शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर विद्यापीठ नामांतराचा लढा उतरला रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2017 18:39 IST

सोलापूर दि २८ : सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्यासाठी नामांतर संयुक्त कृती समितीने काढलेल्या मोर्चाने सोमवारी जिल्ह्याचे लक्ष वेधले. हजारोंच्या उपस्थितीने निघालेल्या या मोर्चाने जिल्हाधिकारी कार्यलयाला धडक देवून आठ दिवसात निर्णय घेण्याची मागणी केली. निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलन उभारू, असा इशाराही दिली.

ठळक मुद्देआठ दिवसात निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलन उभारूसोलापूर शहरासह विविध संघटनांचा पाठींबापोलीसांचा होता चोख पोलीस बंदोबस्त

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि २८ : सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्यासाठी नामांतर संयुक्त कृती समितीने काढलेल्या मोर्चाने सोमवारी जिल्ह्याचे लक्ष वेधले. हजारोंच्या उपस्थितीने निघालेल्या या मोर्चाने जिल्हाधिकारी कार्यलयाला धडक देवून आठ दिवसात निर्णय घेण्याची मागणी केली. निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलन उभारू, असा इशाराही दिली.दुपारी १२ वाजताच्या सुमारास अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून चार हुतात्मा चौकातून मोर्चा निघाला. पिवळे ध्वज झळकवित आणि नामांतराच्या घोषणा देत निघालेल्या या मोर्चात जिल्ह्याच्या ग्रामीण भागासह विविध ठिकाणाहून नागरिक सहभागी झाली होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक मार्गे डफरिन चौकातून मोर्चा पुढे निघाला तसा मोर्चातील गर्दीमुळे आयोजकांचे नियोजन कोलमडून गेले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पुनम गेटवर मोर्चा पोहचल्यावर जाहीर सभेत रूपांतर झाले. सभेदरम्यान पाऊस आला तरी मोर्चकरी जागेवरच ठिय्या मांडून होते. त्यात सुमारे पन्नासहून अधिक नेत्यांनी आणि विविध संघटनांच्या पदाधिकाºयांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. सभेनंतर शिष्ठमंडळाने जिल्हाधिकाºयांना निवेदन दिले.सोलापूर महानगर पालिकेतील काँगे्रसचे गटनेते चेतन नरोटे यांच्यासह आमदार प्रकाश शेंडगे, आमदार रामराव फडकुले, आमदार नारायण पाटील, आमदार गणपतराव देशमुख, आमदार भारत भालके, आमदार अ‍ॅड. रामहरी रूपनवर, माजी मंत्री अण्णासाहेब डांगे, अर्जून सलगर, जिल्हा परिषद सदस्य स्वरूपाराणी मोहीते पाटील, वाघमोडे, रिपाईचे राजाभाऊ सरवदे, शिवसेनेचे पुरूषोत्तम बरडे, यशवंत सेनाचे राज्य सरसेनापती माधव गडदे, शिवाजी बनगर, विश्वास देवकर, पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब शेळके, परमेश्वर कोळेकर, नंदासाहेब काळे, गोपीचंद पडोळकर, भाजपाचे प्रवक्ते घनश्याम हाके आदींसह शेकडो मान्यवर सहभागी होते. यावेळी झालेल्या सभेत अनेक वक्त्यांनी आपल्या भावना मांडून सोलापूर विद्यापीठाला अहिल्यादेवी होळकर यांची नाव देण्याची जोरदार मागणी केली. स्वाती सरदार म्हणाल्या, आम्ही हक्क मागत आहेत, तो द्या. नामांतर न करणे ही विद्यापीठ आणि व्यवस्थापनाची खेळी आहे. ती आता जास्त दिवस चालणार नाही. कारण हा मोर्चा म्हणजे इशारा समजा.सचिता सलगर म्हणाल्या, आम्ही रस्त्यावर उतरलो आहोत. आता हक्क घेणारच. ही मागणी जुनी आहे. मात्र सरकार मुद्दाम वेळ लावत आहे. रिपाईचे प्रदेश सरचिटणीस राजा सरवदे यांनी या मागणीला रिपाई (आठवले गट)चा पाठिंबा जाहीर केला. ते म्हणाले, आम्ही या मागणीसोबत आहेत. पक्षाध्यक्ष रामदास आठवले यांचीही ही इच्छा आहे. आमदार रामहरी रूपनवर म्हणाले, अहिल्यादेवींचे कार्य संपूर्ण देशाला माहीत आहे. त्यांच्या कार्याचा गौरव करण्याची या सरकारला संधी आहे. या मागणीचा आपण विधानसभेत पाठपुरावा करू, असे आश्वासन त्यांनी दिले.राष्टÑवादी काँगे्रसचे लतीफ तांबोळी म्हणाले, ही मागणी जुनी आहे, ती मान्य झाली नाही तर आंदोलन पुढेही चालतच राहील. ही तर फक्त ट्रेलर आहे, चित्रपट अद्याप बाकी आहे, असा इशारा त्यांनी दिला.जिल्हा परिषद सदस्य स्वरूपराणी पाटील म्हणाल्या. करमाळा तालुक्यातील १०७ ग्रामपंचायतींनी या मागणीसाठी ठराव दिले आहेत. मोहीते पाटील कुटूंबाचाही या मागणीला पाठिंबा आहे. सरकारने जनभावना विचारात घ्यायला हव्या. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शिवाजी कांबळे, अजीत सलगर, क्षिरसागर यांच्यासह अनेकांनी यावेळी आपल्या भावना व्यक्त केल्या.