शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
3
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
4
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
5
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
6
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
7
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
8
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
9
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
10
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
11
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
12
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
13
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
14
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
15
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
16
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
17
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
18
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
19
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
20
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू

अनवाणी प्रवासातून साकारलेली 'सोल'फुल जोडी

By अोंकार करंबेळकर | Updated: August 23, 2017 16:52 IST

फेकून दिलेल्या बुटांमधून अनवाणी चालणाऱ्या मुलांसाठी नव्या चपला तयार करण्याची अनोखी किमया मुंबईच्या श्रीयांश आणि रमेश या दोन तरुण उद्योजकांनी केली आहे.

ठळक मुद्देभारतभरातून जुने चपला-बूट त्यांच्याकडे येतात. त्यांचे सोल प्रथम वेगळे केले जातात. मग ते सोल व्यवस्थित धुवून निर्जंतूक केले जातात या सोलवर नवे कापडाचे किंवा चामड्याचे आवरण चढवतात. मग चपलाचे वरचे भाग (अप्पर) त्यावर लावून मस्त नव्याकोऱ्या चपला ते बनवतात.

मुंबई, दि.23- नव्या चपला किंवा बूट घेतले की थोड्या वापरानंतर त्या नकोशा वाटायला लागतात, बऱ्याचदा ते वापरायोग्यही असतात पण केवळ जुने झाले, रंग फिका झाला म्हणून त्यांचं वापरणं बंद होतं. चप्पल-बुटांचे असे जोड थोडे दिवस घरात लोळत पडले की मग त्यांची अडचण व्हायला लागते, शेवटी त्यांची रवानगी घराबाहेर कचऱ्यात होते. असे फेकून दिलेले जोड आपल्याला नेहमी दिसत असतात. कचऱ्यात, नाल्यात, नदीत किंवा समुद्रातून पुन्हा किनाऱ्यावर फेकले गेलेले चप्पल-बुटांचे जोड पाहणं फारसं नवीन नसतं. पण या चप्पल बुटांचा उपयोग करुन त्यातून अनवाणी चालणाऱ्या मुलांसाठी नव्या चपला तयार करण्याची अनोखी किमया मुंबईच्या दोन तरुण उद्योजकांनी केली आहे. ग्रीनसोल नावाची कंपनीच या दोघांनी स्थापन केली आहे.

हे दोघे आहेत श्रीयांश भंडारी आणि रमेश धामी. मुंबईत येणाऱ्या प्रत्येक माणसासारखे हे दोघेही काहीतरी वेगळं करुन दाखवण्याचं स्वप्न उराशी बाळगून मुंबईत आले. श्रीयांश आहे मुळचा उदयपूरचा, शिक्षणासाठी त्यानं मुंबईत येण्याचा निर्णय घेतला. तर रमेशची गोष्ट एखाद्या सिनेमात शोभावी अशी आहे. काहीतरी चांगलं करायचं असं त्याला लहानपणापासून वाटायचं. उत्तराखंडमधल्या लहानशा गावात आपल्याला काही करणं शक्य नाही असं वाटून त्यानं वयाच्या दहाव्या वर्षी गाव सोडलं आणि लहानसहान कामं करत उत्तर भारतात भटकत राहिला. मग सिनेमात करायची इच्छा मनात घेऊन त्यानं एकदा मुंबईत प्रवेश केला. इथेही काही दिवस छोटीमोठी कामं केल्यानंतर त्याला कोठेच आसरा मिळत नव्हता. शेवटी त्याला साथी नावाच्या एनजीओने आसरा दिला. साथीच्या संपर्कात आल्यावर त्याची राहण्या-खाण्याची आणि शिक्षणाची सुरुवात झाली. इथंच तो वाचायला-लिहायला शिकला. संस्थेत राहात असताना त्याच्या मनामध्ये मॅरेथॉनमध्ये भाग घेण्याची इच्छा झाली. 2008 साली त्यानं 1 तास 31 मिनिटांमध्ये अर्ध मॅरेथॉन पूर्ण केलं. आपण चांगले धावपटू होऊ शकतो हे त्याच्या लक्षात आलं मग रमेशने प्रत्येक स्पर्धेत भाग घ्यायला सुरुवात केली आणि त्याला बक्षिसंही मिळू लागली.

प्लास्टिकमुक्त मुंबईसाठी सरसावले पवईतील तरुण

या धावण्याच्या आवडीनंच रमेश आणि श्रीयांश यांना एकत्र आणलं. हे दोघेही मुंबईच्या प्रियदर्शनी पार्कमध्ये धावण्याचा सराव करायचे. सरावाच्या वेळेस त्यांची ओळख झाली आणि मग त्यांची घट्ट मैत्रीच झाली. रोज वेगवेगळ्या विषयांवर गप्पाही होऊ लागल्या. सरावाच्यावेळेस त्यांच्या लक्षात यायचं आपले बूट कितीही चांगले असले तरी काही महिन्यांतच त्यांची अवस्था खराब होते. पण त्यांचे तळवे म्हणजे सोल मात्र मजबूत असतात. त्यांच्याप्रमाणेच इतरही लोक तळवे मजबूत असणारे पण वरती फाटलेले बूट फेकून देत होते. या सोलचा उपयोग करुन नव्या चपलाच केल्या तर किती मस्त होईल, आपण अनवाणी चालणाऱ्या पोरांना मदत करु शकू असं त्या दोघांच्या मनात आलं. झालं.... दोघेही सोलपासून नव्या चपला कशा करायच्या हे शोधायच्या मागे लागले. सुरुवातीला त्यांनी असे सोल गोळा केले आणि त्याला वादीसारख्या नायलॉनचा अंगठा आणि घोट्याजवळ एक पट्टी लावून साधी चप्पल तयार केली. इंटरनेटच्या मदतीने त्यांनी एकेक नवे डिझाइन तयार करायला सुरुवात केली. एकेदिवशी त्यांना समजल मुंबईत कुर्ल्याजवळ ठक्करबाप्पा वसाहतीमध्ये अशा चपला तयार करणारे कारागिर आहेत. मग या दोघांनी आपला मोर्चा तिकडे वळवला. तिथल्या कारागिरांकडून या उद्योगाची सगळी माहिती करुन घेतली. बूट-चप्पल कारखान्यांना विनंती करणारी पत्रे पाठवून जागेची मागणी केली. शेवटी त्यांना महापे इथं एका कंपनीनं जागा दिली. या जागेत बसून दोन कामगारांच्या मदतीने या दोघांनी नव्या चपला बूट तयार करायला सुरुवात केली. 

तर ही मुलं करतात तरी काय... भारतभरातून जुने चपला-बूट त्यांच्याकडे येतात. त्यांचे सोल प्रथम वेगळे केले जातात. मग ते सोल व्यवस्थित धुवून निर्जंतूक केले जातात. या सोलवर नवे कापडाचे किंवा चामड्याचे आवरण चढवतात मग नवे आणलेले चपलाचे वरचे भाग (ज्याला अप्पर म्हणतात) त्यावर लावून मस्त नव्याकोऱ्या चपला ते बनवतात. हे अप्पर म्हणजे वरच्या पट्ट्या, चपलाचे अंगठे सुद्धा काही कंपन्या त्यांना मदत म्हणून पाठवतात. ट्रेकिंगसाठी वापरले जाणारे साहित्य नियमांनूसार काही वर्षांनी फेकून द्यावे लागते. जरी फेकावे लागले असले तरी त्या साहित्याचा वापर कमी झालेला असतो तसेच ते अत्यंत मजबूतही असते. या साहित्यातील दोऱ्या, वाद्या, नायलॉनचे भाग यांच्यापासूनही अप्पर तयार केले जातात. खेड्यात राहणाऱ्या मुलांना, डोंगराळ प्रदेशातील मुलांना या मजबूत चपलांचा चांगलाच फायदा होतो. वेगवेगळ्या आकारांच्या चपला तयार झाल्या की भारतभरात लहानलहान खेड्यापाड्यांमध्ये या चपला पाठवल्या जातात. आजवर पन्नास हजार मुलांना यांच्या ग्रीनसोल कंपनीमुळे चपला मिळालेल्या आहेत. रमेश आणि श्रीयांश म्हणतात, त्यांच्या कामाची माहिती लोकांना समजल्यावर खेड्यापाड्यातूंन, आदिवासी भागातून त्यांच्या चपलांसाठी मागणी नोंदवली जाऊ लागली, ही मागणी काही लाखांच्या घरात आहे. यावरुन चपलांची गरज किती आहे ते समजतं असं रमेश सांगतो. 

(तलासरी येथील शाळेतील मुलांना चपलांचे वाटप झाल्यावर... सर्व छायाचित्रे- श्रीयांश भंडारी)

आता सगळी सोंगं आणता येतात पण पैशाचं सोंग आणायचं कसं? हा सर्वत्र असणारा प्रश्न या दोघांच्या डोळ्यांसमोर होताच. चपलांपासून पुन्हा चपला करायच्या, त्या मुलांमध्ये वाटायच्या तेही फुकट. हा असला धंदा करायचा तर मागे कोणाचेतरी हात असायलाच हवेत. पण या दोघांना सुदैवाने मदतीचे हात मिळाले. अनेक कंपन्यांनी त्यांच्या सीएसआरफंडातून यांना मदत केली. आर्थिक मदत, वाहतुकीचा खर्च उचलणाऱ्या कंपन्यांनी त्यांच्यासाठी मदतीचा हात पुढे केला. त्यामुळे या दोघांची कल्पना सत्यात उतरली आणि ते अनवाणी मुलांना चपला देऊ शकले. एकेकाळी स्वतः अनवाणी फिरणाऱ्या रमेशला या सगळ्या कामामध्ये भरपूर आनंद मिळतो. सिनेमात जाऊ शकलो नाही पण हे असं समाजासाठी भारी काम करायला मिळालं यातला आनंद शब्दांमध्ये सांगता येणार नाही असं तो सांगतो.

 

टॅग्स :Indiaभारत