मिलिंंद राऊळ, ऑनलाइन लोकमतसोलापूर, दि. 8 - वर्षभर ज्याची आतुरतेने वाट पाहतो त्या लाडक्या गणरायाचे संपूर्ण राज्यभरात मोठ्या जल्लोषात स्वागत झाले आहे. सोलापुरातही हा जल्लोष कमी नाही, उत्सव मग कोणताही असो त्यात सोलापूर नेहमीच अग्रेसर राहिलेले आहे. या जोडीलाच भक्तीलाही इथे सीमा नाही. सोलापुरातील तीन कुटुंबांनी निस्सीम भक्तीपोटी मुंबईच्या लालबागच्या राजाला तब्बल २१ फूट लांबीच्या दुर्वा आणि आघाड्यापासून हार तयार केला आहे. त्याचे वजन तब्बल २५ किलो असून, लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण करण्यासाठी तो सिद्धेश्वर एक्स्प्रेसने मुंबईकडे बुधवारी रवाना झाला आहे.सोलापुरातील सम्राट चौकातील वीरकर गणपती परिसरात राहणारे रामचंद्र सिद्रामप्पा हाक्के, सतीश शांतवीरप्पा माळी आणि प्रसाद बसवंती कुटुंबीय गणरायाचे निस्सीम भक्त आहेत. या भक्तीतूनच त्यांनी गेल्या वर्षापासून दर गणेशोत्सवाला लालबागच्या गणपतीला दुर्वा आणि आघाड्याचा हार तयार करुन तो मुंबईला नेऊन ह्यश्रींह्णच्या चरणी अर्पण करण्याचा संकल्प सोडला आहे. यंदा हे दुसरे वर्ष आहे. या उपक्रमाबद्दल बोलताना हाक्के-माळी-बसवंती या त्रिमूर्र्तींनी देवासाठी तयार केलेल्या या हारामुळे मनाला आत्मिक शांती मिळत असल्याचे प्रांजळपणे नमूद केले. अलीकडच्या काळात सोलापूरचा पट्टा तसा दुष्काळी म्हणूनच जाऊ लागला आहे. या समस्त सोलापूरकरांवर विघ्नहर्त्या लालबागच्या राजाची कृपा राहावी, पाऊसपाणी येऊन चांगले पीक येऊ दे, बळीराजाच्या अंगणात समृद्धी येऊ दे असे साकडे आम्ही घालणार असल्याचे त्यांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.------------------------------------दहा जणांनी घेतली मेहनत२१ फूट लांब आणि २५ किलो वजनाचा दुर्वाचा हार तयार करण्यासाठी १० जणांनी यात उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. हा संपूर्ण हार तयार करण्यासाठी तब्बल आठ तास लागले; मात्र हे करताना एक अनामिक समाधान लाभले. चौफेर डंका असलेल्या लालबागच्या राजाच्या गळ्यात घालण्यासाठी तयार होणारा हा हार आपणास माळण्याची संधी मिळाली ही त्या विघ्नहर्त्या गणेशाचीच कृपा असल्याच्या भावना रामचंद्र सिद्रामप्पा हाक्के, सतीश शांतवीरप्पा माळी आणि प्रसाद बसवंती यांनी व्यक्त केल्या.
'लालबागच्या राजा'साठी सोलापुरी साज
By admin | Updated: September 8, 2016 19:56 IST