शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ दावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकूण वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
2
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
3
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
4
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या
5
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
6
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
7
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
8
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
9
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
10
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
11
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
12
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
13
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?
14
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
15
Jolly LLB 3: अ‍ॅडव्होकेट जगदीश त्यागी बनून पुन्हा एकदा अरशद वारसी येतोय भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
16
Health: हाताच्या दोन बोटांवरून लक्षात येतं, शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल; त्वरित करा 'हे' उपाय 
17
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
18
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
19
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
20
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”

नाटकातून मिळालेले समाधान केवळ अलौकिकच

By admin | Updated: April 23, 2017 01:31 IST

रामगणेश गडकरींच्या पाचही नाटकांत काम केलेल्या अभिनेत्यांपैकी आजघडीला हयात असलेला मी एकमेव अभिनेता आहे. या सगळ्या नाटकांनी खऱ्या अर्थाने समृद्ध केले.

- विशाल सोनटक्के / बाबुराव चव्हाण, उस्मानाबाद

रामगणेश गडकरींच्या पाचही नाटकांत काम केलेल्या अभिनेत्यांपैकी आजघडीला हयात असलेला मी एकमेव अभिनेता आहे. या सगळ्या नाटकांनी खऱ्या अर्थाने समृद्ध केले. आयुष्यात सुख मोजण्याचे परिमाण पैसा नाही. नाटकांतून मिळालेले समाधान शब्दातीत आहे. म्हणूनच आज वयाच्या ८२व्या वर्षीही आपण समाधानी आयुष्य जगत असल्याचे प्रतिपादन ९७व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष जयंत सावरकर यांनी केले.येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात शनिवारी सायंकाळी अमित भंडारी यांनी जयंत सावरकर यांची प्रकट मुलाखत घेण्यात आली. संमेलनाध्यक्षपदी आपली बिनविरोध निवड करण्यात आली. हा सर्वात मोठा बहुमान आहे. स्पष्ट आणि महत्वाचे बोलणे कोणाच्याही स्वाभिमानाला न डिवचता आपले मत मांडणे हा माझा स्वभाव आहे. १९९५च्या काळात रंगभूमीशी माझं नातं जुळलं. त्यावेळी मध्यमवर्गीय कुटुंबात नाटकांविषयी बरे बोलले जात नसे. नाटकाचे धंदे करण्यापेक्षा स्वत:च्या पायावर उभे रहा, हा सल्ला पावलोपावली मिळायचा. कुटुंबीय, नातेवाईक, मित्रपरिवार यांचा नाटकाला विरोध होता. परंतु नोकरी सोडून या क्षेत्रात झेपावलो. नोकरीत मन रमले नाही. राम व्हावे किंवा रावण व्हावे मात्र लोकांच्या तोंडी कायम रहावे, हा मूलमंत्र आजही मी प्रामाणिकपणे जगत आलो आहे. त्याचेच द्योतक म्हणून संतमंडळींचा वारसा असलेल्या उस्मानाबाद जिल्ह्यात संमेलनाध्यक्ष होण्याचा सन्मान माझ्या वाट्याला आला, असे ते म्हणाले.दामू केंकरे हे माझे गुरू. त्यांच्याप्रमाणे अनेकांनी मला मार्गदर्शन केले. मात्र गुरू होण्याचा मान त्यांच्या एकट्याचाच पडद्यामागील कलाकार, पार्श्वसूचक ते चरित्र अभिनेता, अशा अनेक अडथळ्यांची शर्यत पार करीत इथवरचा पल्ला गाठला आहे. आजवर ११० नाटकांत काम केले. त्याचे किती प्रयोग झाले, सांगता येत नाही. प्रत्येक भूमिकेवर जीवापाड प्रेम केले. त्यामुळे प्रत्येक भूमिकेने मला दरवेळी जगण्याचे बळ दिले. त्यातील नेमकी कोणती भूमिका मनावर गारूड करून आहे, असे विचारल्यास सांगता येणार नाही असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी घनश्याम, कामण्णा, मनोहर या त्यांच्या गाजलेल्या पात्राचे संवाद सादर करून रसिक श्रोत्यांची दाद घेतली. चुकीच्या प्रथांवर ‘हास्यरंगा’तून परखड भाष्य!शहरातील बापूजी लिमये नाट्यमंचावर एकापेक्षा एक दमदार एकपात्री नाटकांचे सादरीकरण झाले. बहुतांश नाटिकांच्या माध्यमातून समाजव्यवस्थेतील चुकीच्या प्रथा, परंपरांवर प्रखड भाष्य करण्यात आले. त्याला रसिक प्रेक्षकांकडूनही भरभरून दाद मिळाली. औरंगाबाद येथील प्रा. विष्णु सुरासे यांनी ‘हास्यरंग’च्या माध्यमातून निवडणुका, लग्नसमांरभ आणि आजच्या शिक्षण पद्धतीवर भाष्य केले. अमरावती येथील रिझवान पटेल या अंधकलावंताने अक्षरश: दहा ते पंधरा मिनिटे रसिक प्रेक्षकांना खिळवून ठेवले. ‘ये रे-ये रे पावसा’ हे गीत त्यांनी विविध दिग्गज गायकांच्या आवाजात सादर करून रिसिकांची दाद मिळविली. मुंबई येथील कलावंत डॉ. किशोर खुशाले यांनीही जोरदार सादरीकरण केले. सततच्या संकटामुळे शेती व्यवसाय अडचणीत आला आहे. त्याला तातडीने आधार देण्याची गरज असताना, शासकीय यंत्रणेकडून पिकांचे नुकसान कशाने झाले? किती प्रमाणात झाले? अशा प्रश्नांचा किस पाडला जातो. तोवर शेतकरी पुरता कोलमडून पडतो. त्यामुळे शासनाने आता धुऱ्यावरच कॅमेरे लावावेत, अशा परखड शब्दात त्यांनी भाष्य केले. अमरावती येथील डॉ. राजेंद्र भुडेकार यांनी अंधश्रद्धा, फसवणूक, स्त्रीभ्रृणहत्या अशा ज्वलंत प्रश्नांसदर्भात नाटिकेच्या माध्यमातून प्रबोधन केले.