शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

सोलापूरच्या दिव्यांग सोमनाथने सर केले कळसूबाईचे शिखर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2020 12:06 IST

राज्यभरातून जवळपास आले होते ४१ दिव्यांग; कडाक्याच्या थंडी व सोसायट्याच्या वाºयातही मोहिम यशस्वी

ठळक मुद्देऔरंगाबादतर्फे  राज्यभरातील दिव्यांगांसाठी कळसूबाई शिखर मोहिम ३१ डिसेंबर रोजी सायंकाळी शिखरावर चढाईस सुरुवात केलीकडाक्याच्या थंडीत व सोसाट्याच्या वाºयात ही मोहीम सुरू

सोलापूर : दिव्यांग हे सर्वसामान्यांसारखे चालू, बोलू, पाहू शकत नसले तरी त्यांचा आत्मविश्वास मात्र सर्वसामान्यांपेक्षा जास्त असतो़ यामुळे या आत्मविश्वासाच्या जोरावरच राज्यभरातील जवळपास ४१ दिव्यांगांनी सर्वांत उंच शिखर कळसूबाई सर करत नववर्षाचे स्वागत केले़ यामध्ये सोलापुरातील दिव्यांग विद्यार्थी सोमनाथ धुळे यानेही सहभाग घेतला होता.

सरत्या वर्षाला निरोप व नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी राज्यभरातील ४१ दिव्यांगांच्या टीमने सर्वोच्च कळसूबाई शिखर सर केले़ शिवुर्जा प्रतिष्ठान, औरंगाबादतर्फे  राज्यभरातील दिव्यांगांसाठी कळसूबाई शिखर मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. मागील आठ वर्षांपासून शिवुर्जा प्रतिष्ठानचे अध्यक्ष शिवाजी गाडे यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम आयोजित करण्यात येते़ यामध्ये सोलापुरातील दिव्यांग विद्यार्थी सोमनाथ धुळे हाही सहभागी झाला होता.

या टीमने ३१ डिसेंबर रोजी सायंकाळी शिखरावर चढाईस सुरुवात केली़ कडाक्याच्या थंडीत व सोसाट्याच्या वाºयात ही मोहीम सुरू होती.

वन विभागाने शिखरावर मुक्काम करण्यास बंदी आणल्याने सर्व टीमने शिखर वाटेतच अर्ध्या टप्प्यावर तंबूत मुक्काम ठोकला आणि १ जानेवारी रोजी पहाटे अंधारातच चढाईस सुरुवात केली. पहाटे साडेचार वाजता सुरुवात केल्यानंतर अनेक अवघड चढ-उतार व शिड्या पार करत ठीक साडेसहा वाजता विनाअपघात दिव्यांगांनी कळसूबाई शिखर सर केले.

या मोहिमेत औरंगाबाद, नाशिक, अहमदनगर, मुंबई, धुळे, जळगाव, सांगली, बुलडाणा आदी शहरांतील दिव्यांगांसोबत सोलापूरचा दिव्यांग सोमनाथ धुळे यांनी सहभाग घेतला़ या दिव्यांगांना गिर्यारोहक नामदेव बांडे, दुर्गप्रेमी विष्णू ससाने, अनिल राऊत व राजेंद्र केरे यांनी मदत केली.या मोहिमेसाठी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबईच्या अपंग हक्क विकास मंचतर्फे  विशेष साहाय्य करण्यात आले. 

राज्यभरातून ४१ दिव्यांगांचा सहभाग- शिवुर्जा प्रतिष्ठान ही संस्था राज्यातील दिव्यांगांसाठी वर्षभर गडकिल्ल्यांचे संवर्धन व भटकंती मोहिमांचे आयोजन करते़ स्वत: शिवाजी गाडे हे पोलिओग्रस्त असून, त्यांनी आतापर्यंत ११५ गडकिल्ल्यांची भटकंती व आठ वेळेस कळसूबाई शिखर सर केले आहे. कालच्या ऊर्जा मोहिमेत राज्यभरातून ४१ दिव्यांग व मदतनीस सहभागी झाले होते. 

मला सोशल मीडियाच्या माध्यमातून याबद्दलची माहिती कळाली़ मी संस्थेशी संपर्क साधला. त्यानंतर मी सर्वांसोबत कळसूबाईचे शिखर आम्ही सर केले़ आम्हाला विश्व काबीज केल्यासारखे वाटले़ हे शिखर सर केल्यामुळे आमचा आत्मविश्वास वाढला आहे़ यापुढेही आम्ही सहभागी होऊ़ -सोमनाथ धुळे, गिर्यारोहक 

२००५ पासून या संस्थेच्या वतीने मोहिमेचे आयोजन करण्यात येते़ अपंगांना गडकिल्ले प्रत्यक्ष पाहण्याचा आणि चढाई करण्याचा आनंद मिळवून देतो़ अपंगांमध्ये जे जिद्द असते त्याला प्रेरणा देऊन ऊर्जा मिळवण्याचे कार्य या संस्थेकडून करण्यात येते़ -शिवाजी गाडे, अध्यक्ष शिवुर्जा प्रतिष्ठान, औरंगाबाद

टॅग्स :SolapurसोलापूरEverestएव्हरेस्ट