शहरं
Join us  
Trending Stories
1
...अन् यशस्वी जैस्वालची बॅट दांड्यातून निखळली; किती वेगाने आला होता चेंडू? जाणून घ्या बॅटची किंमत
2
गुजरात ATS ची मोठी कारवाई; अल-कायदाशी संबंधित चार दहशतवाद्यांना अटक
3
"तुम्ही लहान होतात, तुमच्या आई-वडीलांच्या सरकारमध्ये..."; नितीश यांनी तेजस्वी यादवांना सुनावलं
4
चार किलो सोनं चोरलं, जुगारात २५ लाख जिंकले, पण सेकंड हॅड मोबाईलच्या नादात अडकला चोर  
5
भारत-नेपाळ सीमेवर एसएसबी जवानांशी झटापट; गोळीबारात जवानाच्या डोक्यात लागली गोळी, हल्लेखोरही जखमी
6
'आम्हाला चुकीचे मृतदेह', अहमदाबाद विमान अपघाताबाबत ब्रिटिश कुटुंबांचा धक्कादायक दावा
7
बॉयफ्रेंडला धोका, उद्योगपतीशी लग्न... आता पतीपासून वेगळी राहते 'ही' बिग बॉस विनर?
8
Maharashtra Rain Alert: मुंबई, पुण्यासह 'या' जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट
9
पहलगाम हल्ला अन् ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेची तारीख ठरली; पीएम मोदीही उपस्थित राहणार
10
पहिल्यांदाच शेअर वाटायची तयारी, दोन दिवसांत 40% हून अधिक वधारला हा शेअर, केलं मालामाल!
11
कल्याण मारहाण प्रकरण: मराठी तरूणीला मारणारा गोकुळ झा, भाऊ रणजीत झा यांना २ दिवसांची पोलिस कोठडी
12
मुंबई लोकलचा प्रश्न दिल्लीत; काँग्रेस खासदाराने लोकसभेत मांडली जीवघेण्या प्रवासाची व्यथा
13
सुसाट स्पोर्ट्स बाईक दुभाजकावर आदळली, भीषण अपघातात भाजपा मंत्र्याचा पुतण्या मृत्युमुखी
14
नवी मुंबई: तरुणीने प्रेमसंबंध तोडले अन् तो नैराश्यामध्ये गेला, नंतर थेट घरावरच...
15
लोकसंख्येत होतेय सातत्याने घट! 'या' देशात फक्त ९ हजार लोक उरले
16
नाना पाटेकर यांना होता आणखी एक मुलगा, अडीच वर्षांचा असताना झालं निधन
17
'झिरो फिगर'च्या नादात केलं खतरनाक डाएटिंग, मरता मरता वाचली; तरुणीसोबत घडलं भयंकर
18
क्रिकेटच्या देवानंतर परदेशात असा सन्मान लाभणारे दुसरे भारतीय क्रिकेटर ठरले फारूख इंजिनीयर
19
'या' कारणामुळे UPI पेमेंट अडकू शकतात! १ ऑगस्टपासून ७ बदल होणार, बघा तुम्हाला काय करावं लागेल!
20
विवाहबाह्य संबंधाच्या प्रकरणात मुंबई, दिल्लीलाही टाकलं मागे, भारतातील 'हे' शहर पहिल्या क्रमांकावर

सोलापूर जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस

By admin | Updated: October 2, 2016 07:27 IST

मागील तीन वर्षापासून दुष्काळाचा सामना करणाऱ्या सोलापूर जिल्ह्यात यंदाच्या वर्षी पावसाने चांगलाच जोर धरला आहे़ आतापर्यंत ८१ टक्के पावसाची नोंद झाली आहे़

ऑनलाइन लोकमतसोलापूर, दि. ०२ : मागील तीन वर्षापासून दुष्काळाचा सामना करणाऱ्या सोलापूर जिल्ह्यात यंदाच्या वर्षी पावसाने चांगलाच जोर धरला आहे़ आतापर्यंत ८१ टक्के पावसाची नोंद झाली आहे़ याशिवाय उजनी धरण १०० टक्के भरण्याच्या वाटेवर असल्याने धरण परिसरातील शेतकऱ्यांतून आनंद व्यक्त होत आहे़

जिल्ह्यात पुष्य व उत्तरा नक्षत्राच्या पावसाने सर्वत्र पाणी-पाणी झाले असताना हस्त नक्षत्रातही संततधार सुरू झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ८१ टक्के पाऊस पडला असून, सततच्या पावसाने खरीप पिकांना धोका तर ज्वारीच्या पेरणीला विलंब होणार आहे. सोलापूर जिल्ह्यात यावर्षी पाऊस समाधानकारक पडला आहे. १९ ते २९ जुलै दरम्यान जिल्ह्याचा जवळपास सर्वच भागात कमी-अधिक प्रमाणात पाऊस पडला होता. त्याअगोदर व नंतर काही भागातच पाऊस पडला. त्यानंतर १३ ते २६ सप्टेंबर या कालावधीत सगळीकडे पाऊस पडला. तीन दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा जिल्ह्यात संततधार सुरू झाली आहे. आॅगस्ट महिन्यात दीड महिना पाऊस नसल्याने खरिपाची काही पिके गेली होती तर उत्तराच्या संततधार पावसाने आलेली काही पिके पाण्यात गेली. खरिपाची तूर अन्य काही वाचलेली पिके चांगली असली तरी हस्त नक्षत्राच्या पावसाने राहतील की नाही हे सांगता येत नाही. यामुळे शेतकरी वर्ग दोन्ही बाजूने संकटात सापडला आहे.जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊससोलापूर जिल्ह्यात एकूण पावसाळ्यात ५३७७ मि.मी. पाऊस पडणे अपेक्षित आहे. ३० सप्टेंबरपर्यंत ४३६३ मि.मी. पाऊस पडणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात ४४५६ मि.मी. पाऊस पडला आहे. जिल्ह्यात ३० सप्टेंबरअखेर एकूण ४४५६ मि.मी. तर सरासरी ४०५ मि.मी. पाऊस पडला. याची टक्केवारी ८१.१५ इतकी येते. उत्तर तालुक्यात ९०.५५ टक्के, दक्षिण तालुक्यात ८८.९६ टक्के, बार्शीत ८२.७३ टक्के, अक्कलकोटमध्ये ७०.६२ टक्के, मोहोळ तालुक्यात ५५.९३ टक्के, माढा तालुक्यात ९२.३३ टक्के, करमाळ्यात ७२.३७ टक्के, पंढरपूर तालुक्यात ६७.९९ टक्के, सांगोला तालुक्यात १०९.९२ टक्के, माळशिरसमध्ये १०९.३० टक्के तर मंगळवेढा तालुक्यात ६५.४९ टक्के पावसाची नोंद झाली.