शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

ऐषोरामासाठी विरोध करणा-या आईची मुलानेच केली हत्या

By admin | Updated: June 1, 2016 16:19 IST

ऐषोरामासाठी पैस खर्च करू न देणा-या आईची पोटच्या मुलानेच हत्या केल्याची घटना लातूरच्या उद्गीरमध्ये घडली.

ऑनलाइन लोकमत
लातूर, दि. ०१ - ऐषोरामासाठी पैस खर्च करू न देणा-या, पैसे उधळता तो वाचवण्यास सांगणा-या आईची पोटच्या मुलानेच मित्रांच्या मदतीने हत्या केल्याची धक्कादायक घटना उद्गीर येथे घडली. गेल्या आठवड्या गुरूवारी भर दुपारी चोरट्यांनी प्रणिता प्रशांत पेन्सलवार (वय ४४) या महिलेची गला चिरून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती. मात्र पोलिसांनी याप्रकरणाचा अधिक तपास केला असता ही हत्या चोरट्यांनी नव्हे तर पेन्सलवार यांच्या मुलानेच केल्याचे समोर आले आहे. 

( भरदुपारी चोरट्यांनी केला महिलेचा गळा चिरून खून)

उदगिरात प्रशांत पेन्सलवार हे प्रसिध्द किराणा व्यापारी असून त्यांचे मुख्य मार्केटमध्ये दुकान आहे. ब-यापैकी श्रीमंत असलेल्या पेन्सिलवार यांचा मुलगा सोहम हा लाडाच वाढलेला. नुकताच ९वीतून १०वीत गेलेल्या सोहमला छानछोकीची, ऐषोरामाची खूप आवड. त्यासाठी तो सतत पैसे मागत असे. मात्र हीच गोष्ट त्याची आई, प्रणिता यांना आवडत नसे. तत पैसे खर्च करू नकोस, उधळू नकोस असे त्या सोहमला नेहमी बजावत असत. मात्र सोहमला त्यांचे ओरडणे, सतत टोकणे आवडत नसे. याच रागातून व पैशाच्या लोभापायी त्याने मित्रांच्या मदतीने जन्मदात्या आईचीच हत्या केली. अवघ्या १५ वर्षांच्या मुलाच्या या क्रूरकृत्याने अवघा महाराष्ट्र हादरला आहे.
 
काय आहे प्रकरण ?
उदगीर येथे गेल्या आठवड्यात गुरुवारी भर दुपारी एक वाजण्याच्या सुमाराला चोरीच्या उद्देशाने घरात घुसलेल्या तीन अज्ञात चोरट्यांनी सोने पळविताना आरडाओरडा केलेल्या महिलेचा तीक्ष्ण हत्याराने गळा चिरुन खून केला. चोरट्यांच्या या हल्ल्यात मयत महिलेचा १५ वर्षाचा मुलगाही गंभीर जखमी झाला आहे़ प्रणिता प्रशांत पेन्सलवार (वय ४४) असे मयत महिलेचे नाव असून त्यात त्यांचा मुलगा सोहमही जखमी झाला होता. 
शहरातील शेल्लाळ रोडवरील येथील प्रशांत पेन्सलवार यांच्या घरी गुरुवारी दुपारी एकच्या त्यांची पत्नी प्रणिता व मुलगा सोहम (१५) हे दोघेच होते़ यावेळी तीन अज्ञात युवकांनी ‘सावकारांनी (मयत महिलेच्या पतीने) एसी दुरुस्त करण्यास सांगितले आहे’, असे प्रणिता पेन्सलवार यांना सांगितले़. त्यामुळे त्यांनी तिघांना एसी दाखविली़ एसी पाहण्याचा बहाणा करुन ते तपास असताना त्यांनी पाणी मागितले. १५ वर्षीय सोहम पाणी आणण्यासाठी दुसऱ्या खोलीत गेला असता या तिघांनी प्रणिता यांना धाक दाखवून त्यांच्या अंगावरील दागिने ओरबाडले़. घाबरलेल्या प्रणिता यांनी आरडाओरड करण्यास सुरुवात केली़ तेव्हा तिघांनी तीक्ष्ण हत्याराने त्यांचा गळा चिरला आणि ते तेथून पळाले. मात्र आईचा आवाज ऐकून धावत बाहेर आलेल्या सोहमवरही त्या  चोरट्यांनी वार केले व तो गंभीर जखमी झाला. येत असताना त्याच्याही हातावर तिघांनी हातातील हत्यारांनी वार केला़ त्यात तोही गंभीर जखमी झाला आहे. 
दरम्यान याप्रकरणाचा पोलिस तपास करत असताना त्यांना या घटनेत काही गडबड जाणवली व त्यांनी सोहमची कठोर पद्धतीने चौकशी केली असता, त्यानेच आपल्या आईचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली.