सांगली : सांबराच्या शिंगाची तस्करी केल्याप्रकरणी आणखी दोघांना शहर पोलिसांनी शनिवारी सकाळी अटक केली. दत्तात्रय बापूसाहेब मोटे (वय ४२, रा. विश्रामबाग,सांगली) व सिद्राम बसाप्पा अंगडगिरी (३८, पद्माळे फाटा, सांगली) अशी त्यांची नावे आहेत. याप्रकरणी अटक केलेल्या संशयितांची संख्या सहा झाली आहे. सांबर शिंगांची तस्करी करणाऱ्या टोळीचा शहर पोलिसांनी शुक्रवारी पर्दाफाश करुन चौघांना अटक केली होती. त्यांच्याकडून सांबराचे शिंग, चार मोबाईल, चाकू व आलिशान मोटार असा १३ लाख ३५ हजारांचा माल जप्त केला होता. मोटे हा इस्लामपूर तहसील कार्यालयात लिपिक आहे, तर अंगडगिरी यासही न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली आहे. (प्रतिनिधी)
सांबराच्या शिंगाची तस्करी; आणखी दोघांना अटक
By admin | Updated: February 12, 2017 01:49 IST