शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
2
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
3
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
4
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
5
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
6
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
7
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
8
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
9
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
10
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
11
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
12
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
13
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
14
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
15
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
16
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
17
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
18
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
19
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
20
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
Daily Top 2Weekly Top 5

‘स्मार्ट’ केडीएमसीचा सुधारित प्रस्ताव

By admin | Updated: June 10, 2016 03:17 IST

केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी देशातील १०० शहरांची निवड झाली आहे.

मुरलीधर भवार,

कल्याण- केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी देशातील १०० शहरांची निवड झाली आहे. त्यापैकी २० शहरांचा पहिल्या, तर दुसऱ्या यादीत १३ शहरांचा समावेश झाला आहे. मात्र, त्यात कल्याण-डोंबिवली ही शहरे नव्हती. त्यामुळे आता पुन्हा नव्याने स्मार्ट सिटी प्रकल्पाचा प्रस्ताव सादर करण्याच्या तयारीस महापालिका लागली आहे. त्यासाठी प्रस्ताव सादर करण्याची डेडलाइन ३० जून आहे. त्यामुळे आता महापालिकेच्या हाती केवळ २० दिवसच उरले आहेत. स्मार्ट सिटीचा प्रकल्प सादर करण्याच्या पहिल्या प्रयत्नात कल्याण-डोंबिवली महापालिका बाद ठरली होती. २०१४ मध्ये केंद्रात भाजपा सरकार सत्तेवर आल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्मार्ट सिटीची घोषणा केली होती. २०१४ मध्ये विधानसभेच्या निवडणुकीनंतर भाजपाचे देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाले. त्यांनी महापालिका निवडणुकीच्या आधीपासून कल्याण-डोंबिवली स्मार्ट सिटी करण्याचे गाजर दाखवले. त्याची अधिकृत घोषणा महापालिका निवडणुकीच्या प्रचारात केली. डोंबिवलीत झालेल्या भाजपाच्या विकास परिषदेत ६ हजार ५०० कोटी रुपये स्मार्ट सिटीसाठी देण्याची घोषणा फडणवीस यांनी केली होती. मात्र, आचारसंहिता भंगाचा सामना करावा लागेल, या भीतीपोटी त्यांनी अशी घोषणाच केली नसल्याची कोलांटउडी मारली. त्यामुळे सगळा गोंधळ उडाला होता. महापालिकेने १५ डिसेंबरला स्मार्ट सिटीचा प्रकल्प सरकारकडे सादर केला होता. त्यासाठी शहरातील विद्यार्थी, वास्तुविशारद, बिल्डर, सामाजिक संस्था आदींशी चर्चा करून त्यांना काय व कशा प्रकारे शहराचा विकास हवा आहे, याविषयी सूचना मागवल्या होत्या. या चर्चेअंती महापालिकेने स्मार्ट सिटीच्या प्रस्तावासाठी पाणीपुरवठा, मलनि:सारण, घनकचरा, आरोग्य, वाहतूक व्यवस्था, भुयारी गटारे, ई-गव्हर्नन्स, पथदिवे, झोपडपट्टी विकास, सिटी पार्क हे महत्त्वाचे मुद्देनिवडले होते. त्यासाठी एक हजार ४४५ कोटींचा आराखडा तयार केला. त्यानुसार, पहिल्या यादीत प्रकल्पाला मंजुरी मिळेल, अशी आशा महापालिकेला होती. परंतु, ती फोल ठरली. दुसरी यादीही २४ मे रोजी जाहीर झाली. त्यातही कल्याण-डोंबिवलीचा समावेश झाला नाही. तिसऱ्या टप्प्यात प्रस्ताव तयार करण्यासाठी महापालिकांना मार्गदर्शन करण्यासाठी मंगळवार, ७ जूनला दिल्लीत एक शिबिर झाले. त्यात पुन्हा प्रकल्प अहवाल सादरीकरण करताना कोणत्या सुधारणा कराव्यात, कशावर भर द्यावा, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले, अशी माहिती शहर अभियंता प्रमोद कुलकर्णी यांनी दिली आहे. त्यानुसार, सुधारणा करून हा प्रकल्प ३० जूनपर्यंत केंद्र सरकारकडे सादर केला जाईल.महापालिका मूलभूत सोयीसुविधा पुरवण्याकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे महापालिका स्मार्ट सिटी होऊ शकत नाही, अशी ओरड विरोधकांकडून होत आहे. स्मार्ट सिटी ही फसवेगिरी आहे. स्मार्ट सिटीवर अशी टीका होत असताना पहिल्या यादीत महापालिकेचा प्रस्ताव मंजूर झाला नाही. त्यानंतर, अस्वच्छ शहरांच्या यादीत कल्याण-डोंबिवलीचा नंबर लागला. त्यामुळे विरोधकांकडून होत असलेल्या टीकेला आधार मिळाला. स्मार्ट सिटी होण्यासाठी अस्वच्छतेचा डाग पुसण्यासाठी शिवसेनेने परिवर्तनाची मोहीम हाती घेतली. तर, डोंबिवलीतील ६२ संस्थांनी एकत्रित येऊन ‘व्हिजन डोंबिवली’ हा उपक्रम सुरू केला. त्याचा कृती आराखडा लवकर तयार केला जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी संस्थांना दिले आहे. स्मार्ट सिटीच्या दुसऱ्या प्रयत्नात कल्याण-डोंबिवली बाजी मारणार की नाही, याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.>पॅन सिटीसाठीमध्ये काय?डेटा बेस व्यवस्थापन प्रणालीसाठी - १० कोटी रुपयेआयटीएस परिवहन व्यवस्थापनासाठी - ५० कोटी रुपयेबुद्धिमान वाहतूक व्यवस्थापनासाठी - ५० कोटी रुपयेघनकचरा व्यवस्थापनासाठी - २ कोटी ३ लाख रुपये