शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
3
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
4
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
5
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली
6
Python Hunting: अजगर मारून त्याचं मांस शिजवलं, दोन जणांना अटक! 
7
सिक्कीममध्ये निसर्गाचा कोप! भूस्खलनात ४ जणांचा मृत्यू, ३ जण बेपत्ता, बचावकार्य सुरू
8
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
9
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
10
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
11
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
12
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
13
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
14
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
15
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
16
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
17
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
18
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
19
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
20
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल

स्मार्ट मीटरचे मुंबई, पुण्यातील प्रयोग फेल! तरीही बसवतायत, वीजग्राहक आणि कर्मचाऱ्यांमध्ये उडताहेत खटके

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2023 09:22 IST

स्मार्ट प्रीपेड मीटर योजनेबाबत वीज ग्राहक, ग्राहकांच्या संस्था, नागरिक व कामगार संघटनांत विरोधाची चर्चा आहे. या योजनेला पश्चिम बंगाल व केरळ राज्यात विरोध झालेला आहे.

 लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : महावितरणसह बेस्टकडून स्मार्ट मीटर बसविले जाणार असले तरी हे स्मार्ट मीटर मोफत की विकत? इथंपासून स्मार्ट मीटर बसवल्यानंतर वीज गळती, वीज चोरी थांबेल का, आणि विजेचे बिल खरेच कमी येईल? अशा अनेक प्रश्नांची सरबत्ती वीज ग्राहकांसह महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेने महावितरणवर केली आहे. विशेषत: प्रत्येक वेळी महावितरणसह बेस्टच्या मुख्यालयात या गोष्टींसाठी येणे वीज ग्राहकांना शक्य नसल्याने फिल्डवर असणारे कर्मचारी आणि ग्राहक यांच्यात नवीन मीटरबाबतच्या प्रश्नांमुळे खटके उडत आहेत. त्यामुळे स्मार्टबाबत आता शहर आणि ग्रामीण भागात जनजागृतीवर भर देण्यात यावा; यावर ग्राहक आणि संघटनांनी जोर दिला आहे.

स्मार्ट प्रीपेड मीटर योजनेबाबत वीज ग्राहक, ग्राहकांच्या संस्था, नागरिक व कामगार संघटनांत विरोधाची चर्चा आहे. या योजनेला पश्चिम बंगाल व केरळ राज्यात विरोध झालेला आहे. महाराष्ट्रातील एकूण २ कोटी ४० लाख वीज ग्राहकांपैकी कृषी पंप धारक (ॲग्रीकल्चर) ग्राहकांना सोडून सर्व ग्राहकांकरिता ही योजना आहे. योजनेच्या पहिल्या टप्प्यात ५०० ते ६०० कोटींचा भार येईल. योजनेचे काम खात्यामार्फत न करता कंत्राटदारामार्फत पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे. होणारा विरोध लक्षात घेता व्यवस्थापनाने काही गोष्टी स्पष्ट करणे गरजेचे आहे.

अनामत रक्कम परत करणार का? वर्तमान व्यवस्थेमधे वीज घेणाऱ्या प्रत्येक ग्राहकाकडून महावितरणने तीन महिन्यांच्या सरासरी बिलाइतकी अनामत घेतली आहे. ती त्यांना परत केली जाईल की, स्मार्ट मीटरच्या किमतीच्या ऐवजात ॲडजस्ट केली जाईल. अनामत रकमा या लक्षावधी रुपयांच्या परत कराव्या लागतील. त्याचा महावितरणच्या आर्थिक व्यवहारावर परिणाम होईल. वेळप्रसंगी खुल्या बाजारपेठेतून कर्ज घेऊन हे भागवावे लागेल.    - कृष्णा भोयर, सरचिटणीस,  स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन

या प्रश्नांचा भडिमारn मीटरची किंमत किती, ग्राहकाकडून ती कशी वसूल केली जाईल, त्याचा एकूण आर्थिक बोजा किती? n मीटर लावल्यानंतर कार्यान्वित होण्याचा कालावधी, फॉल्टी मीटर बदलवणे, त्याची जबाबदारी, फॉल्टी मीटर कॉस्ट ग्राहकाकडून वसूल करणार की कसे?n मीटर लावल्यानंतर ग्राहक रिचार्ज न करतासुद्धा वीज वापरू शकतो. परिणामी गळती वाढेल. त्याबाबत उपाय योजना जनमित्र व तांत्रिक कर्मचाऱ्यांना सांगावी लागेल.n पुणे शहरांत मगरपट्टासिटी व इतर काही शहरांत स्मार्ट प्रीपेड मीटर लावले होते. हा प्रयोग व प्रोजेक्ट अयशस्वी ठरला.n भांडुप झोन खारघर व इतर भागामधे स्मार्ट मीटर लावल्यानंतर चोरी, गळतीचे प्रमाण वाढले. त्यामुळे स्मार्ट मीटर काढून पोस्टपेड मीटर लावण्यात आले.

टॅग्स :mahavitaranमहावितरणelectricityवीज