शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना लवकरच सरसकट कर्जमाफी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2019 06:21 IST

राज्य सरकारची तयारी सुरू; जिल्हाधिकाऱ्यांकडून मागविली कर्जाची आकडेवारी

- यदु जोशी।लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : शेतकरी सन्मान योजनेपासून वंचित शेतकºयांना कर्जमाफी देण्याच्या हालचाली सुरू असून, लवकरच तसा निर्णय होणार आहे. थकबाकीदार शेतकरी व थकबाकीची माहिती जिल्ह्याजिल्ह्यातून मागविण्यात आली आहे.

आतापर्यंत दिलेल्या कर्जमाफीत मार्च, २०१६ पर्यंत काढलेले कृषिकर्ज व थकबाकीदार शेतकºयांचा समावेश करण्यात आहे. आता २०१६-१७ आणि २०१८ पर्यंतच्या थकबाकीदार शेतकºयांनाही कर्जमाफीचा लाभ दिला जाणार असल्याचे कळते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यासाठी पुढाकार घेतला आहे. अन्य कारणांनी कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्यांनाही कर्जमाफी दिली जाणार आहे.शेतकºयांना सरसकट कर्जमाफी दिली पाहिजे, असा आग्रह शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी धरला होता. आपली ही अट मान्य केल्यानेच आपण युतीसाठी तयार झालो, असे ठाकरे यांनी म्हटले होते. राज्य सरकारने आतापर्यंत राज्यातील ४३ लाख ३५ हजार शेतकºयांना १८ हजार २३५ कोटी रुपयांची कर्जमाफी दिली आहे.

मुख्यमंत्री काढणार विकास यात्रामुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे चार महिन्यांनंतर होणाºया विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यात विकास यात्रा काढणार आहेत. केंद्र आणि राज्य सरकारने गेल्या पाच वर्षांत केलेल्या विकासाचा लेखाजोखा आणि पुढील पाच वर्षांतील विकासाची ब्ल्यू प्रिंट घेऊन ते जनतेत जातील, असे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. राज्यात समाधानकारक पाऊस झाला, तर जुलैच्या पहिल्या आठवड्यात ही यात्रा सुरू होईल. शेकडो गावांमधील नागरिकांशी ते संवाद साधणार आहेत. प्रदेश भाजपच्या वतीने ही यात्रा काढली जाईल.लोकसभा निवडणुकीचे अहवाल मागविलेलोकसभा निवडणुकीचे चिंतन मंथन करण्यासाठी प्रदेश भाजपची बैठक मंगळवारी मुंबईत होत आहे. या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष खा.रावसाहेब दानवे, प्रदेश कार्यकारिणीचे पदाधिकारी, आमदार, खासदार, जिल्हाध्यक्ष आणि संघटनमंत्री उपस्थित राहतील. या बैठकीपूर्वीच राज्यातील सर्व जिल्हाध्यक्षांकडून लोकसभा निवडणुकीचे अहवाल मागविण्यात आले आहेत. शिवसेनेने लढविलेल्या जागांवर असलेल्या भाजपच्या जिल्हाध्यक्षांकडूनही हे आॅनलाइन अहवाल चार दिवसांपूर्वीच घेण्यात आले.

टॅग्स :Farmerशेतकरी