शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

गृहविभागात लवकरच मोठे फेरबदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2018 06:30 IST

राज्याच्या गृहविभागात मोठे फेरबदल करण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मानस असून त्याअंतर्गत सध्याचे अतिरिक्त मुख्य सचिव सुधीरकुमार श्रीवास्तव यांची बदली होण्याची दाट शक्यता आहे.

यदु जोशी  मुंबई : राज्याच्या गृहविभागात मोठे फेरबदल करण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मानस असून त्याअंतर्गत सध्याचे अतिरिक्त मुख्य सचिव सुधीरकुमार श्रीवास्तव यांची बदली होण्याची दाट शक्यता आहे.राज्यात एकीकडे अनेक आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या कुठल्याही क्षणी होण्याची शक्यता असताना श्रीवास्तव यांना गृह विभागातून हलविले जाऊ शकते, अशी माहिती अत्यंत विश्वसनीय सूत्रांनी दिली.श्रीवास्तव हे मध्यंतरी मुख्य सचिव पदाच्या शर्यतीत होते. डी. के. जैन, मेधा गाडगीळ यांच्यासोबत त्यांचेही नाव या पदासाठी चर्चेत होते. तथापि डी. के. जैन यांच्या नावाला मुख्यमंत्री फडणवीस यांनी पसंती दिली.त्यामुळे नाराज झालेले गाडगीळ व श्रीवास्तव रजेवर गेले होते. विश्वसनीय सूत्रांनी सांगितले की, श्रीवास्तव यांना पर्यावरण विभागात अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून पाठवले जाईल व सोबतच प्रदुषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्षपद दिले जाईल. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार या मंडळाचे अध्यक्षपद हे विज्ञानविषयक शैक्षणिक पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीलाच मंडळाचे देता येते. श्रीवास्तव यांनी केमिकल इंजिनिअरींग केले आहे. राज्याची कायदा व सुव्यवस्था स्थिती उत्तम करण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री आता श्रीवास्तव यांच्या जागी कुणाची नियुक्ती करतात, याबाबत उत्सुकता आहे. मुंबई महापालिकेचे आयुक्त अजोय मेहता यांचे नाव चर्चेत आहे.आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने गृहविभागाची घडी नीट बसविण्यावर मुख्यमंत्र्यांचा भर असेल.श्रीवास्तव हे अतिशय प्रामाणिक अधिकारी आहेत. वित्त विभागाची सूत्रे त्यांनी दीर्घकाळ यशस्वीरित्या सांभाळली आहेत. असे असले तरीही गृह विभागाचा बाज वेगळा असतो, म्हणून अन्य नावांचा विचार मुख्यमंत्री करीत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस