ऑनलाइन लोकमत
ठाणे, दि. 13 - पूर्व विभागात कीर्ती सोसायटी येथील डॉक्टर प्रियांका कोडकानी यांच्या दवाखान्यात 6 फुटांच्या धामण जातीचा सर्प आल्याने एकाच खळबळ उडाली. यावेळी हा साप औषधाच्या कप्यात दडून बसला होता.उपचारदरम्यान हा साप डॉक्टरांच्या नजरेस पडला. त्यावेळी डॉक्टरांसह काही दक्ष नागरिकांनी सर्पमित्र कार्तिक गेहलोत यांच्याशी संपर्क साधला, कार्तिक यांनी घटनेचे गांभीर्य ओळखू सापला पकडून सुरक्षित स्थळी सोडले.