शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
2
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
3
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
4
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
5
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
6
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
7
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
8
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
9
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
10
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
11
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
12
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
13
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
14
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...
15
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
16
Vivo Y400 5G: एमोलेड डिस्प्ले, ६००० mAh बॅटरी आणि बरेच काही; विवो व्हाय ४०० भारतात लॉन्च!
17
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
18
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
19
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
20
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?

दक्षिण कोरियन के -पॉपची युवकांमध्ये झिंग

By admin | Updated: June 28, 2016 22:20 IST

दक्षिण कोरियाचा के-पॉप हा प्रकार जगभर प्रसिद्ध होत आहे. दक्षिण कोरियाची प्राचीन संगीतकला सर्वदूर पसरावी आणि अन्य देशांतील टॅलेण्ट नव्या कला यांचा मेळ व्हावा

- पूजा दामले 

मुंबई :  दक्षिण कोरियाचा के-पॉप हा प्रकार जगभर प्रसिद्ध होत आहे. दक्षिण कोरियाची प्राचीन संगीतकला सर्वदूर पसरावी आणि अन्य देशांतील टॅलेण्ट नव्या कला यांचा मेळ व्हावा, या उद्देशाने के-पॉप स्पर्धेचे आयोजन केले जाते. भारतात दिल्ली, सिक्कीम, मुंबई, कोलकाता, बंगळुरु आणि चेन्नई या ठिकाणी या स्पर्धेच्या प्राथमिक फेऱ्या होणार आहेत. २ जुलै रोजी मुंबईत या स्पर्धेची प्राथमिक फेरी जयहिंद महाविद्यालयात पार पडणार आहे. या स्पर्धेत संगीत आणि नृत्य या दोन कलांची स्पर्धा रंगते. या स्पर्धेचा फिवर आत्तापासून युवकांमध्ये चढण्यास सुरुवात झाली आहे. अनेक शतकांपासून दक्षिण कोरियात संगीत-नृत्याची कला जोपासली जात आहे. आनंद व्यक्त करण्यासाठी संगीताचा आधार घेतला जातो. कोरियातील हिपहॉप संगीताचा जगभर नावलौकीक आहे. कोरियातील शाळांमध्ये रोजच्या अभ्यासातही संगीत कलेचा समावेश असतो. हे संगीत फक्त तरुणाईलाच नाही तर, तिशी, चाळीशीच्या व्यक्तींच्याही पसंतीला उतरते. इंडोनेशिया, थायलंड, इजिप्त येथे झालेल्या स्पर्धेतूनही हे दिसून आले आहे. या स्पर्धेला येणारे प्रेक्षक बहुतांशी तिशी-चाळिशीतले असतात. यांच्याकडून स्पर्धकांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो. भारतातही हिपहॉपची क्रेझ सध्या निर्माण होत आहे. गंगम स्टाईल सध्या आपल्याकडे कमालीची लोकप्रिय ठरत आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने पुन्हा एकदा भारत आणि दक्षिण कोरियाचे संबंध सुदृढ होणार असल्याचे दक्षिण कोरियाचे कौन्सिल जनरल साँग युन कीम यांनी लोकमतला सांगितले. २ हजार वर्षांपूर्वी भारतातील राजकन्या कोरियात आली होती. तर त्यानंतर काही वर्षांनी कोरियातील प्रिस्ट तिबेट मार्गे भारतात आले. या मार्गे त्यांनी बुद्धिझम भारतातून कोरियात नेला. दक्षिण कोरियात ऋतुमानानुसार फिरण्यासाठी वेगवेगळी ठिकाणे आहेत. कोरियात आयलंड आणि पहाड देखील समृद्ध आहेत. भारतातून आलेल्या राजकन्येने कोरियात जेथे वास्तव्य केले, ते ठिकाण देखील कोरियातील महत्त्वाचे प्रेक्षणीय स्थळ आहे. दक्षिण कोरिया-मुंबई विद्यापीठात करार भारतातून दक्षिण कोरियात जास्त विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येत नाहीत. पण, दक्षिण कोरियातील १० विद्यार्थी मुंबई विद्यापीठात, २५ विद्यार्थी पुणे विद्यापीठात आणि सिम्बॉयसिसमध्ये १० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. पण, पुढच्या काळात विद्यार्थ्यांसाठी सामंजस्य करार करण्यात येणार आहे. कोरियाच्या योन्से विद्यापीठाने मुंबई विद्यापीठाशी एक करार केला आहे. नजिकच्या काळात मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख कोरियात जावून एका सामंजस्य करारावर सही करणार आहेत. त्यानंतर दोन्ही देशांत स्टुडण्ट एक्सेंज प्रोग्रामह्ण सुरु होणार असल्याचे कौन्सिल जनरल साँग युन कीम यांनी लोकमतला सांगितले.