शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
2
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
3
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
4
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
5
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
6
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
7
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
8
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
9
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
10
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
11
IPL लिलावात अनसोल्डचा टॅग; त्याच पठ्ठ्यानं विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विक्रमी द्विशतकासह रचला इतिहास
12
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
13
शिंदेसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर; गोविंदासह 'या' ४० नेत्यांकडे प्रचाराची धुरा!
14
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
15
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
16
टीम इंडियाचा ICC क्रमवारीत धुमधडाका! एक-दोन नव्हे, तब्बल ५ स्टार क्रिकेटर रँकिंगमध्ये अव्वल
17
अतिशय गुप्तपणे भारताने बंगालच्या खाडीत केला मोठा धमाका; कित्येक किमी पसरला आवाज, चीनला धडकी
18
"भगवा झेंडा पाहून TMC चा लाठीचार्ज, गुंडांना पोलिसांच्या मागे लपवणं..."; ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
19
Viral Video: भगवान विष्णूची कंबोडियातील मूर्ती लष्कराने पाडली, व्हायरल होत असलेला व्हिडीओचे सत्य काय?
20
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

आयटीत नोकरीची हमी नसल्याने पुण्यात सॉफ्टवेअर इंजिनिअरची आत्महत्या

By admin | Updated: July 13, 2017 13:17 IST

तीन दिवसांपूर्वीच पुण्यातील आयटी कंपनीत नोकरीला लागलेल्या एका 25 वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअरने आत्महत्या करुन जीवन संपवले.

 ऑनलाइन लोकमत 

पुणे, दि. 13 - तीन दिवसांपूर्वीच पुण्यातील आयटी कंपनीत नोकरीला लागलेल्या एका 25 वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअरने आत्महत्या करुन जीवन संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गोपीकृष्ण गुरुप्रसाद असे मृत तरुणाचे नाव असून, तो आंध्रप्रदेशच्या क्रृष्णा जिल्ह्याचा निवासी आहे. हा तरुण  विमाननगर भागातील एका हॉटेलमध्ये रहात होता. 
 
त्याने हॉटेलच्या सहाव्या मजल्यावरुन उडी मारुन आयुष्य संपवले. पुणे पोलिसांना त्याच्या हॉटेलच्या खोलीमध्ये एक चिठ्ठी सापडली असून, त्यामध्ये त्याने आयटी क्षेत्रात नोकरीची हमी देता येत नाही. आयटीमध्ये नोकरी सुरक्षित नसनू, मला माझ्या कुटुंबाची काळजी वाटत आहे असे त्याने चिठ्ठीत लिहीले होते. गोपीकृष्णच्या पश्चात आई-वडील आणि बहिण असा परिवार आहे. 
 
आत्महत्येची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी पोहोचलेल्या पोलीस पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप जयसिंगकर म्हणाले की, पीटनी बोवस् या कंपनीत गोपीकृष्ण 9 जुलैपासून रुजू झाला होता. कंपनीने त्याच्या रहाण्याची व्यवस्था हॉटेलमध्ये केली होती. बुधवारी मध्यरात्री 1.40 च्या सुमारास त्याने सहाव्या मजल्यावरील खिडकीतून उडी मारुन आत्महत्या केली. 
 
आणखी वाचा 
 
गोपीकृष्ण जमिनीवर कोसळल्यानंतर हॉटेलमधल्या दोन सुरक्षारक्षकांनी त्या  दिशेने धाव घेतली आणि हॉटेलच्या  मॅनेजरला तरुणाने आत्महत्या केल्याची  माहिती दिली. हॉटेलच्या मॅनेजरने पोलिसांना कळवले. पोलिसांनी रुग्णवाहिका बोलावली. रुग्णालयात डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर गोपीकृष्णला मृत घोषित केले. 
 
आम्हाला मृत तरुणाच्या खोलीत एक चिठ्ठी सापडली. त्यात त्याने आयटी क्षेत्रात नोकरीची कुठलीही सुरक्षितता नाही. मला माझ्या कुटुंबाची चिंता वाटते असे लिहीले होते. शवविच्छेदनानंतर त्याचा मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात दिला जाईल. पुण्यात येण्याआधी गोपीकृष्णने दिल्ली, हैदराबाद या शहरातही नोकरी केली होती. पोलीस कंपनीतील सहकारी आणि कुटुंबियांशी चर्चा करुन अधिक माहिती गोळा करत आहेत. 
 
पुण्यात आयटी क्षेत्रात आज अनेक मोठया कंपन्या असून, मोठया प्रमाणावर युवा वर्ग तिथे नोकरी करतो. आयटी क्षेत्रात नोक-यांची कपात होण्याची शक्यता असल्याने काही जणांच्या मनात आपली नोकरी राहिल कि, नाही याबद्दल धाकधूक आहे. त्यातून आत्महत्येचे हे टोकाचे पाऊल उचलले असण्याची शक्यता आहे.