शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

‘मेपल’विरुद्ध आतापर्यंत ४० तक्रारी

By admin | Updated: April 22, 2016 01:30 IST

पुणे शहराच्या जवळ अवघ्या पाच लाखांत घरे देण्याच्या प्रकरणात वादग्रस्त ठरलेल्या मेपल ग्रुपविरुद्ध आर्थिक गुन्हे शाखेकडे आतापर्यंत ४० तक्रारी प्राप्त झाल्या आहेत

पुणे : पुणे शहराच्या जवळ अवघ्या पाच लाखांत घरे देण्याच्या प्रकरणात वादग्रस्त ठरलेल्या मेपल ग्रुपविरुद्ध आर्थिक गुन्हे शाखेकडे आतापर्यंत ४० तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. मेपलच्या या योजनेमध्ये आॅनलाईन पद्धतीने १५ हजार तर प्रत्यक्ष ४ हजार ८६० अशा एकूण २० हजार लोकांनी बुकिंग केल्याचे समोर आले आहे. तक्रारदारांचे जबाब नोंदवण्याचे काम सुरूअसून, जवळपास ५०० गुंतवणूकदारांनी फोन करून संपर्क साधल्याची माहिती पोलीस उपायुक्त दीपक साकोरे यांनी दिली.पोलिसांनी सर्व बँकांना पत्र देऊन मेपलच्या खात्यांची माहिती मागवली आहे. त्यांचे बँक आॅफ महाराष्ट्रचे खाते गोठवण्यात आले असून, अन्य बँकांकडून कंपनीशी संबंधित चालू, बचत अशा सर्वच खात्यांची माहिती मागवण्यात आली आहे. नागरिकांचे बुकिंगचे पैसे परत करण्याचे काम सुरू करण्यात आले असून, कंपनीचे कर्मचारी पोलिसांना सहकार्य करीत आहेत. मात्र, मालक सचिन अगरवाल अद्याप पोलिसांसमोर आलेले नाहीत. एकप्रकारे ते पोलिसांना तपासामध्ये सहकार्य करीत नाहीत असेही साकोरे म्हणाले. जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, महापालिका, मुद्रांक शुल्क विभाग, महावितरण व अशा अन्य संबंधित विभागांशी पोलिसांनी पत्रव्यवहार केला आहे. त्यांच्याकडून मेपलच्या परवानग्यांविषयी माहिती घेण्याचे काम सुरू आहे. आतापर्यंत १२०० गुंतवणूकदारांना कंपनीतर्फे पैसे परत दिल्याचे पोलिसांनी सांगितले. गुंतवणूकदारांमध्ये सर्वाधिक संख्या पुणे शहर आणि जिल्ह्यातील लोकांची आहे. अन्य जिल्ह्यांतील लोकांची संख्या कमी असल्याचेही साकोरे यांनी स्पष्ट केले. सचिन अगरवाल यांना चौकशीसाठी हजर राहण्याबाबत नोटीस बजावण्यात आली होती. मात्र ते चौकशीसाठी हजर राहिलेले नाहीत. या योजनेसंबंधीची कागदपत्रे जप्त करण्याचे काम सुरू आहे. यासंबंधी आणखीही तक्रारी प्राप्त होत असून, त्यांचे जबाब नोंदवण्याचे काम सुरू आहे. (प्रतिनिधी)> ‘मेपल’ने केले १३,५०० गुंतवणूकदारांचे पैसे परतमेपल शेल्टर्सने ‘आपलं घर’ योजनेद्वारे गुंतवणूक केलेल्यांपैकी १३ हजार ५०० गुंतवणूकदारांना रक्कम परत केली आहे. तर ५०० गुंतवणूकदारांनी पैसे परत घेण्यास नकार देत कंपनीवर विश्वास दाखवला आहे. गुरुवारी कार्यालयाला भेट दिलेल्या ४ हजार अर्जदारांपैकी ३ हजार ५०० अर्जदारांना पैसे परत करण्यात आले आहेत. आॅनलाईन पद्धतीने बुकिंग केलेल्या १० हजार अर्जदारांचे पैसे आॅनलाईन पद्धतीने देण्यात येत असून, त्यांच्या खात्यात येत्या १२ दिवसांत पैसे जमा केले जातील असे मेपलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक सचिन अगरवाल यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवले आहे> कंपनीबाहेर मोठी गर्दीपाच लाखांत घर देण्याचे आमिष दाखवणाऱ्या मेपल कंपनीवर गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर या योजनेमध्ये पैसे गुंतवणाऱ्या ग्राहकांनी पैसे परत मिळवण्यासाठी कंपनीबाहेर मोठी गर्दी केली होती. कंपनीने आपल्या अधिकृत संकेतस्थळावर योजनेतून बाहेर पडू इच्छिणाऱ्या ग्राहकांना पैसे परत दिले जाणार असल्याचे जाहीर केल्यानंतर, कंपनीबाहेर सकाळी ९ वाजल्यापासून ग्राहकांच्या रांगा लागल्या होत्या. कंपनीतर्फे कार्यालयामध्ये ८ काऊंटर लावण्यात आले होते. ग्राहकांची पैसे भरल्याची पावती, ओळखपत्र तपासून त्यांना एक अर्ज देण्यात आला. या अर्जावरील माहिती भरून ग्राहकांना त्वरित पैसे दिले जात होते. दिवसभरात हजारो ग्राहकांनी पैसे परत घेण्यासाठी गर्दी केली. काही ग्राहकांनी या योजनेमध्ये कायम राहण्यासाठीही नावनोंदणी केली, > फसवणुकीला बळी पडू नका : प्रियदर्शनी निकाळजेकमी किमतीत पुण्यासारख्या शहरात हक्काचे घर घेण्यासाठी जनघर योजनेत पैसे गुंतविलेल्या गरजू नागरिकांना कायदेशीर पद्धतीने न्याय मिळावा या हेतूने रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाच्या वतीने नागरिकांना मदतीचे आवाहन करण्यात आले, अशी माहिती रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाच्या पुणे जिल्हा युवती अध्यक्षा प्रियदर्शनी निकाळजे यांनी पत्रकार परिषदेमध्ये केली.