शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

समाजवादी नेते गोपाळ दुखंडे यांचे निधन

By admin | Updated: June 14, 2017 00:44 IST

ज्येष्ठ समाजवादी नेते प्रा. गोपाळ दत्ताराम दुखंडे (७४) यांचे मंगळवारी सकाळी सावंतवाडीतील राहत्या घरी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.

- लोकमत न्यूज नेटवर्क

सावंतवाडी (जि. सिंधुदुर्ग) : ज्येष्ठ समाजवादी नेते प्रा. गोपाळ दत्ताराम दुखंडे (७४) यांचे मंगळवारी सकाळी सावंतवाडीतील राहत्या घरी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्यावर बुधवारी मुंबईत अंत्यसंस्कार करण्यात येणार असून, तत्पूर्वी त्यांचे पार्थिव मुंबईतील गोरेगाव येथील घरी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.प्रा. दुखंडे यांच्यावर अलीकडेच हृदयविकाराची शस्त्रक्रिया झाली होती. त्यामुळे सक्रिय आंदोलनांतून ते काहीसे दूर झाले होते. मात्र सोमवारी रात्रीही त्यांनी ११ वाजेपर्यंत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. मंगळवारी सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे डॉक्टरांना बोलावण्यात आले. मात्र, तत्पूर्वीच त्यांचे निधन झाले होते. प्रा. दुखंडे यांच्या पश्चात पत्नी उर्मिला, संतोष व संदीप ही दोन मुले (नोकरीनिमित्त हाँगकाँग व चीन येथे), मुलगी सोनाली (ठाणे) असा परिवार आहे.प्रा. दुखंडे हे मूळचे मालवण-त्रिंबक येथील होते. त्यांचा जन्म १ जून १९४३ रोजी झाला. वडील गिरणी कामगार असल्याने त्यांचे सर्व शिक्षण मुंबईतच झाले. विद्यार्थी दशेत गोरेगाव येथे राहात असतानाच ते समाजवादी चळवळीकडे वळले. मराठवाड्यात बीएड महाविद्यालये मोठ्या प्रमाणात सुरू झाली होती. अनेक महाविद्यालयांनी निकष पूर्ण न केल्यामुळे सरकारने संबंधित महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांची परीक्षा न घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यावरून मोठे आंदोलन पेटले. दुखंडे यांनी त्यावर सरकारला एक फॉर्म्युला तयार करून दिला होता. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया गेले नाही. हा ‘दुखंडे फॉर्म्युला’ चांगलाच गाजला होता.देहदानाची इच्छाप्रा. दुखंडे यांची देहदानाची इच्छा व्यक्त केली होती. सोमवारी रात्रीही कार्यकर्त्यांशी चर्चा करताना ते देहदानाबाबत बोलत होते.त्यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शनही केली़ मंगळवारी त्यांना अस्वस्थ वाटू लागले़