शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नियम बदलल्याने सौरऊर्जा अनुदान अडकले!

By admin | Updated: April 12, 2017 01:18 IST

केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाने अचानक नियम बदलल्यामुळे महाराष्ट्रातील ३००हून अधिक सौरऊर्जा प्रकल्प अनुदानापासून वंचित राहिले आहेत. यामध्ये बहुतांश घरगुती व शाळा,

- सोपान पांढरीपांडे, नागपूरकेंद्रीय ऊर्जा मंत्रालयाने अचानक नियम बदलल्यामुळे महाराष्ट्रातील ३००हून अधिक सौरऊर्जा प्रकल्प अनुदानापासून वंचित राहिले आहेत. यामध्ये बहुतांश घरगुती व शाळा, कॉलेजसारख्या सामाजिक संस्थांचा समावेश आहे. सौरऊर्जा क्षेत्राच्या विकासासाठी २०१५ साली ही अनुदान योजना सुरू केली होती. त्यानुसार घरगुती व नफा न कमविणाऱ्या शाळा, कॉलेज व गैरसरकारी सामाजिक संस्थांनी सौरऊर्जा प्रकल्प लावले तर ३० टक्के अनुदान केंद्र सरकारकडून मिळणार होते. हे प्रकल्प महाराष्ट्र एनर्जी डेव्हलपमेंट अ‍ॅथॉरिटीच्या (एमईडीए) नोंदणीकृत कंत्राटदारांकडून पूर्ण करायचे बंधन होते व केंद्राचे अनुदानही ‘एमईडीए’मार्फत मिळणार होते. या योजनेमुळे महाराष्ट्रातील हजारो मध्यमवर्गीय कुटुंबांनी व सामाजिक संस्थांनी असे प्रकल्प उभे केले व सौरऊर्जा अनुदानाचा लाभ घेतला. मात्र केंद्राने फेब्रुवारीमध्ये अचानक नियमात बदल केला व पूर्वपरवानगी असलेले प्रकल्पच अनुदानासाठी पात्र ठरतील, असा आदेश काढला. त्यामुळे २०१५ ते फेब्रुवारी २०१७ यादरम्यान ज्यांनी आपले प्रकल्प पूर्ण केले होते, अशा प्रकल्पांचे अनुदान थांबले. या प्रकल्पांनी पूर्वपरवानगी घेतली नव्हती म्हणून ते अनुदानासाठी अचानक अपात्र ठरले आहेत. यासंबंधी सोलर थर्मल फेडरेशन आॅफ इंडियाचे अध्यक्ष एम. डी. आकोले म्हणाले, महाराष्ट्रात २०० ते २२५ लाभार्थ्यांनी एक ते तीन किलोवॅट क्षमतेचे प्रकल्प उभे केले, तर ५० ते ७५ लाभार्थ्यांचे प्रकल्प तीन किलो वॅटपेक्षा मोठे आहेत. एक किलोवॅटसाठी १८ हजार ३०० रुपयांचे अनुदान मिळते. पण नियम बदलल्याने हे ३०० लाभार्थी अनुदानापासून वंचित राहिले आहेत. या प्रकल्पांची एकूण क्षमता एक मेगावॅट असावी, असेही आकोले म्हणाले.अनुदान सर्वांसाठी नाही : एमईडीएयाबाबत एमईडीएचे महासंचालक नितीन गद्रे म्हणाले, महाराष्ट्राने ४ हजार मेगावॅट सौरऊर्जेचे उद्दिष्ट ठेवले आहे व त्यापैकी फक्त १०० मेगावॅट प्रकल्प अनुदान योजनेतून पूर्ण होतील, त्यामुळे अनुदान सर्वांसाठी नाही. तरीसुद्धा मेडाने या ३०० लाभार्थ्यांसाठी केंद्र सरकारला पत्र पाठविले आहे व जो निर्णय येईल तो आम्हाला बंंधनकारक राहील, असेही गद्रे म्हणाले. लाभार्थ्यांना एमईडीने ३१ मेपर्यंत मुदत द्यावी व राज्य सरकारने केंद्राकडे पाठपुरावा करून अनुदान मिळवून द्यावे, असा पर्याय आकोले यांनी सुचविला.