शहरं
Join us  
Trending Stories
1
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
2
Shefali Jariwala Death: शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
3
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
4
झटपट पैसे कमावण्यासाठी पती-पत्नीने सुरू केला असा धंदा, अश्लील चॅट, व्हिडीओ आणि...
5
Philippines Earthquake: फिलीपिन्समध्ये ६.० तीव्रतेचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
6
आता मोबाइल ॲपद्वारे कुठूनही करता येणार मतदान; कोणत्या मतदारांना मिळणार अधिकार?
7
Shefali Jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
8
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
9
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
10
तरुण जोडप्यांना मुलांची आस, पण तरीही का घसरतोय देशाचा प्रजनन दर?
11
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
12
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
13
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
14
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
15
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
16
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
17
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
18
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!
19
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
20
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू

रुग्णांचे काही प्रमाणात हाल

By admin | Updated: October 15, 2015 02:37 IST

देशासह राज्यातील केमिस्टस्नी औषधांची दुकाने २४ तास बंद ठेवल्याने काही प्रमाणात रुग्णांचे हाल झालेत. केमिस्टचा संप असल्याचे माहीत नसल्याने अनेकांना औषधांसाठी वणवण करावी लागली

मुंबई: देशासह राज्यातील केमिस्टस्नी औषधांची दुकाने २४ तास बंद ठेवल्याने काही प्रमाणात रुग्णांचे हाल झालेत. केमिस्टचा संप असल्याचे माहीत नसल्याने अनेकांना औषधांसाठी वणवण करावी लागली. मोठ्या रुग्णालयांजवळील औषधांची काही दुकाने मात्र सुरू होती. तथापि, अन्न व औषध प्रशासनाच्या हेल्पलाईनमुळे अनेकांना फायदा झाला. औषधाची दुकाने बंद असली, तरीही रुग्णालयातील औषधांची दुकाने सुरू होती. या दुकानांमध्ये आधीच पुरेसा साठा करून ठेवल्यामुळे रुग्णांचे हाल कमी झाले. पेनकिलरसारखी औषधे घेण्यासाठी, बॅण्डेज, ग्लोज अशा नेहमीच्या गोष्टी घेण्यासाठीही बराच वेळ ताटकळत राहावे लागले. मुंबईत संपाचा मोठा परिणाम मुंबईत जाणवला. रुग्णांचे हाल होऊ नयेत, म्हणून मोठ्या रुग्णालयांच्या परिसरातील एक-एक औषधाचे दुकान सुरू ठेवण्यात आले होते, पण इतर सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली होती. (प्रतिनिधी)>देशासह राज्यातील केमिस्टस्नी आॅनलाईन औषध विक्रीच्या निषेधार्थ पुकारलेल्या संपामध्ये जनतेचे हाल होऊ नयेत, म्हणून अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) हेल्पलाईन क्रमांक दिले होते. या क्रमांकाचा सर्वसामान्य जनतेला फायदा झाला. वांद्रे-कुर्ला संकुलातील एफडीएच्या मुख्य कार्यालयात सायंकाळपर्यंत ७० कॉल्स आले होते. एफडीए अधिकाऱ्यांनी ही अनेकांना औषधे मिळण्यासाठी सहकार्य केले. मुंबईतील अधिकाऱ्यांना ४० कॉल्स आले होते, तर विविध जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना १५० कॉल्स आले. औषधांची गरज आहे, दुकाने बंद आहेत, कुठे औषधे मिळतील? यासाठी हे कॉल्स आल्याची माहिती एफडीएचे आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी दिली. >धरणे आंदोलनऔषधांच्या आॅनलाईन विक्रीविरोधात देशव्यापी संपात उतरलेल्या औषध विक्रेत्यांनी बुधवारी आझाद मैदानावर हजारोंच्या संख्येने धडकत धरणे दिले. कोणत्याही सरकार किंवा शासनाविरोधात हे आंदोलन नसून, औषध विक्रेत्यांच्या मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न असल्याचे महाराष्ट्र स्टेट केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशनचे सचिव अनिल नावंदर यांनी सांगितले. रूग्णांचे हाल होऊ नये, म्हणून महत्त्वाच्या रूग्णालयांशेजारी एक ते दोन औषधांची दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी संघटनेने दिल्याचेही त्यांनी ‘लोकमत’ला सांगितले. मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या चर्चेत औषध विक्रेत्यांच्या मागण्यांचा विचार करण्याचे आश्वासन मिळाल्याने संपाचा उद्देश सफल झाल्याचेही नावंदर म्हणाले. जेजे रूग्णालयाजवळील एका दुकानाचा अपवाद वगळता, सर्व औषधांची दुकाने बंद होती. >कोकणात संमिश्र प्रतिसादठाणे : अनधिकृत आॅनलाईन औषध विक्रीविरोधात अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेने बुधवारी पुकारलेल्या एकदिवसीय देशव्यापी मेडिकल दुकाने बंदला कोकण विभागात संमिश्र प्रतिसाद लाभला. एकीकडे (कोकण विभाग) मेडिकल असोसिएशनने १०० दुकाने बंद असल्याचा दावा केला असला, तरी दुसरीकडे एफडीएने आखलेल्या उपाययोजनांमुळे रुग्णांचे हाल झाले नसल्याचे सांगून, दोन हजार दुकाने सुरू असल्याचे स्पष्ट केले. बुधवारी कोकण विभागात ४२२ होलसेल आणि १ हजार ८११ किरकोळ दुकाने सुरू होती. त्यामध्ये ठाणे जिल्ह्यात १४५ होलसेल आणि एक ४३२ किरकोळ दुकान विक्रेत्यांचा समावेश असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाने दिली.