ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १८ - राज्यात सत्ताधारी कोण आणि विरोधक कोण हे समजत नाही असे सांगतानाच विधान सभेत होणारे आवाजी मतदान हे चुकीचे असल्याचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटले आहे. काल दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर उध्दव ठाकरे यांच्याशी झालेली भेट ही राजकीय नव्हती असे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने आवाजी मतदानाने विश्वास ठराव जिंकला. परंतू तो ठराव कसा जिंकला हे कोणालाच कळला नाही. खरे म्हणजे आवाजी मतदान हेच चुकीचे असल्याचे राज ठाकरे म्हणाले. राज ठाकरे यांच्या कन्या उर्वशी ठाकरे यांच्या नावाच्या वादग्रस्त ट्विटरवरील अंकाऊटबद्दल राज ठाकरे म्हणाले की, माझे व माझ्या मुलीचे कोणतेही ट्टिटरवर अंकाऊट नाही. येत्या काही दिवसात पक्षाच्या संघटनेत मोठे फेरबदल करणार असल्याचे राज ठाकरे यावेळी म्हणाले. भाजपाबरोरबर सत्तेत सहभागी व्हायचे की नाही हा शिवसेनेचा प्रश्न असल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले.