शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

पानसरे हत्येप्रकरणी आणखी काहींचा सहभाग, एसआयटीने हायकोर्टाला दिली माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2018 02:17 IST

कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येमध्ये आणखी काही जणांचा सहभाग असल्याची माहिती विशेष तपास पथकाने (एसआयटी) उच्च न्यायालयाला गुरुवारी दिली.

मुंबई : कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येमध्ये आणखी काही जणांचा सहभाग असल्याची माहिती विशेष तपास पथकाने (एसआयटी) उच्च न्यायालयाला गुरुवारी दिली. मात्र, आतापर्यंत या आरोपींना पकडण्यात यश आले नसल्याचेही एसआयटीने उच्च न्यायालयाला सांगितले. त्यावर न्यायालयाने सर्व फारार आरोपींना सहकार्य करणाºयांना आॅनलाइनद्वारे ट्रोल करण्याची सूचना केली.डॉ. नरेंद्र दाभोलकर व कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येत सहभागी असलेल्या आरोपींना शिक्षा झाली नाही, तर अन्य गुन्हेगारांना प्रोत्साहन मिळेल. त्यामुळे तपासयंत्रणेला आरोपींपेक्षा अधिक चलाख बनावे लागेल, असे मत न्या. एस. सी. धर्माधिकारी व न्या. भारती डांग्रे यांच्या खंडपीठाने व्यक्त केले.दाभोलकर व पानसरे यांच्या हत्याप्रकरणाचा तपास न्यायालयाच्या देखरेखीखाली सुरू राहावा, यासाठी दोन्ही कुटुंबीयांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या आहेत. गुरुवारी त्यावरील सुनावणीत एसआयटीतर्फे ज्येष्ठ वकील अशोक मुंदर्गी यांनी पानसरे यांच्या हत्येमध्ये आणखी काहींचा सहभाग असल्याचे सांगितले. ‘तपासयंत्रणेने त्यांना आरोपी केले आहे. मात्र, अद्याप त्यांना पकडण्यात यश आले नाही. जे फरार आहेत त्यांनी निवासी पत्ता, मोबाइल नंबर व ओळख बदलली आहे. त्यामुळे त्यांना पकडण्यात अडचणी येत आहेत,’ असे मुंदर्गी यांनी सांगितले.एसआयटीच्या या म्हणण्याला सीबीआयनेही दुजोरा दिला. अ‍ॅडिशनल सॉलिसीटर जनरल अनिल सिंग यांनी दाभोलकर यांच्या हत्येमधील आरोपींनीही त्यांची ओळख बदलून ते नव्या ठिकाणी राहात असल्याचे सांगितले. मोबाइलद्वारे होणाºया संवादाद्वारे या आरोपींचा ठावठिकाणा शोधण्याचा प्रयत्न तपासयंत्रणा करत असल्याचेही सिंग म्हणाले. तर ‘फरार आरोपींचा ठिकाणा शोधण्यासाठी त्यांच्या संपर्कातील लोकांना आॅनलाइन ट्रोल करा. ट्रोल करणे कायदेशीर आहे,’ असे न्यायालयाने म्हटले.अहवाल सादर करासीबीआय व एसआयटीनेगुरुवारी न्यायालयात तपास अहवाल सादर केला. आता न्यायालयाने पुढील तपास अहवाल १ मार्च रोजी सादर करण्याचे निर्देश तपास यंत्रणांना दिले आहेत.

टॅग्स :Govind Pansareगोविंद पानसरेCourtन्यायालय