शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

कॅनडाच्या मदतीने पंढरपूर बनणार स्मार्ट शहर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2017 14:26 IST

कॅनडाच्या मदतीने पंढरपूर शहर स्मार्ट बनविण्याच्या हालचालींना आता वेग येत आहे़ भारत - कॅनडा मैत्रीला १५० वर्षे पूर्ण झाल्याबदद्ल कॅनडाकडून भारताला गिफ्ट मिळणार आहे़

ठळक मुद्देकॅनेडियन दुतावासाचे प्रतिनिधी ३ आॅक्टोबरला देणार पंढरपूरला भेटभारत-कॅनडा मैत्रीला १५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल कॅनडाकडून भारताला मिळणार गिफ्टकॅनडा सरकारने तयार केला दोन हजार कोटी रुपयांचा विकास आराखडाश्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे देवस्थान समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांची माहिती

आॅनलाइन लोकमत सोलापूर सोलापूर दि २३ : कॅनडाच्या मदतीने पंढरपूर शहर स्मार्ट बनविण्याच्या हालचालींना आता वेग येत आहे़ भारत - कॅनडा मैत्रीला १५० वर्षे पूर्ण झाल्याबदद्ल कॅनडाकडून भारताला गिफ्ट मिळणार आहे़ यासाठी कॅनडा सरकारने २ हजार कोटी रूपयांचा विकास आराखडा तयार केला असून कॅनेडियन दुतावासाचे प्रतिनिधी ३ आॅक्टोबरला पंढरपूरला भेट देणार असल्याची माहिती श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे देवस्थान समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांनी दिली़ भारत-कॅनडा मैत्रीचा करार झाला असून त्यांनी स्वत:हून पंढरपूरच्या विकासासाठी साहाय्य करण्याची तयारी दर्शविली असल्याबाबतचे सूतोवाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आषाढी एकादशीदिवशी पंढरपूर येथे केले होते. याच अनुषंगाने शुक्रवारी (ता. २३) मुंबई येथे कॅनेडियन दुतावासाच्या प्रतिनिधींसमवेत एक बैठक पार पडली. या बैठकीला श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे देवस्थान समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले, राज्याचे मुख्य अवर सचिव प्रवीण परदेशी, सोलापूरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.या बैठकीत पंढरपूर शहराच्या विकासाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यानुसार शहरातील श्री विठ्ठल रूक्मिणी मंदरि परिसर, शहरातील स्वच्छता, पिण्याच्या पाण्याचा पुरवठा, चंद्रभागेचा विकास, सांडपाण्याची व्यवस्था यासह संपूर्ण शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सहकार्य करण्यास कॅनेडियन दुतावासाच्या प्रतिनिधींनी तत्वत: मंजुरी दिली असून, शहराची पाहणी करण्यासाठी प्रतिनिधींचे मंडळ ३ आॅक्टोबर रोजी पंढरपूरला भेट देणार आहे. पंढरपूर शहराचा चेहरामोहरा बदलून, पंढरपूरला स्मार्ट शहर बनविण्याचा संकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. कॅनडा सरकारच्या या प्रकल्पामुळे पंढरपूर हे देशात लवकरच स्मार्ट शहर म्हणून नावारूपाला येईल, असा विश्वास श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे देवस्थान समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांनी व्यक्त केला आहे.