शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलने अचानक एअरस्पेस बंद केली; नेमके काय घडतेय... गाझा पट्टी की आणखी काही...
2
ओबीसी आणि मराठा आरक्षणावर राज्य सरकार ठाम; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची स्पष्टोक्ती
3
“मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचे नुकसान करतायत, स्वतःचे महत्त्व वाढावे...”; कुणी केली टीका?
4
धुळे हळहळले! रील स्टार शुभम सिंघवी याच्या दुचाकीला अपघात, जागेवरच मृत्यू
5
भंडाऱ्याची उधळण अन पुष्पवृष्टी, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला दिमाखदार मिरवणुकीने निरोप!
6
दहशतवाद्यांना पाकिस्तानची साथ; भारताने पाडलेल्या लष्कर-ए-तैयबाच्या मुख्यालयाचे बांधकाम पुन्हा सुरू
7
ह्युंदाईचे जीएसटी कपातीचे दर आले! नियॉस ७३,८०८, ऑरा ७८...; पहा कितीने कमी झाली क्रेटा...
8
‘हा तर मणिपूरच्या लोकांचा अपमान आहे’, PM मोदींच्या दौऱ्यावर काँग्रेसची बोचरी टीका
9
एका कुशीवरुन दुसऱ्या कुशीवर... पण काही केल्या झोपच येईना; 'या' ६ टिप्स गाढ झोपेमागचं रहस्य
10
'बीडमध्ये पोलिसांना आपले आडनाव लावता येत नसेल तर...', धनंजय मुंडेंनी व्यक्त केली खंत
11
चित्रकूट पर्वतावर पुजेसाठी जमलले! ५० जणांवर अचानक वीज कोसळली; ओडिशात धक्कादायक घटना
12
संसदेच्या आवारात भाजपची दोन दिवसांची कार्यशाळा; PM मोदी शेवटच्या रांगेत बसले...
13
एका शेअरने बदललं गुंतवणूकदारांचे नशीब! १ लाखाची गुंतवणूक ५ वर्षांत झाली ३४ लाखांहून अधिक
14
Travel : परदेशात जायचंय? 'हे' देश आहेत भारतीयांसाठी व्हिसा फ्री, ४० हजारात होईल एका देशाची ट्रिप!
15
विसर्जनाचं कंत्राट गुजरातला दिलं, कोळी बांधवांचा लालबाग मंडळावर गंभीर आरोप
16
अवघे पाऊणशे वयमान! सत्तरीत जग फिरण्याचं स्वप्न; ३५ देशांची सोलो ट्रिप, कोण आहे 'ट्रॅव्हल अम्मा'?
17
पितृपक्ष २०२५: कधी आहे सर्वपित्री अमावास्या? खंडग्रास सूर्यग्रहण लागणार; पाहा, काही मान्यता
18
'...तरच गाझा युद्ध थांबेल'; शांतता चर्चेत नवा ट्विस्ट, इस्त्रायलच्या परराष्ट्र मंत्र्यांचे मोठे विधान!
19
पितृपक्ष २०२५: १५ दिवस स्वामी सेवेने पितृदोष मुक्तता; १ मंत्र रामबाण, दत्तगुरु कल्याण करतील
20
एडटेक कंपनी 'फिजिक्स वाला'चा ३८२० कोटींचा आयपीओ; सेबीकडे दस्तऐवज दाखल, कुठे करणार गुंतवणूक?

सोलापूरचे शिवार झाले 'जलयुक्त'

By admin | Updated: July 21, 2016 15:09 IST

खूप दिवसाच्या प्रतिक्षेनंतर आलेल्या पावसामुळे सोलापूर शहर-जिल्ह्यात आनंदाचे वातावरण पसरले असून गेल्या २४ तास १०६ मिलिमिटर पाऊस पडल्याची नोंद हवामान खात्याकडे झाली आहे़

शिवाजी सुरवसे

सोलापूर, दि. २१ : खूप दिवसाच्या प्रतिक्षेनंतर आलेल्या पावसामुळे सोलापूर शहर-जिल्ह्यात आनंदाचे वातावरण पसरले असून गेल्या २४ तास १०६ मिलिमिटर पाऊस पडल्याची नोंद हवामान खात्याकडे झाली आहे़. जिल्ह्यात एकूण ८९ महसूली सर्कल असून यातील १७ सर्कलमध्ये दमदार पाऊस झाला आहे़ ११ सर्कलमध्ये २५ टक्केपेक्षा कमी पाऊस झाला आहे़ जलयुक्त शिवार अभियानात सोलापूर जिल्ह्याने राज्यात चांगले काम केले असून यामुळे अनेक गावातील शिवारे जलयुक्त झाली आहेत़ यामुळे निश्चित भूजल पातळी वाढणार आहे़

गेल्यावर्षी २८० गावामध्ये जलयुक्त शिवार अभियानातून कामे झाली तर यंदाच्या वर्षी २६५ गावात जलयुक्तची कामे सुरू आहेत़ गतवर्षी तत्कालीन जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी जलयुक्तवर खूप फोकस केल्यामुळे या अभियानात झालेल्या कामाचे परिणाम आता दिसू लागले आहेत़ गतवर्षी १ लाख २५ हजार ५७० हेक्टर क्षेत्राची बांधबंदिस्ती केली आहे़ ३४३ पाझर तलावांची दुरुस्ती केली अहे, १० केटी वेअर बसविले आहेत, ५१३ साखळी बंधारे केले आहेत, ४३८ शेततळी केली अूसन २३८ अनघड दगडाचे बांध बांधले आहेत़ ६६२ माती नाला बांध केले आहेत़ या परिसरात आणखी चांगला पाऊस झाला तर या केलेल्या कामामुळे ४८० टीसीएम एवढे पाणी साठवण होईल असा प्रशासनाचा दावा आहे़ त्यामुळे जलयुक्त शिवार अभियान जिल्ह्यासाठी लाभदायक ठरणार आहे़

महसूली सर्कलनिहाय झालेला पाऊस मिमिमध्ये :....उत्तर सोलापूर तालुका- सोलापूर सर्कल-१०५ , शेळगी-४०, मार्डी ६६, वडाळा-९५, तिऱ्हे ३८़ दक्षिण सोलापूर तालुका- वळसंगी-५८, मुस्ती-५३, बोरामणी-७०,मंद्रुप-३३, होटगी-८५, विंचूर-२५, निंबर्गी २३़ बार्शी तालुका-बार्शी-३१, खांडवी-३०, आगळगाव-८, वैराग-११, उपळे दुमाला-४, गौडगाव-३०, पांगरी-४, पानगाव-२७, नारी-१०, सुर्डी ४४अक्कलकोट तालुका-अक्कलकोट-१३५, वागदरी-१८, चपळगाव-३८,मैंदर्गी-७४, दुधनी-८९, जेऊर-४६,तडवळ-१३, करजगी-१८,किणी-५०मोहोळ तालुका- मोहोळ- ११२, वाघोली २५,कामती बु ३, शेटफळ १०, सावळेश्वर१२, नरखेड ६३, पेनूर ३७, टाकळी सिंकदर ४माढा तालुका- माढा ४८, रांजणी २५, मोडनिंब ४५, लहुळ ४४, दारफळ ३६, कुर्डूवाडी ४१, रोपळे ५, टेंभूर्णी ३२, म्हैसगाव-१६करमाळा तालुका- करमाळा ६, कोर्टी ०, केत्तूर १३, केम ४७, जेऊर ३२, उमरड ४, सालसे २१, अर्जूनगर १६, पंढरपूर तालुका- पंढरपूर ३७, कासेगाव २७, तुंगत १७, भाळवणी २७, पुळूज ३३, चळे २२, करकंब ९, पटवर्धन कुरोली १८, भंडीशेगाव ३२़

   सांगोला तालुका- सांगोला ४१, हतिद १८, कोळा २१, नाझरा १५, महुद बु १५, संगेवाडी ३०, शिवणे २८, सोनंद २७, जवळा ६माळशिरस तालुका- माळशिरस १४, महाळूंग १२, लवंग २, सदाशिवनगर १०, वेळापूर ३,पिलीव ६, इस्लामपूर १०, नातेपुते ०, अकलूज १७, दहिगाव ३, मंगळवेढा तालुका-मंगळवेढा-८२, बोराळे-१५, मरवडे २, हुलजंती ७, भोसे २१, अंधाळगाव २१, मारापूर २०़......इथे कमी पाऊसनातेपुते, मंगळवेढा, टाकळीसिकंदर, जावळा, वेळापूर, पिलीव, शेटफळ, कामती, हुलजंती, रोपळे या महसुली मंडळामध्ये (सर्कल) मध्ये २५ टक्के पेक्षा कमी पाऊस झाला आहे़ माढा, लऊळ, मोडनिंब, बार्शी, गुंजेगाव, अकलूज, मोहोळ, नरखेड, सावळेश्वर, वडाळा, मार्डी, मुस्ती, बोरामणी, होटगी, अक्कलकोट, दुधनी, १६ सर्कलमध्ये १०० टक्केपेक्षा पाऊस झाला आहे़ १७ महसूली सर्कलामध्ये २५ते ५० टक्के दरम्यान पाऊस झाला तर १४ सर्कलामध्ये ७५ टक्केपर्यंत पाऊस झाला आहे़