा आॅनलाइन करण्याचा सरकारचा मानस आहे. अतिक्रमण रोखण्यासाठी सॅटेलाइट मॅपचा वापर, मेट्रो, मोनो, विमानतळ, शहरात सर्वत्र सीसीटीव्हीचे जाळे उभारण्यात येत आहे. स्मार्ट शहर कसे असावे याचे आदर्श मॉडेल म्हणून साऊथ नवी मुंबई ओळखली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. स्मार्ट सिटी उभारताना प्रकल्पग्रस्तांचा विसर पडू दिला जाणार नाही. सिडकोने अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतले आहेत. त्यांनी आता राज्यातील इतर शहरे स्मार्ट होण्यासाठी कमी व्याजदराने अर्थपुरवठा सुरू करावा, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले. सामान्य नागरिकांसाठी ५५ हजार घरे बांधली जाणार आहेत. सर्वाधिक खर्च परवडणारी घरे बांधण्यासाठी होत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. स्मार्ट सिटीची उभारणी करताना या परिसरात ९ लाख रोजगारनिर्मिती होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. ठाणे जिल्ह्णाचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनीही स्मार्ट सिटी उभारताना प्रकल्पग्रस्तांना वाऱ्यावर सोडणार नसल्याचे सांगितले. सिडकोेचे व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया यांनी स्मार्ट सिटीमध्ये प्रकल्पांविषयी माहिती दिली. यावेळी आमदार मंदा म्हात्रे, संदीप नाईक, प्रशांत ठाकूर, महापौर सुधाकर सोनावणे, व्ही. राधा, अश्विनी जोशी व इतर मान्यवर उपस्थित होते.शहराबरोबर गावांचाही विकास हवागावांच्या विकासावरही लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. कृषी क्षेत्रात आधुनिक तंत्राचा वापर करून उत्पादकता वाढविण्यावर भर दिला जाईल. नागपूर-मुंबई सुपर एक्स्प्रेसचे काम हाती घेण्यात येणार आहे. ८ तासांत या दोन शहरांमध्ये पोहचता येईल. याचा लाभ शेती आणि उद्योगांना होईल.इको सेन्सेटिव्ह झोनवर सॅटेलाइटची नजरराज्यातील सर्व इको सेन्सेटिव्ह झोनवर सॅटेलाइटद्वारे नजर ठेवली जाणार आहे. प्रत्येक महिन्याला सॅटेलाइटद्वारे मिळालेल्या नकाशामध्ये कुठे अतिक्रमण झाले, तिवरांची कत्तल झाली तर तत्काळ कारवाई करण्यात येणार आहे. स्मार्ट सिटीची वैशिष्ट्ये प्रकल्पखर्चजेएनपीटी विस्तारीकरण८००० कोटीपरवडणारी ५५ हजार घरे१०७०० कोटीनैना प्रोजेक्ट४००० कोटीराष्ट्रीय महामार्गाचे विस्तारीकरण३०००रेल्वे व मेट्रो प्रोजेक्ट१३०६० कोटीपायाभूत सुविधा७४८४.२६कोटी४१८ कोटी पर्यावरण रक्षणासाठी विशेष प्रकल्प६३५ कोटी पाणी योजनांसाठी७४८४. २६ कोटी