शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
3
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
4
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
5
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
6
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
7
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
8
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
9
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
10
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
11
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
12
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
13
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
14
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
15
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
16
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
17
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
18
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
19
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
20
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!

गीतकार वामन रामराव कांत स्मृतिदिन

By admin | Updated: September 8, 2016 11:02 IST

बगळ्यांची माळ फुले अजुनि अंबरात' असे सर्वांच्या ओठी असलेले गीत लिहिणारे ’वा. रा.’ कांत तथा वामन रामराव कांत यांचा आज स्मृतिदीन.

- प्रफुल्ल गायकवाड
मुंबई, दि. ८ - 'बगळ्यांची माळ फुले अजुनि अंबरात' असे सर्वांच्या ओठी असलेले  गीत लिहिणारे  ’वा. रा.’ कांत तथा वामन रामराव कांत यांचा आज स्मृतिदीन.
 
जीवन
वामन रामराव कांत यांचा जन्म नांदेड येथे ६ ऑक्टोबर १९१३ रोजी झाला. वा.रा. कांत हे या नावाने लेखन करत. त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण नांदेड येथे झाले. इंटरपर्यंतचे शिक्षण १९३१ साली हैदराबाद येथे झाले. त्यानंतर शिक्षण अर्धवट सोडावे लागले. त्यांचा विवाह सौ. लक्ष्मीबाई - पूर्वाश्रमीच्या गंगूबाई कुर्डूकर यांच्याशी १९३० मध्ये झाला.
 
कारकीर्द
'विहंगमाला' या नियतकालिकाचे संपादक (१९२८) तसेच विहंग प्रेसचे व्यवस्थापन.
निजाम सरकारच्या शेतकी खात्यात लिपिक म्हणून नोकरी (१९३३-१९४५)
निजाम सरकारच्याच आकाशवाणी हैदराबाद व औरंगाबाद केंद्रांत मराठी विभागप्रमुख म्हणून काम पाहिले (१९४५- १९६०)
भारतीय आकाशवाणीच्या विविध केंद्रांवर मराठी विभागप्रमुख म्हणून काम पाहिले (१९६०-१९७०)
आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सेवानिवृत्त (१९७०)
 
काव्यसंग्रह(एकूण १० )
'दोनुली'
’पहाटतारा’
’बगळ्यांची माळ’
'मरणगंध' (नाट्यकाव्य)'
मावळते शब्द'
'रुद्रवीणा'
'वाजली विजेची टाळी'
'वेलांटी'’शततारका’ (१९५०)
’सहज लिहिता लिहिता’
 
चरित्र
वा.रा. कांत यांचे एक छोटेखानी चरित्र -*कविवर्य वा.रा.कांत* - कृ.मु. उजळंबकर यांनी लिहिले आहे. कालिंदी प्रकाशनाने ते प्रसिद्ध केले आहे.
 
 
पुरस्कार
१९६२-६३ वेलांटी या काव्यसंग्रहास महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार
१९७७-७८ मरणगंध या नाट्यकाव्यास महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार
१९७९-८० दोनुली या काव्यसंग्रहास महाराष्ट्र शासनाचा 'केशवसुत ' पुरस्कार
१९८९-९० मावळते शब्द या काव्यसंग्रहास महाराष्ट्र शासनाचा 'केशवसुत' पुरस्कार
 
सन्मान
१९८८ महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे यांच्यातर्फे उत्कृष्ट वाङ्मयसेवेसाठी सन्मान
१९८९ महाराष्ट्र साहित्य परिषद, हैदराबाद यांच्यातर्फे उत्कृष्ट वाङ्मयसेवेसाठी सन्मान
१९८९ महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळातर्फे प्रदीर्घ वाङ्मयसेवेसाठी गौरववृत्ती देऊन सन्मान
 
८ सप्टेंबर १९९१ साली त्यांचे निधन झाले. 
 
सौजन्य :  मराठी विकिपीडिया